skip to main |
skip to sidebar
रोजसकाळी bus stop वर ७ च्या गाडी ला ,
उभी असते ती जशी,
दिसावी ती म्हणून रोज, तिच बस पकडतो.
तिच्या मागे चढण्यासाठी मी लाईनहि तोडतो.
कधी सलवार, कधी जीन्स, कधी मिडी, कधी साडी.
हतात म्याचींग पर्स अन डोळ्यावर गॉगलची काडी.
पिंगट कर्ली केस तिचे अन कपाळावर फ्लिक्स.
हातात म्याचींग घड्याळ अन चपला हाय हिल्स.
बस येताच ती पुढे सरकते, मीही चढतो घुसून मधेच.
गर्दीत तिच्या मागेच रहातो, तिच्या destinetion चा अंदाज घेत.
perfum च्या गंधात तरंगत, तिच्या पिंगट केसांना नजरेनी कुरवाळतो.
तिच्या ओझरत्या स्पर्शानी मोहरत, गुलाबांच्या बागेत मी फिरतो.
पुढच्या stop ला तिला window seat मिळते.
मी बसायच्या आधीच तिच्या शेजारची seat भरते.
मागच्या seat वर बसून मग तिला बघत रहातो.
ती उतरलेल्या stop वर मीही उगाच रेंगाळतो.
रोज बघून बघून तीही आता ओळखायला लागली.
माझ्या कडे बघून एकदा हसल्या सारखीही वाटली.
मझ्या शेजारच्या seat वर स्वताहून बसायला लागली.
कधी माझ्या साठी शेजारची seat हि ठेवायला लागली.
सुट्टे पैसे देण्या घेण्यात मी ओळख वाढवत नेली.
hallow, कस काय? ठीक आहे ना? इथवर मजल मारली.
नाव विचारल अन मैत्री आहो वरून ए वर आली.
आशीच एका संध्याकाळी मग सहज कॉफीहि झाली.
कधीतरी एकटीला गाठायची मनाला ओढ लागली.
मनातल्या मनात propose करायची practice चालू केली.
जुळून यावा योग म्हणून request देवाला केली.
पावसानी तेंव्हा अवचित येऊन दोस्ता सारखी help केली.
उभी होती पावसात, भिजत, बसची वाट बघत.
चिंब भिजलेल्या सौंदर्यानी पावसात आग लावत.
taxi घेऊन मी perfect timing ला तेथे पोचलो.
"चल लवकर, बस आत" दार उघडून मी म्हणालो.
भिजलेली ती बसली शेजारी अन हवा धुंद झाली.
तिच्या ओल्या सौंदर्यानी hart bits तेज झाली.
ती हवा, ते संगीत अन ती भिजलेली संध्याकाळ,
rap music , भिजलेली ती, मी, अन तो पाऊस बेभान.
तिच्या धुंद श्वासांनी मी असा romantic झालो.
घेऊन हातात हात, तिच्या डोळ्यात पहात मी म्हणालो.
"तुझ्या सौंदर्याचा मी खरा भक्त आहे, तुझ्या
क्षणाच्या सहवासा साठी माझ life कुर्बान आहे."
ऐकल हे अन ती गोड गोड हसली.
घेऊन माझा हात हतात ती म्हणाली.
thank you dear for offiring your life .
but ..... my rate is only 10 ,000 full night .
फिरायला A /c car , अन रहायला hotel five star .
dinner intercontinental अन वर स्कॉच ची धार.
मैत्री खातर 40% friendship discount देतेय.
तरी सुद्धा 100% satisfaction ची garentee घेतेय.
असेल वेळ तुला तर सांग, मी आज फ्री आहे.
नसेल तरी हरकत नाही, एक appointment waiting आहे.
बघून माझा चेहरा गोरामोरा, ती काय ते समजली.
घेतला गालगुच्चा माझा अन टाटा करून निघून गेली.
जिच्या साठी झुरत होतो ती कधीही available होती.
तरी सुद्धा माझ्या मनाला ती ख़ुशी खुलवत नव्हती.
नियतीचा हा खेळ बघून माझ डोकच चालत नव्हत.
ह्या प्रकारात माझ नक्की काय हरवल, समजत नव्हत.
बरेच दिवस मग मला घरातच कोंडून घेतल
दारूच्या नशेत स्वतःला पार बुडवून टाकल.
दहाव्या दिवशी तिचा फोन मी पुन्हा कट केला.
दुसर्या दिवशी मग ती स्वतः आली भेटायला.
हे शरीर नसलं तुझ्या साठी तरी मन exclusivly तुझच आहे.
मी अनेकांची राणी असले तरी माझा राजा तूच आहेस.
म्हतार शरीर वासना संपवेल, प्रेम मात्र चिरंतन टिकेल.
ह्या जन्मी हरलो राजा, पण पुढचा जन्म आपलाच असेल.
घेऊन जवळ मला तीही खूप रडली.
मला धीर देता देता तीही पार खचली.
बाहेर पावसानी धरणी ओली, आत अश्रूंनी डोळे.
जमीन तृप्त पावसानी, मात्र अश्रूंनी व्याकूळ माने.
बघून तडफड तिची, मीही जरा सावरलो.
तिला सावरण्या करता कुशीत तिच्या शिरलो.
पाऊस थांबला, कोरडी धरणी, पण प्रेमानी चिंब मने.
खर्या प्रेमाला न उरले आता देहाचे ही अडथळे.
आजही आम्ही बसनी बरोबरच येतो, शेजारी बसून.
तीही तशीच माझ्याशी बोलत असते मनापासून, हसून.
मनात मात्र माझ्या एकच विचार येतो...........
ह्याला तिचं निरागस प्रेम समजू का माझा प्रेमभंग ?
कोणी ह्या प्रश्नाच कवितेतच उत्तर देईल का?
0 comments:
Post a Comment