Demo Site

Thursday, July 7, 2011

आयुष्य़ाची स्वप्ने पाहताना,


आयुष्य़ाची स्वप्ने पाहताना,
वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना,
काट्याच भान ठेवायचं असतं,
प्रितिच्या मोहात वावरताना,
जपुन पाऊल टाकायचं असतं,
काळजाला झटका बसल्यावर,
कधीच रडायचं नसतं,
उध्वस्त झालेले विश्व आपल्,
शुन्यातुन उभ करायचं असतं..

मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....


मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....
माझ्या मनात कधीकधी विचार येतात
आज काल ची मुलं,
मुलींच्या मागे लागून
स्वताचा वेळ वाया का घालवतात???

Chance मिळाला तर प्रतेक मुलीला
पटवायचा प्रयातना करतात,
जर नवीन नाही पटली तर
जुन्या GirlFriend वर भागवतात.

Monday, July 4, 2011

माझी अंत्ययात्रा

माझी एक इच्छा आहे...
माझी अंत्ययात्रा मला पहायची आहे...
पहायचंय मला, कोण रडतंय माझ्या मरणावर,
अन् पहायचंय कोण हसतंय माझ्या सरणावर...
पहायचंय मला कोण म्हणतय "अरेरे गेला...!",
...अन् पहायचंय मला कोण म्हणतय "बरं झालं मेला...!"
आणि हो... अजुन एक इच्छा ऐका माझी,
मला जाळन्यापुर्वी वाट पहा 'तिची'...
येईल 'ती' जरुर हे मात्र नक्की आहे,
नाहीच आली तर, स्वर्गात भेट आमची पक्की आहे...
माझ्या तिरडीवर लावू नका फुल-तुरे,
तिच्या डोळ्यातून निघालेले दोन अश्रुच पुरे....!
माझ्या मृत्युवर नका करू कळवळT,
तिची सारी प्रेमपत्रे फ़क्त अग्निमद्धे जाळT...
मला अग्नि देता क्षणी ती सुद्धा रडणार आहे,
कारण माझ्यासोबत तिचे ह्रदय सुद्धा जळणार आहे...
मी मेल्यावरच आमचे प्रेम जगाला कळणार आहे...
.
मला बघायचा आहे कोण माझ्या कपड्यान वरून प्रेमळ हात फिरवणार आहे ...
कोण माझ्या फोटो ला कवटाळून ढसा ढसा रडत आहे...
कोण माझी खेळणी न्याहाळत आहे...
कोण माझ्या कविता वाचत आहे....
मला पाहायचा आहे कोण माझ्यासाठी मला आवडणारी खीर घेवून येत आहे...
मला पाहायचा आहे कोण मला अग्नी देता आहे..
मला पाहायचा आहे मला कोणते चार खांदे मिळत आहे आधाराला...
किती जन रडत आहे ...
आणि महत्वाचा राहिलाच किती मित्र आणि खास म्हणजे किती मैत्रिणी मला miss करणार आहे...
मला खरच
माझ्या साठी किती मुली रडत आहे हे हि मला पाहायचे आहेच... माझी अंत्ययात्रा

एक गोष्ट पैशाची

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

Friday, July 1, 2011

भेसळ

काल बायकोने खर्वस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
"कसा मस्त आहे की नाही ?"

हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले.

आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.

माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

जीवनात माझ्या शंका कुशंका ना नेहमी थार राहला राव ,
शाळेत प्रवेश घेताना पन्नास दा विचार केला आम्ही raao,
बेस्ट शाळेतच मी प्रवेश घेत आहे ना कि आहे एक फडतूस शाळा राव ??
...माझी निवड चुकली तर नाही ना राव ???

शाळेत मित्र जोडताना त्याच संभ्रम अवस्थेत जगलो आम्ही राव,
मित्र धोका देणार तर नाही ना हा विचार करत राहलो राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

दादा मला एक गणपती आण ।।

गोरा गोरा पान ,सुपाएवढे कान

गणपतीला आणायला रंगीत गाडी
गाडीला जोडली उंदराची जोडी
...उंदराच्या जोडीला चिमुकले कान
दादा मला एक गणपती आण

गणपतीला बसायला रंगीत पाट
पाटापुढे वाढले चांदीचे ताट
ताटापुढे थोडीशी रांगोळी काढ
दादा मला एक गणपती आण

गणपतीच्या ताटामध्ये मोदकाचा मान
त्याच्यावरी ठेवले तुळशीचे पान
नैवेद्य नको त्याला हाताने चार
दादा मला एक गणपती आण

बुद्धीची देवता ती फार विदवान
डोक्यावरी माझ्या इथे गणिताचा ताण
सांगून त्याला, माझा भवसागर तार
दादा मला एक गणपती आण

गणपतीच्या दर्शनाला भक्तांची रांग
सर्वांना हवे तुझ्या काळजामध्ये स्थान
अक्षम्य चुका माझ्या पोटात घाल
नि जागा माझी पिट्टूशा उंदरापाशी मांड
दादा मला एक गणपती आण

गणपतीला नको माझ्या ,डॉल्बी नि ढोल
सुपाएवढया कानांमध्ये आवाज जाई खोल
फटाक्यांच्या धुराने डोळे होई लाल
गणपतीला आवडी वीणा नि टाळ
भजनाच्या साथीला माझ्या कवितांचा ताल
दादा मला एक गणपती आण

गणपतीच्या विसर्जनाला झिन्ग्नार्यांची रीघ
तळाशी नदीच्या मुर्त्यांचा ढीग
नका रे रोखू त्याच्या श्वासांची लय
हवे त्यासी आपुल्या प्रेमाचे गीत
जोपुया सारे एकतेची रीत
दादा मला एक गणपती आण
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers