Demo Site

Monday, July 18, 2011

Post Automatically to Facebook and Twitter from Google+



Do you love to share good contents with your friends on twitter and facebook ? Are you on Google+  ? If theanswer to both is yes , then here is a tool that lets you share your posts to twitter and facebook automatically whenever you post it on Google +

Start G+ is a Google Chrome extension , whenever you post something on Goggle+ , this plugin automatically post it to twitter and facebook . After you have successfully installed the plugin , next time you shareanything on Google+ you will see the twitter and facebook button below the share box  . To toggle sharing just click on the button .

आप-आपला चन्द्र

नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो

बर याला प्रेम म्हणाव, तर
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतच प्रेमात पड्लेल्या त्या दोघानकडून
अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात,

अश्याच समाजकन्टकामुळे, प्रत्येकजन प्रेमात रखड्लेला असतो,
तरी, प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो

Friday, July 15, 2011

माझे बाबा

आज गुरुपौर्णिमा ....
माझे आवडते गुरु म्हणजे माझे बाबा..
म्हणून एका
बाबांवर पण एका लहान मुलींच्या स्वरूपातील कविता आहे...
 

तिने चांगला मेकअप केला होता
व तिचा आवडता ड्रेस घातला होता
तिच्या शाळेत आज दिवस होता खास
सगळे आपल्या बाबांना घेऊन येणार होते आज

गुरुपौर्णिमा - गुरू पूजनाचा दिवस

आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.

Wednesday, July 13, 2011

मराठी हुशारी...!!!

एकदा बिल गेट्स मायक्रोसोफ्ट साठी नवा चेअरमन शोधायचा असतो..!!!
तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!
त्यातला एक असतो आपला “संकेत”
बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट करून लिहीत आहे समजदार समजून जातील)

पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५१ वर्षे पूर्ण ...

नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम....

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५१ वर्षे पूर्ण होत्तात.

पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली.

Monday, July 11, 2011

आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास


पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करा...वा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्यदैत्याला मारले. ही जी शक्तीदेवीतीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers