वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं.......
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
प्रवाहासारखं...येईल त्याला सोबत घेत जाणं..........
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
थोडसं रडणं आणि खूपखुप हसणं.......
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
एकटं येऊन गर्दीत जगून पुन्हा एकटं निघून जाणं........
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
स्व:तची विसरून दुसर्याच्या आनंदात आनंद मानणं.......
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
भूतकाळाच्या गोड आठवणीं सोबत वर्तमानात जगणं.......
-- अनामिक कवी
0 comments:
Post a Comment