skip to main |
skip to sidebar
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवरव प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसेअनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसेक्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरीअसले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखेविशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीचतर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पासकरण्याचा तो वेळ नाही…….
0 comments:
Post a Comment