Saturday, October 2, 2010
मनुष्य स्वभावाचा अनोखा वेध
मेयर ब्रिग्ज टाइप इंडिकेटर (एमबीटीआय) या चाचणीमुळे सी. जी. जुंग यांनी मांडलेले सिद्धान्त सामान्य माणसाच्या आकलनात आले आहेत.
जग हे अनेक अद्वितीय माणसांनी खच्चून भरले आहे; परंतु जेव्हा व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न येतो तेव्हा फक्त चार वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोळा प्रकारची माणसे आढळतात. या स्वभाव वैशिष्ट्यांना समजावून घेणे हीच आपल्या आयुष्याची उद्दिष्टे गाठण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. "मेयर्स ब्रिग्ज परसोनॅलिटी टाइप' ही जगावेगळी आणि अत्यंत प्रभावशाली चाचणी आहे. ही चाचणी ७० वर्षांच्या संशोधनावर आधारित आहे. दोन दशलक्ष माणसे दरवर्षी ही चाचणी करून घेतात. जगातील १९ भाषांमध्ये या चाचणीची भाषांतरे झाली आहेत. इसाबेल ब्रिग्ज मेयर आणि कॅथरिन ब्रिग्ज या मायलेकींनी "सायकॉलॉजिकल टाइप्स' या कार्ल जुंग यांच्या पुस्तकाने प्रभावित होऊन १९४० साली ही चाचणी विकसित केली आहे. या मायलेकींच्या मते भिन्न भिन्न व्यवसायासाठी भिन्न भिन्न स्वभावाच्या माणसांची आवश्यकता असते आणि जुंग सिद्धान्त मनुष्य स्वभाव आणि कामातील कार्यक्षमता त्यांची योग्य सांगड घालतो. १९७५ पासून ही चाचणी मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागली आहे.
चाचणीमागील सिद्धान्तया मागील सिद्धान्त असा आहे की, जगातील सर्व माणसांची विभागणी केवळ १६ प्रकारच्या व्यक्तिमत्त्वात करता येते आणि ही विभागणी व्यक्तिमत्त्वातील चार लक्षणांवर आधारित आहे. प्रत्येक लक्षणात दोन परस्पर विरोधी पसंती येते. या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक माणसात एक सहजप्रेरणा असते की ज्यामुळे प्रत्येक परिस्थितीत तो कसा वागेल याचा अंदाज घेता येतो, ठरवता येते. ती चार मोजमापे अशी आहेत.
१) बहिर्मुख विरुद्ध अंतर्मुख (Extraversion vs Introversion - EI)यावरून व्यक्तीचे परिचयात्मक आकलन कसे आहे हे समजते. बहिर्मुख व्यक्ती परिस्थितीचा ताबडतोब आणि वस्तुनिष्ठ सामना करतात, तर अंतर्मुख आपल्या समोरच्या परिस्थितीचा सामना आपल्या आत डोकावत आत्मनिष्ठ होऊन करतात.
२) संवेदनशील विरुद्ध अंतर्ज्ञानी (Serving vs Feeling - SF)संवेदनशील माणसांचा अग्रक्रम काय असेल याचा अंदाज यावरून करता येतो आणि तो वास्तवतेच्या बऱ्याच जवळ असतो. जी माणसे पुढाकार घेऊन काम करतात ते बहुधा आपल्या अज्ञात आणि सुप्त शक्तींतून येणाऱ्या प्रेरणांवर विसंबून निर्णय घेतात.
३) विचारी विरुद्ध भावनात्मक (Thinking vs Feeling - TF)कोणतेही काम करताना त्यांची योग्य दिशा ठरविण्यासाठी हा अग्रक्रम असणारी माणसे तर्कशुद्ध विचार आणि राहणी, समजूतदार प्रक्रियांची निवड करतात. अयोग्य गोष्टी बाजूला सारून योग्य गोष्टींची कास धरतात. भावनात्मक गोष्टींना प्राधान्य देणारी माणसे मात्र आपल्या क्रिया वा प्रतिक्रिया तात्कालिक घटनांवर अवलंबून ठेवतात.
४) चिकित्सक विरुद्ध आकलन (Judgment vs Perception - JP)चिकित्सक आकलन हा अग्रक्रम ब्रिग्ज आणि मेयर्स यांनी शोधून काढला. यामुळे एखाद्या प्रसंगी वागताना माणूस सयुक्तिक किंवा अयोग्य वागतो आहे की नाही, हे स्पष्ट करता येते. चिकित्सक माणूस निर्णय घेताना विचार आणि भावना यांचा मेळ घालतो किंवा आकलनावर जोर असणारा माणूस संवेदना आणि अंतर्ज्ञान यांचा वापर करणारी प्रक्रिया वापरतो. प्रत्येक माणसाला दोन चेहरे असतात. एक बाहेरच्या जगाकडे झुकणारा म्हणजे जगात प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना, खळबळी, लोक आणि इतर गोष्टी, तर दुसरा आतल्या जगाकडे झुकणारा. स्वतःच्या विचारांचे जग, कुतूहल, हितसंबंध, प्रतिभा, कल्पना आणि स्वप्ने. आपल्या स्वभावाच्या या वरवर विरोधी वाटणाऱ्या; परंतु एकमेकाला पोषक अशा बाजू आहेत. काही लोक असे असतात की ते आपल्या बाहेरील शक्तीवर विसंबून असतात तर काहींचा कल आपल्या अंतर्गत शक्तीकडे असतो. यातील पहिल्या चेहऱ्याला बहिर्मुख तर दुसऱ्याला अंतर्मुख म्हणून ओळखले जाते. यापैकी एकाची मोठी छाप आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडते.
या व्यक्तिमत्त्वातील तुलना अशी करता येईल.
आपल्या मेंदूचा संवेदनशील Sensing (s) दृश्य गोष्टी, आवाज, गंद आणि संवेदनशील गोष्टी घडणाऱ्या घटनातून पटकन पकडतो. त्यांचे पृथःकरण करतो. त्यांचे संघटन, रचना करतो. त्यांची नोंद ठेवतो आणि या प्रत्यक्ष घटना जशा घडतात, तशी त्याची नोंद करून ठेवतो. त्या साठवून ठेवतो आणि या घटना मागील स्मृतीतील घटना आवश्यकता भासेल तेव्हा आपल्याला स्पष्टपणे आठवण्यास मदतही करतो.

Subscribe to:
Posts (Atom)