Demo Site

Wednesday, June 29, 2011

साले हे मित्र असतात बाकी मस्त



"काय आयटम चाललीय बघ......!!!!!!!!"
"वहीणी आहे तुझी साल्या,दुसरीकडे बघ...."

हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

"नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं
निर्लज्ज असतात ते,त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

शाळेचा result असो या प्रेमाचा,ह्यांचाच धिंगाना जास्त
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं
पण काहीही म्हणा,
साले हे मित्र असतात बाकी मस्त

प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं.
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं
breakup नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा...

Tuesday, June 28, 2011

एक छोटीशी प्रेम कथा

होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...म्हणतात ना शोदनार्याला देव हि मिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत..दोगेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीच जरा जास्तच होत.पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य न्हवती.कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..फोन वर बोलन तसे दररोजचेच.पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........

Friday, June 24, 2011

बानूच्या पदरी वनवास


तिची हकीकत ऎकुन राजा रागाने लाल झाला आणि म्हणाला, ’गुरुची निंदा करणा-या हिचा ताबडतोब शिरच्छेद करा!’

तेव्हा प्रधानास द्या येऊन त्याने हात जोडून राजास प्रार्थना केली की, ’खुदावंत! आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे हिचे आपण संगोपण केलेत, तेव्हा एवढी भयंकर शिक्षा तिला देऊ नये!’ तेव्हा राजा म्हणाला, ’ठीक आहे! तुमच्या म्हणण्याला मान देऊन मी हिला हद्दपार करून हिची सर्व संपत्ती जप्त करून टाकण्याचा हुकूम देत आहे.’

खरी हकीकत सांगूनही राजाचा उलटा न्याय पाहून बानू अतिशय दु:खी अंतकरणाने आपल्या दाईसह उद्वेगाने अरण्याच्या मार्गाने चालू लागली. पुढे चालून दमल्याने त्या दोघी एका झाडाखाली विश्रांती घ्यावी म्हणुन थांबल्या, बानुला आपल्या पूर्वीच्या परिस्थितीची जाणी झाली व ती दाईस म्हणाली, ’आई! देवाचा असा काय गुन्हा केला आहे म्हणुन ही भयंकर शिक्षा तो मला भोगावयास लावीत आहे.’ तेव्हा दाई म्हणाली, ’बेटी! दैव फिरल्यावर देवाला दोष काय देणार?’

श्रम, तहान आणि भुकेने व्याकुळ झाल्याने त्यांना त्या अवस्थेत झोप लागली, झोपेत बानुच्या स्वप्नात एक दिव्य साधू आला आणि तिला म्हणाला, ’मुली! तू दु:खी कष्टी होऊ नकोस. या वृक्षाखाली अलोट संपत्तीने भरलेल्या सात खोल्या आहेत त्या तुला मी बक्षीस देतो. येथेच एक शहर बसवून तू सुखाने राहा.’ हुस्नबानु दचकून जागी झाली. लगेच तिने दाईला जाने केले आणि आपले स्वप्न सांगितले. तेव्हा तिलाही समाधान वाटले.

त्याप्रमाणे थोडे खणू लागताच द्र्व्य आढ्ळू लागले. परमेश्वरी लीलेचे कौतुक करीत तिने थोडे दाईकडे दिले व बाजारातून आवश्यक त्या वस्तु खरेदी करून आणण्यास सांगितले. पण भीषण अरण्यात बानूला एकटी सोडून जाण्यास ती प्रेमळ दाई तयार होईना.

थोड्याच वेळात एक फकीर रस्त्याने जाताना दिसला. दाईने त्याला ओळखुन हाक मारली. बानूचा चुलत भाऊच होता. त्याला घडलेली सर्व हकीकत सांगून बाजारात पाठवून दिले. त्याने येताना अन्न, वस्त्र, कारागीर व बांधकामाचे साहित्य आणले. त्यानंतर साधूच्या दिव्य संदेशाप्रमाणे शहर वसविण्याचा ती विचार करु लागली. ती राजाची हद्द असल्याने शहर वसविण्यासाठी प्रथम त्याची परवानगी आणा असा सल्ला बानुला कारागिरांनी दिला. त्यासाठी ती बादशहाकडे आली.

पेराल तसच उगवेल...



नुकतच झालं होतं लाडक्या आजोबांचं निधन...
भांबावलेल्या चिंटूच सुन्न झालं होतं मन...
५ वर्षाचा निरागस चिंटू आजोबांच्या झोपडीत गेला आणि..
ओक्साबोक्शी रडला... हातात घेऊन ...आजोबांचा पाणी पिण्याचा पेला....
झोपडीच्या समोरच दिसत होत आई-बाबांचं टुमदार घर..तरीही
चिंटूच प्रेम जडलं होतं..आजोबांच्याच झोपडीवर...
"काय रे झालं सोन्या ?" म्हणत जवळ आली आई...
चिंटू बोबड्या रागात म्हणाला..."मला तुम्ही दोघंही आवलत नाही.."
आईने प्रेमाने घेतलं...चिंटूला कवेत,
हंबरडाच फोडला त्याने...."मला आजोबा हवेत..."
आई-वडिलांना पण अश्रू झाले होते अनावर..पण त्यांना..
"निरागस धडा" शिकवायचं चिंटूने पण घेतलं होतं मनावर..
पेल्याबरोबर हळूच त्याने काढलं आजोबांचं जेवणाचं तुटलेलं ताट...
छातीशी दोन्ही घट्ट पकडून फिरवली आई-बाबांकडे पाठ..
बुचकळ्यात पडलेल्या बाबाने विचारलं..काय रे करतोस चिंटू ??
चिंटू म्हणाला ," धुवून जपून ठेवतोय ह्या दोन्ही वस्तू"..
"का रे ?" म्हणून विचारल्यावर चिंटूने दिलं उत्तर....
ते ऐकल्यावर..मान खाली घालून आई-बाबा दोघंही झाले निरुत्तर..
चिंटू म्हणाला,"म्हाताले झाल्यावर तुम्ही पण ईकलेच येनाल...
तेव्हा मी तुम्हाला यातूनच खायला प्यायला देनाल"....
उत्तर ऐकून.....वागलो कसे वडिलांशी हे दोघांनाही आठवलं..
लक्षात आलं की वय झाल्यावर त्यांना आपणच झोपडीत पाठवलं
चिंटूचे ते निरागस शब्द काळीज गेले चिरून....
पश्चात्तापाने आईही रडली...बाबांना घट्ट धरून..
बाबा म्हणाले...."छोटा असून दिलीस तू आम्हालाच चांगली शिकवण"..
तुझ्या या उत्तराचे कधीच मिटणार नाहीत मनावर झालेले व्रण..."
आपणही लक्षात ठेवू.....खाण तशी माती आणि झाड तशी वेल..
पेरलेल्या बी ला जसं घालाल खतपाणी, तशीच ती उगवेल....

स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली.!!!!!!!!


कोण म्हणत जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली.

त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात....
तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात.
त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, '' साला लाइन मारतोय बघ!''
ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री.
ती रडली, तर ती म्हणेल ते खरे.
तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे.
मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक.
मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक.
मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत.
मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच.

तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात.

त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला... तुम्हाला माहितीये काय म्हणतात!!! ;-)

दिवस असे ........

दिवस असे आई बापाच्या
जिवावर फुकट बसून खायचे
अंगात घोड्याचे बळ असताना
गाढवावनी घरात लोळायचे

आजूबाजूच्या उनाड पोरा बरोबर
बाहेर उनाडग्या करत फिरायचे
आणि रोज नव्या खोड्या कडून
काळ तोंडाला फसायचे

काम कर म्हटले की
तोंड वाकडे करायचे
कितीही कोणी ही काही ही बोलले
की निर्लजसारखे हसायचे

का म्हणून आपल्या नशिबी मित्रानो
इतके वाईट दिवस आणायचे
मनासारखे काम मिळत नाही
हे कारण रोज सांगायचे

पण आयुष्यात काही तरी करून दाखवयाचे
हेच तर खरे वय असते
कारण वेळ निघून गेल्यावर
मग सारेच काही फसते सारेच काही फसते...!!!!!!!!

--- अनामिक  कवी

Wednesday, June 22, 2011

शाळेत जाणाऱ्या एका लहान .. मुलाच.. प्रेम पत्र..



प्रिय पिंकी ,

प्रेम पत्र

पाठवण्यास कारण कि, मला तू खूप आवडतेस. तू पण माझ्याकडे सारखी बघत असतेस. म्हणून मला वाटते मी पण तुला आवडत असेल. तर गणिताच्या पेपरला मला मदत कर, तू रेड रीब्बन नको लावत जाऊ तुझ्या मागची मंदा त्यावर इंक सोडते मग मला राग येतो. ती माझ्या घर शेजारी राहते, इंक चा बदला म्हणून तिच्या घराची बेल वाजून पळून जातो. तू fair & lovely लावत जा, आणखी गोरी दिसशील. तुझ्या शेजारी गुड्डी आहे न ती तुझ्या हून गोरी आहे पण मला तूच आवडतेस कारण ती माझी पेन चोरते . पत्राचा राग आला तर मला परत दे, सरना देऊ नकोस .

तुझा खरा प्रेमी सोन्या ♥♥

~ !! * बायकांचं जग * !! ~

कोण म्हणत जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली.
त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात.
तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात.
त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, '' साला लाइन मारतोय बघ!''
ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री.
ती रडली, तर ती म्हणेल ते खरे.
तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे.
मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक.
मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक.
मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत.
मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच.
तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात.
त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला... तुम्हाला माहितीये काय म्हणतात!!! ;-)

आळशी माणसं...

"आळशी माणसं खुप हुशार असतात". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.

Tuesday, June 21, 2011

गुगल होम पेज बरोबर करा गम्मत.......

Tricks -


कोणतेही अक्षर उचला आणि कोठेही फेका, फिरवा पाहिजे ते करा

बघा कशी मज्जा येते

त्यासाठी असे करा -

१. गुगल होम पेज ओपन करा

२. सर्च मध्ये "google gravity" टाईप करा

३." I'm Feeling Lucky" वर टिचकी मारा

Note : हि ट्रिक फक्त Google chrome , Safari , firfox मध्ये चालते..
कशी वाटते ट्रीक ते सांगायला विसरू नका..

Do You Want to Be a Famous Designer?

Every designer would like to be recognized and even some wants to be famous. For those who want to be a famous designer, we have a few tips to help you. Getting famous doesn’t happen overnight so you really have to work hard on it. Some designers wants fame for this could give them lots of benefits, like you will have more clients (and these clients are famous people too!) and you will have a higher rate. Being famous may also mean you could have more income. Let us find out how you can be famous as a designer.

73 Blog Designs From Deviantart You’ll Never Forget


Title-inspiration-wordpress-blog-designsFor some long time I’ve been gathering great blog designs from deviantart to get inspired and now I will showcase them all in one huge article!! Surprisingly finding great ideas and designs have been much easier in Deviantart than any other web design showcase sites.
I didn’t add any comments this time – compare these designs yourself and try to understand why ones really stand out, well others seem a little bit classical. Notice small things, how designer puts a little bit unique style in its design to make emphasis like folding, comment,date boxes which stand out from layout, icons, background textures and nice shadings.
73 Blog Designs From Deviantart You’ll Never Forget
What  I noticed though – for blog designs light colors always look better and are more user-friendly since visitors need to read information – light background and dark text always seem to work great!

Monday, June 20, 2011

Joke of the month

डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.
१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की।

हुस्नबानू व ढोंगी साधू

Previous Chapter                       Next Chapter


हुस्नबानू त्याप्रमाणे आपल्या जीवनातील दिवस घालवीत होती. एक दिवस रस्तावरील मौज खिडकीतुन ती पाहत होती. एक वृद्ध साधुमहाराज आपल्या शिष्यांसह रस्त्यावरून जाताना दिसला. त्याचे शिष्य त्याच्या मार्गावर सोन्यारूप्याच्या विटा ठेवीत होते. त्यावरून जमिनीला पाय न लावता साधुपुरूष चाललेला पाहून ती आश्चर्यचकीत झाली व तिने दाईस हा असा का चालला आहे असे विचारले.

तेव्हा दाई म्हणाली, ’बेटी, हा साधुपुरूष राजाचा गुरु आहे व त्याच्या भेटीसाठी तो जात आहे. कधी कधी राजसुद्धा त्याच्य दर्शनास जातो.’

नंतर बानूने दाईला विचारले की, ’आई!, तुझी परवानगी असेल तर या साधुपुरुषास आपल्या घरी बोलावून त्याचे दर्शन मी घेऊ का?’ तेव्हा ती म्हणाली, ’तुझी इच्छा असल्यास जरूर दर्शन घे.’

त्याप्रमाणे आपल्या चाकराकरवी हुस्नबानूने साधुस निरोप पाठविला की आपल्या चरणांची धूळ आमच्या घराला लावून आम्हाला पावन करावे अशी प्रार्थना आहे.

साधूने तिच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. दुस-या दिवशी येण्याचे मान्य केले. हुस्नबानूस अतिशय आनंद झाला. तिने त्या दिवशी संपूर्ण महाल शृंगारला. निरनिराळ्या प्रकारची उत्तमोत्तम पक्वान्ने तयार केली. प्रात:काळीच साधूला घेऊन येण्यासाठी चाकरास पाठवून दिले.

आहार किती घ्यावा ?



अ. मित आहार : आपण जे भोजन करतो, ते अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि त्याची प्राप्ती व्हावी म्हणून करत असल्याने ‘भोजन देहासाठी नसून देव जो महेश्वर तो भोक्ता आहे, त्याच्याकरिता आहे’, अशी
श्रद्धा मनात बाळगून जे भोजन केले जाते, त्याला ‘मिताहार’ असे म्हणतात.
अपरे नियताहाराः । - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३०
अर्थ : नियत, मित आहार करणे.
पोटाचे दोन भाग अन्न ग्रहण करून तिसरा भाग पाणी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवणे, म्हणजे मिताहार.
लाभ : ‘आहार अल्प (कमी) केला, म्हणजे इंद्रिये क्षीण होतात, दुबळी होतात; पण त्यांची अंतःशक्ती विलक्षण वाढते. आपोआप क्षीण झालेल्या त्या इंद्रियांत, त्या त्या इंद्रियवृत्तीचा विजय होतो.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
आ. प्राणरक्षणापुरताच आहार घ्यावा ! : प्राणरक्षक आहारच प्राणवायू घेतो. शरिराला अंतर्वायू म्हणजे प्राण. त्याला अन्न आणि जल दिले की, त्याचे अस्तित्व अन् कर्मकर्तृत्व ठीक चालते. प्राणापुरताच आहार स्वीकारावा. आवश्यक आहारच घेतला नाही, तर विचार करणारे मन विकलांग आणि दुर्बल होते. विकल्पाने ज्ञाननाश होतो.’

कोणते अन्न खाऊ नये ?


अ. तामस अन्न : कुजलेले, रसरहित, दुर्गंधीयुक्त, शिळे, उष्टे आणि यज्ञासाठी अयोग्य असे अन्न तामस असते.

आ. मांसाहार : मांसाहारामुळे रज आणि तम गुण यांची वृद्धी होते. मांसाहारामुळे साधकाला हिंसादोष लागतो.
इ. कांदा आणि लसूण
१. हे पदार्थ कामोत्तेजक असून मनुष्याची प्राणशक्ती खाली खेचणारे आहेत.
२. लशुनं गृजनं चैव पलाण्डुं कवकानि च ।
अभक्ष्याणि द्विजातीनाम् अमेध्यप्रभवानि च ।।
- मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक ५
अर्थ : द्विजांनी लसूण, गाजर, कांदा, छत्र्या (मशरूम) आणि अशुद्ध ठिकाणातून उत्पन्न झालेले अन्न खाऊ नये. ‘अमेध्य प्रभव’ म्हणजे अपवित्र पदार्थांपासून अथवा प्रदेशापासून ज्यांची उत्पत्ती आहे, ते पदार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अभक्ष्य म्हणून सांगितले आहेत.
३. ‘कांदा आणि लसूण पुरुषाने खाऊ नयेत; खाल्ले तर बाईला पुरुष नकोसा वाटतो.’
- स्वामी विद्यानंद, मुंबई (वर्ष १९८७)
ई. निषिद्ध आहाराची अन्य उदाहरणे
१. ‘आंबलेले
२. थुंकलेले, थुंकी पडलेले, कृतघ्न व्यक्तीचे
३. कुत्र्याने शिवलेले
४. रजस्वलेचा स्पर्श झालेले
५. मेलेल्यासाठी शिजवलेले
६. सुतक आणि सोयर यांच्या दहा दिवसांतील
७. पत्नीने ज्याला मुठीत ठेवला आहे, त्याचे
८. वेश्येच्या घरचे
९. नपुंसक, व्यभिचारिणी आणि अपराधी यांच्याकडील
१०. ज्याला पत्नीचा व्यभिचार सहन होतो, त्याचे’
११. ‘कावळा किंवा इतर पक्षी यांनी खाल्लेले
१२. कुत्र्याने पाहिलेले किंवा स्पर्श केलेले
१३. चार दिवस मासिक पाळी न पाळणार्‍या विटाळशी स्त्रीची दृष्टी पडलेले
१४. भ्रूणहत्या करणार्‍याच्या विषारी दृष्टीस पडलेले किंवा चांडाळाची दृष्टी पडून दूषित झालेले

अन्नाला यज्ञकर्म का म्हटले आहे ?


‘तृप्ती ही जिवाला कारक आहे. शरिराचे बाह्य-पोषण अन्नाने होते. अग्निदेवाला आहुती देऊन आपण अग्नीच्या ऋणातून कृतज्ञतापूर्वक मुक्त होतो, तेव्हा अग्नीची तृप्ती होते, म्हणजे तो शांत आणि कल्याणकारी होतो; 
त्याचप्रमाणे अन्न सद्भावाने ग्रहण करून जिवाची तृप्ती होते. त्या वेळी ही तृप्ती शरीर म्हणजे शरीररूपी ब्रह्माला शांत करते. म्हणून महान हिंदु संस्कृतीत ऋषींनी या पवित्र कर्माला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे.’

अंधारात कसा चढणार डोंगर ?



तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्या च्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली.
अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता.
तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती?

जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच!
अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा?
किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला.
बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला.
तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.

Sunday, June 19, 2011

केळीच्या पानावर जेवायचे महत्त्व ?


अ. पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणे, हे आरोग्यदायी असते.
आ. केळीचे पान हे पवित्र, चैतन्ययुक्त आणि दैवी असते. 
इ. केळीच्या पानात जेवणार्‍या व्यक्तीला होणारे लाभ
१. केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्‍या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.
२. केळीच्या पानातील चैतन्याचा प्रवाह व्यक्तीकडे प्रवाहित होतो. त्यामुळे शरिराची शुद्धी होऊन शरिराभोवती चैतन्याचे कवच मंद गतीने निर्माण होते. अशा प्रकारे नेहमी केळीच्या पानावर जेवल्यास हे कवच वाढत जाऊन ते अभेद्य होते.

३. केळीच्या पानातील सगुण चैतन्य त्यावर जेवणार्‍या व्यक्तीला ‘चांगले वाटणे’ या स्वरूपात अनुभवता येते. केळीच्या पानाकडून येणारे सगुण चैतन्य आणि पाटावर बसून जेवतांना होणारी शरिराची मुद्रा यांमुळे जेवणार्‍या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी सगुण चैतन्याचे वलय (१ टक्का) निर्माण होते. त्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. 
४. केळीच्या पानाकडून भूदेवीतत्त्वाचा प्रवाह जेवणार्‍या व्यक्तीकडे प्रवाहित होतो. त्यामुळे त्या व्यक्तीची अंतर्बाह्य १ टक्का शुद्धी होते आणि तिच्या देहातील काळी शक्ती नष्ट होते.
५. जेवणार्‍या व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चैतन्याचे वलय मंद गतीने निर्माण होते. त्यामुळे तिचे मन शुद्ध होते आणि ते शांत रहाते.’
- सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्.

Saturday, June 18, 2011

अग्निशामक दलाचा म्हणजे फायर ब्रिगेडचा रंग लाल का असतो?


प्रश्न:- अग्निशामक दलाचा म्हणजे फायर ब्रिगेडचा रंग लाल का असतो?
उत्तर : अग्निशमन दलाच्या जवानांकडे एक शिडी असते.
शिडीला पायऱ्या असतात.
पायऱ्या पायांनी चढायच्या असतात.
पायांना इंग्रजीत फुट म्हणतात.
फुटांचं मोजमाप करणाऱ्या पट्टीला इंग्रजीत रूलर म्हणतात.
पण, रूलरचा दुसरा अर्थ राज्यकर्ता, म्हणजे राजा किंवा राणी.
इंग्लंडच्या राणीचं नाव एलिझाबेथ आहे.
एलिझाबेथ हे एका जहाजाचं पण नाव आहे.
जहाज पाण्यावर चालतं.
पाण्यात मासे असतात.
माशांना कल्ले असतात.
कल्ल्यांना इंग्रजीत फिन्स म्हणतात.
फिनलंड देशाच्या रहिवाशांनाही फिन्स म्हणतात.
फिनलंडच्या राष्ट्रध्वजाचा रंग लाल आहे...
... म्हणून फायर ब्रिगेडचा रंग लाल असतो!!!

आता अँब्युलन्सचा रंग पांढरा का असतो,
याची माहिती पुन्हा कधी तरी!!!

कॉलेजचा पहिला दिवस

मी कॉलेजचा पहिला दिवस अजून सुद्धा आठवत होतो
त्यादिवशी वर जायचं कसं? ह्या भीती मुळे खालीच उभा होतो
खरतर कोणी नाही आहे आपल्या सोबत ह्याचाच विचार करत होतो
मला तर सगळ नवीन आहे, म्हणून फार अडखळत होतो
भीतभीतच का होई ना एक एक करत कॉलेज च्या पायरया चढत होतो
आठवतंय मला वर्गात सुद्धा एकटाच बेंच वर बसलो होतो
सुरवातीलाच काही अविस्मरणीय मित्राची ओळख झाली, धन्यवाद करतो त्यांना,
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

Friday, June 17, 2011

प्रेम करणं सोपं नसतं




सर्व करतात, म्हणून करायच नसतं

चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं

पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं

तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं

एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं

जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं

ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं

करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं

सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं

पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं

फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं

मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं

डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं

आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं

एवढ सगळं करणं खुप कठीण असतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं.......~ C.M. Chinmay Mahajan

कॉलेजची राणी



भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

-- अनामिक कवी

हुस्नबानूची कथा

Previous Chapter                                     Next Chapter


अति प्राचिनकाळी खुरासन प्रांतामध्ये एक लैकिकसंपन्न बादशहा राज्य करीत होता. त्याचे पदरी आठ प्रधान होते. ते कर्तव्यद्क्ष होते. इतर नोकर-चाकरसुद्धा आपले काम दक्षतेने करीत. बादशहाचे नाव होते, कर्दनशाह. कर्दनशाह इतका न्यायनिष्ठुर होता की, न्यायासनापुढे प्रत्यक्ष मुलाचीही तो पर्वा करीत नसे. प्रत्यक्ष राज्यात रहाणारा बरझाक नावाचा अत्यंत धनवान व उदार अंत:करणाचा सौदागर, राजाचा जिवलग मित्र होता. बरझाकला फक्‍त एकच कन्यारत्‍न होते, तिचे नाव हुस्नबानु.

Wednesday, June 15, 2011

Best Non-Vage Places in PUNE


१. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३०

झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण.

मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile

पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे.







२. आवारे लंच होम - पुणे ३०

चिकन/मटण थाळी.

सन १९०१ पासुन सातत्याने गर्दी खेचणारी ही मांसाहारी खानावळ केवळ अप्रतिम चवीचे चिकन मटण देते. एका हाताने नाक डोळे पुसत आणि दुसर्‍या हाताने रस्सा भुरकत जेवण्याची इथली मजा औरच.

पत्ता: अलका टॉकिजच्या चौकातून कुमठेकर रस्त्यावर आल्यानंतर काहीसं पुढे येऊन उजव्या हाताला पहात जावं, कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावर ताबडतोब दिसेल, जोंधळे चौक





३. निसर्ग [मासे]

पत्ता: कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ला डावीकडे वळाल्यावर एक सर्कल लागते तिथे उजव्या हाताला


हातीमताई : परोपकारी राजा हातिम


पूर्वी एकेकाली येमेनचा बादशहा तई याने खूप वर्ष राज्य केले. आपल्या अलकिरससा नावाच्या चुलत्याच्या कन्येशी विवाह केला. पूढे ब-याच दिवसांनी त्यांना एक सुंदर मुलगा झाला. त्यावेळी बादशहाला अतिशय आनंद झाला. त्याने आनेक पंडितांना बोलावून म्हटले की, ’आपल्या पंचांगात पाहुन याचे अचूक भविष्य सांगा.’ त्या सर्व विद्वानांनी त्याची पत्रिका तयार केली व ती पाहिल्यावर बादशहास सांगितले की, ’खुदावंत! आमच्या मते हा राजपुत्र बादशहा तर होईलच, पण त्याशिवाय तो आपले सारे आयुष्य परोपकारात घालवून पुण्यसंचय करील. प्रत्यक्ष विधात्याचेच कार्य केल्यामुळे याचा किर्तीरूपी सुगंध आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत चोहीकडे दरवळत राहील.’ हे ऎकुन बादशहा एकदम खूश झाला. त्याने ह्या लोकांना खूप जडजवाहीर व मोहरा देऊन निरोप दिला.

आयुष्य....

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
प्रवाहासारखं...येईल त्याला सोबत घेत जाणं..........

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
थोडसं रडणं आणि खूपखुप हसणं.......


मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
एकटं येऊन गर्दीत जगून पुन्हा एकटं निघून जाणं........


मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
स्व:तची विसरून दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणं.......


मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
भूतकाळाच्या गोड आठवणीं सोबत वर्तमानात जगणं.......
-- अनामिक कवी



Tuesday, June 14, 2011

पुरुषांनी मांडी घालून जेवायला का बसावे ?

अ. ‘जेवतांना पुरुषाने सुखासनात (मांडी घालून) बसावे. सुखासनात बसल्यामुळे जिवाच्या देहातील सूक्ष्म-वायू आणि त्यांचे प्रवाह सुरळीतपणे कार्यरत होतात. तसेच जिवाच्या देहात असलेले त्रिगुण हेही काही प्रमाणात स्थिर होतात. त्यामुळे जिवाने ग्रहण केलेली भोजनातील सात्त्विकता त्याच्या देहात सहजतेने ग्रहण होऊन स्थूलदेह आणि प्राणदेह यांना आवश्यक मात्रेत ऊर्जेचा पुरवठा होतो.’ - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.६.२००७, दुपारी ३.३५)


आ. ‘मांडी घालून जेवावयास बसल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. मांडीच्या विशिष्ट अवस्थेमुळे अन्न पोटात चांगले घुसळले जाते. पुढे वाकून जेवावे लागत असल्याने पोटाचे स्नायू वारंवार आकुंचन आणि प्रसरण पावतात अन् त्यामुळे पचनाला आवश्यक असणारा रक्तपुरवठा वाढतो. तसेच अन्न ग्रहण करीत असतांना निर्माण होणारा वात (गॅस) बाहेर पडायला साहाय्य होते.

आयुर्वेद: परंपरा आणि ग्रंथसंपदा




आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
  • इतिहास

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवानधन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.

भोजनाशी संबंधित आचार


‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’ हा श्लोक उच्चारून एकाच वेळी जेवावयास बसत. या सर्वांना 
चार-पाच दशकांपूर्वी कुटुंबातील सर्व जण जेवणापूर्वी हात-पाय आणि तोंड धुऊन, पाटावर मांडी घालून,  
घरातील स्त्रिया
जेवण वाढत. पाट-पाणी घेणे, पानात योग्य ठिकाणी योग्य अन्नपदार्थ वाढणे यांपासून ते उष्टी
काढून भूमीला शेण लावण्यापर्यंत सर्व कृती मुला-मुलींना शिकवल्या जात. आता मात्र एकत्र कुटुंबव्यवस्थेचा 
र्‍हास, आधुनिकतेचा प्रभाव आणि गतीमान जीवनशैली यांमुळे या सर्वांचा विचार कुठे होतो ? भोजनाशी 
संबंधित नित्य आचार स्वतः पाळणे आणि ते पुढच्या पिढीला शिकवणे जवळजवळ  थांबलेच आहे. 
भोजनाशी संबंधित आचार पाळणे का आवश्यक आहे ? ‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार,
आध्यात्मिक संस्कारांचे मूळही सात्त्विक आहारात दडले आहे. आहार सात्त्विक असण्याच्या जोडीलाच 
तसे कर्म’, असे म्हटले जाते. कर्म जर उत्तम असेल, तरच जिवाची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते; म्हणून  
अन्नसेवनामागील भावही महत्त्वाचा आहे. ‘अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे’, असे मानून ते ‘देवाचा प्रसाद’ म्हणून 
प्रार्थना आणि नामजप करत ग्रहण केल्याने ते एक पवित्र यज्ञकर्मच बनते. असे करणे, ही साधनाच आहे.

भोजनाच्या वेळचे आचार




अ. उजव्या हाताने भोजन करावे. लहान मुलांनाही उजव्या हातानेच जेवण्याची सवय लावावी.
आ. घास घेतांना पाचही बोटांचा वापर करावा. काट्या-चमच्याने खाणे शक्यतो टाळावे.

इ. वरण-भात आणि त्यावर तूप यांच्यापासून जेवणास प्रारंभ करावा. जेवणाच्या प्रारंभी जड, स्निग्ध,गोड, शीत आणि घट्ट पदार्थ खावेत. जेवणाच्या मध्ये आंबट अन् खारट पदार्थ खावेत. जेवणाच्या शेवटी तिखट आणि कडू पदार्थ खावेत.
ई. जेवतांना प्रत्येक घास अनेकदा (३२ वेळा) चावून खावा.
उ. जेवतांना मध्ये मध्ये पाणी प्यावे.
उ १. भांड्याला तोंड लावून पाणी प्यावे.
उ २. डाव्या हातात पाण्याचे भांडे धरून आणि उजवा हात पालथा करून खालच्या दिशेने उजव्या हाताचा

Saturday, June 11, 2011

45+ Most Wanted Beautiful Free Hand Drawn Fonts

One of the trends in creating site designs right now are in Hand Drawn Concept. And talking about Hand Drawn Design, using a Hand Drawn Fonts is mostly a must to match the design. On this matter I list down 45+ Most Wanted Beautiful Free Hand Drawn Fonts. This are the most popular hand drawn fonts that used on the web and free to download. Most of these are available under a Creative Commons License. Make sure to check details before using for commercial use.

FFF Tusj

2

Grutch Shaded

1

Friday, June 10, 2011

Free Photoshop Actions for photo manipulation

Photoshop actions can be a tremendous time-saving tool for designers and photographers. You can either create your own actions or take advantage of the many that are freely available from the community of Photoshop users. This post is a collection of 60 actions (actually more since many of them contain multiple actions) for touching up or enhancing photographs.

Free Photoshop Actions:

Photo Colouring 11.2
Photoshop touchup actions
Soft Touch Action

भिजलेल्या पावसाची कविता भिजलेली..!!...


काही नाही थोडा पाऊस पडत होता,
थोडासा भिजलो, कपडे भिजले,
हात ओले,
mobile ओला,
काय नवल message boxes पण भिजलेले,,
type करू लागले तर बोटे पण भिजलेली,
मग काय..?
लिहिलेले शब्दपण चिंब भिजलेले,
मग प्रेमात चिंब भिजलेल्या माणसांना,
हि भिजलेली कविता पाठवली,
कविता वाचणारी माणसे सुद्धा स्वप्नात भिजलेली,
तेव्हा लक्षात आले अरे हि तर भिजलेल्या पावसाची कविता भिजलेली..!!...
 
कुठेतरी छानसे वाचलेले

Wednesday, June 8, 2011

वडील

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
...वडील होऊन राहतात कवच
सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात
ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात
दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही

एकच साद, ती पण मनापासुन...

एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...

एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग...............

अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणार्‍या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.''

Difference Between Girls & Boys.............


मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!!
मुलगी 2 :: काय ?????
मुलगी 3 :: तो कसा दिसतो ????
मुलगी 4 :: तो काय करतो ?????
मुलगी 5 :: किती उंच आहे तो ?????
मुलगी 6 :: डोळ्याचा रंग ?????
मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण आहेत ?????
मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे ?????

सर्व मुली ::: सांभळून रहा ह , कदाचित तो वाईटही मुलगा असू शकेल. ???????


Tuesday, June 7, 2011

अमर आलिंगन.......


रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो ;
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
" चहा घेणार का तुम्ही? " असं मला म्हणाली ;
मी तिच्याकडे न बघताच "हो " म्हणालो ,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;
माझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला ;
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;
मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,
तिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,

Sunday, June 5, 2011

एकदा दोरा म्हणे मेणबत्तीला.....

एकदा दोरा म्हणे मेणबत्तीला,
अंधारात मंदपणे उजळताना,
"कागं अशी रडतेस, पाहुन मला जळताना?"

मेणबत्ती म्हणे दोऱ्याला,
..."दु:ख होतं मनस्वी, पाहुन तुला जळताना, ह्रुदयात सामावुन घेतलं ज्याला, त्याचं आयुष्य ढळताना!.....

ते दिवस किती छान वाटतात ....

ते दिवस किती छान वाटतात ....
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....

फरक कुठे पडला आहे..........

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers