शाळेत प्रवेश घेताना पन्नास दा विचार केला आम्ही raao,
बेस्ट शाळेतच मी प्रवेश घेत आहे ना कि आहे एक फडतूस शाळा राव ??
...माझी निवड चुकली तर नाही ना राव ???
शाळेत मित्र जोडताना त्याच संभ्रम अवस्थेत जगलो आम्ही राव,
मित्र धोका देणार तर नाही ना हा विचार करत राहलो राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
दहावीत मेरीट मध्ये येवून पण शंका काही पाठलाग सोडेना राव,
घेतला प्रवेश सायन्स ला विचार करत करत राव,
कोठल्या कोलेज मध्ये प्रवेश घ्यावा हा विचार करत रात्री जागून काढल्या राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
बारावी ला पण मेरीट गाठलं पण विचाराचे थैमान सुरु झाल राव,
मेडिकल कि अभियांत्रिकी, वेडे झालो काय करावे सुचत नव्हत राव,
हिम्मत करून घेतली अभियांत्रिकी....... पण मन काही मानत नव्हत राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
कोलेज निवडी मध्ये पण तीच गत.... कुठल करू सेलेक्त यात लागली वाट आमची राव,
संभ्रम आवस्थेत केले कोलेज सेलेक्त एक खास,
आता शाखा कोठली घ्यायची यात लागली आमची वाट,
यांत्रिकी अभियांत्रिकी घेवून केली तर चूक नाही ना राव ,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
कोलेज मध्ये एवढ्या मुलीत गर्ल फ्रेंड सेलेक्सन पण होत अवघड काम,
सौंदर्य कि बुद्धिमता, विचार करून करून थकून गेलो आम्ही राव,
थकवा आला तर डोळे बंद करून निवडली एक ललना राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
अंतिम वर्षी केम्पस मुलाखतीती कोणती कंपनी सेलेक्त करावी याचा डोक्याला ताण,
चांगला पगार आणि नावाजलेली कंपनी सेलेक्त केली आम्ही राव,
कंपनी जावून जोब प्रोफाईल काय घ्यावा यावर पण झाले आम्हला कान्फुजन राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
नौकरी मिळाली आता बायको हवी होती आम्हाला राव,
पन्नास जागी कांद्या पोह्याचा प्रोग्राम केला आम्ही राव,
थकून मग निवडली एक सभ्य आणि सुगरण लावण्यवती आम्ही राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
0 comments:
Post a Comment