गणपतीला आणायला रंगीत गाडी
गाडीला जोडली उंदराची जोडी
...उंदराच्या जोडीला चिमुकले कान
दादा मला एक गणपती आण
गणपतीला बसायला रंगीत पाट
पाटापुढे वाढले चांदीचे ताट
ताटापुढे थोडीशी रांगोळी काढ
दादा मला एक गणपती आण
गणपतीच्या ताटामध्ये मोदकाचा मान
त्याच्यावरी ठेवले तुळशीचे पान
नैवेद्य नको त्याला हाताने चार
दादा मला एक गणपती आण
बुद्धीची देवता ती फार विदवान
डोक्यावरी माझ्या इथे गणिताचा ताण
सांगून त्याला, माझा भवसागर तार
दादा मला एक गणपती आण
गणपतीच्या दर्शनाला भक्तांची रांग
सर्वांना हवे तुझ्या काळजामध्ये स्थान
अक्षम्य चुका माझ्या पोटात घाल
नि जागा माझी पिट्टूशा उंदरापाशी मांड
दादा मला एक गणपती आण
गणपतीला नको माझ्या ,डॉल्बी नि ढोल
सुपाएवढया कानांमध्ये आवाज जाई खोल
फटाक्यांच्या धुराने डोळे होई लाल
गणपतीला आवडी वीणा नि टाळ
भजनाच्या साथीला माझ्या कवितांचा ताल
दादा मला एक गणपती आण
गणपतीच्या विसर्जनाला झिन्ग्नार्यांची रीघ
तळाशी नदीच्या मुर्त्यांचा ढीग
नका रे रोखू त्याच्या श्वासांची लय
हवे त्यासी आपुल्या प्रेमाचे गीत
जोपुया सारे एकतेची रीत
दादा मला एक गणपती आण
0 comments:
Post a Comment