Demo Site

Saturday, September 24, 2011

अंतिम युद्ध


   अचानक  कोणत्यातरी धक्यामुळे नम्रताला जाग आली.जाग आली म्हणजे तिला तसा वाटले पण डोळे उघडायला तयारच नव्हते. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले . तिला वाटले आपण आताच तर झोपलो होतो इतक्या लवकर सकाळ कशी झाली . तिने डोळे चोळत इकडे तिकडे बघितले . तिला एकदम थंड स्पर्श जाणवला . तिने बघितले  तर ती एका फारशी वर झोपली होती . तिला थोडे आश्चर्य वाटले . झोपताना तर ती तिच्या रूम मध्ये पलंगावर झोपली होती . त्या खोलीचा काहीच पत्ता नव्हता . ती ज्या जमिनीवर झोपली होती ती जमीन जुन्या काळ्या दगडांची होती . ते दगड एकमेकांत बसवले होते . जमिनीतील दगड वापरून अगदी गुळगुळीत झाले होते . बघून कोणालाही समजले असते कि एकेकाळी इथे माणसाचा बराच वावर असला पाहिजे . तिला समोरच  काही अंतरावर एक वस्तू दिसली . ते एक जुने पडके मन्दिर होते .म्हणजे उरलेले भग्नावशेष तिथे होते .   त्यावरून ती जी वस्तू दिसत होती तिला मंदिर असे म्हणू शकतो. ती वस्तू बरीच शतके जुनी असल्यासारखी दिसत होती . जमिनी प्रमाणेच  पूर्ण काळ्या दगडात बांधलेली. प्रवेशदारा समोरच दोन सिंहाचे पुतळे होते . पण पण त्यांच्या डोक्यावर हे काय आहे ? त्यांची डोकी सिंहा सारखी  नक्कीच

Friday, September 23, 2011

ज्ञानयोग

ज्ञानाच्या साधनेने आजचा अवाढव्य विश्वविस्तार आपण अनुभवत आहोत. अर्थात याचे बरेवाईट परिणाम भोगतो आहोत. आदिमानवाच्या काळापासून ज्ञानोपासना सुरू आहे. अ‍ॅडमनेही ज्ञानाचे फळ चाखले. ते त्याला पचले नाही, परंतु माणसाने यातून पचनशक्ती वाढवली. ज्वलंत विस्तवही त्याने पचविला. त्याची ओळख करून घेतली. त्याच्या साहाय्याने उपजीविकेची साधने त्याने गोळा केली. अग्नीचे ज्ञान हा मानवाच्या प्रगतीतला मौलिक टप्पा होता. ‘अग्नीमिळे पुरोहितम्’ या प्रख्यात वैदिक ऋचेतून अग्नीची देव म्हणून स्तुती केलेली आहे.
‘‘तुम्ही स्वत:ला ओळखा’’ हे खरे ज्ञान आहे. तेच कठीण आहे. महर्षी याज्ञवल्क्य म्हणतात, ‘‘न वा अरे सर्वस्य कामाय र्सव प्रियं भवति। आत्मनस्तु कामाय र्सव प्रियं भवति।।’’ सर्व व्यापक परमेश्वराचा विलास म्हणजे हे जग आहे, याची जाणीव होणे हे खरे ज्ञान आहे. हे ज्ञान एकदा झाले, की भूतमात्रात परस्पर जिवाचे मैत्र जडते. आपण विश्वाचे घटक आहोत. विश्वात्म्याचे अंश आहोत ही जाणीव ज्ञानयोगाची सूचक आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे उद्गार इथे स्मरतात. ते म्हणतात, ‘‘ईश्वरा, माझ्या वागणुकीत तू प्रकट हो.’’ जगातली दु:खे, मत्सर, हेवेदावे अज्ञानमूलक आहेत. कार्यकारणभावाच्या यथार्थ ज्ञानाने हे समजावे. सर्व कर्माचा शेवट ज्ञानात होतो. ‘ज्ञानी माझा आत्मा आहे’ असे भगवान गीतेत सांगतात. सारे योग शेवटी ज्ञानयोगात मिळतात. ईश्वरी ज्ञान आणि साक्षात्कार यात येतो. ज्ञानयोगाची ही महानता मान्य करून एक प्रश्न पडतो. ज्ञानाने अनेक थोरामोठय़ांना जगापासून, व्यावहारिक जीवनापासून अलग-अलिप्त ठेवले. यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जगाला व्हावा तसा झाला नाही. (काही सन्मान्य अपवाद सोडा.) योगी अरविंदांनी ज्ञानयोगाला जगाच्या माजघरात आणले. त्याच्या सामर्थ्यांतून विश्वाला पूर्णयोगी केले.

Tuesday, September 20, 2011

बोलावणे आले की ...!

सगळ्याच घटना कशा झटपट घडत गेल्या. दोन आठवड्यापुर्वी सुशिक्षीत बेकार असलेला सन्मित्र भार्गव आज मात्र एका दोनशे एकर पसरलेल्या फार्म हाऊसचा मॅनेजर होता. महिना चक्क आठ हजार रुपये पगार मान्य केला होता माणिकरावांनी.गंमतच आहे नाही.
दोन आठवड्यापुर्वी असाच सकाळी (?) ११-११.३० च्या दरम्यान स्थानिक वर्तमानपत्रे चाळत असताना (सार्वजनिक मोफत वाचनालयात- वर्तमानपत्रे विकत घेवुन वाचण्याची ऐपतच नव्हती म्हणा) मधल्या पानावरची ती जाहिरात वाचण्यात आली. खरेतर ती जाहिरात दोन तीन दिवस रोज येत होती. मी वाचलीही होती पण का कोण जाणे दुर्लक्षच केले होते मी तिकडे.
पाहिजे : फार्म मॅनेजर.
फार्महाऊसच्या देखरेखीसाठी विनापाश, अविवाहित सुशिक्षीत तरुण हवा आहे.
राहणे, खाणे व सर्व सोयी पुरवल्या जातील.
पगार व इतर गोष्टी मुलाखतीदरम्यान ठरवल्या जातील.
भेटा: श्री. माणिकराव जामदग्नि, हॉटेल सर्वोदय, रुम नं. १३,
खाली एक फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. एक गंमत म्हणुन मी फोन केला. कोणीतरी खांडेकर म्हणुन गृहस्थ होते त्यांच्याशी बोललो. त्यांनी मागितला म्हणुन आमच्या घरमालकिणीचा नंबर दिला आणि विसरुन गेलो.

आणि चार पाच दिवसांनी असाच दिवसभर उंडगुन रुमवर पोहोचलो. खरेतर मी रात्री ११ च्या आधी कधीच घरी येत नाही. घरमालकिणीचा भाड्याचा तगादा चुकवायचा असतो ना ! स्मित सकाळी सात – साडे सातच्या दरम्यान गपचुप पळ काढायचा आणि रात्री उशीरा सगळे झोपल्यावर हळुच परत यायचं. तसाच आजही आलो तर चंद्या बाहेरच्या पडवीत अभ्यास करत बसला होता. चंद्या म्हणजे आमच्या घरमालकाचं एकुलते एक चिरंजीव. हा पोरगा गेले तीन वर्षे बारावीची परिक्षा देतोय. आजकाल रोज रात्री बाहेर अभ्यास करत बसतो..आई-बाप खुष. बापड्यांना कुठे माहितीये, आपले चिरंजीव रात्र रात्र जागुन कुठला अभ्यास करतात ते. खोटं कशाला बोलु मीच त्याला दर आठवड्याला आशक्याच्या दुकानातुन पिवळ्या कव्हरची पुस्तके आणुन द्यायचो. वाचुन झाली की पठ्ठ्या इमानदारीत परत करायचा, ती परत देवुन दुसरी आणुन द्यायची. त्या बदल्यात दररोज रात्री तो माझ्यासाठी घराचा मुख्य दरवाजा उघडुन द्यायचा.
तर त्या दिवशी परत आलो तेव्हा चंद्या बसलाच होता अभ्यास (?) करत. मला बघताच म्हणाला,” सन्म्या, तो कोण खांडेकर तुझ्यासाठी पेटलाय बघ फोनवर. सकाळपासुन चारवेळा फोन आलाय त्याचा. आईसाहेब तर सॉलीड पेटल्या आहेत. उद्या पुन्हा फुलं पडणार तुमच्यावर !
मी कशाला थांबतो घरात? सकाळी ६ वाजताच गुल झालो. ९.३० च्या दरम्यान पुन्हा खांडेकरला फोन केला. तर घरमालकिणीची कसर त्या भ@#ने भरुन काढली. माझ्या आणि मालकिणबाईच्या दोघांच्या नावाने मनापासुन शंख करुन झाल्यावर मग मुद्दलाची गोष्ट सांगितली.”हे बघा उद्या माणिकराव शहरात येणार आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. सकाळी दहा वाजता सर्वोदयला हजर राहा.”
माणिकरावांना भेटलो आणि मग नशीबाची चाकं अशी काय फिरली की यंव रे यंव !

Thursday, September 15, 2011

शिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)


शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ’शिवछत्रपतीचे चरित्र’ ही बखर. ह्या बखरीत केलेल्या उल्लेखानुसार हा ग्रंथ शालिवाहन शके १६१६ (इ०स० १६९४) या वर्षाच्या सुमारास (म्हणजे महाराजांच्या मृत्युनंतर केवळ १४ वर्षांनी) लिहिला गेला असे दिसते. याच्या सत्यासत्यतेबद्दल अर्थातच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण तरीही याचे वाचन सुरस ठरावे.

शेवटच्या ’राज्याची मोजदाद’ या प्रकरणात फारच माहितीपूर्ण व सुरस तपशील सापडतो. कारखाने, महाल, खजिना (सोने-नाणे, कापड-जिन्नस इ०), घोडे, पागा, त्यावेळचे सरदार, शिलेदार, सुभेदार, हत्ती, जहाजे, आरमार, सरदार, गड-कोट-जंजिरे (जुने ५०, शिवाजी राजांनी वसवलेले १११ व कर्नाटक प्रांतातील काबीज केलेले ७९ असे एकूण २४०).
मृणाल विद्याधर भिडे ह्यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक टंकन करून मराठीप्रेमींसाठी उपलब्ध करून दिलेला हा ग्रंथ आपले मित्र श्री० मिलिंद पंडित (सदाशिव पेठ, पुणे) ह्यांनी आपल्याकरिता पाठवलेला आहे.
संपूर्ण बखर खालील दुव्यावर वाचण्यास उपलब्ध आहे.

Saturday, September 10, 2011

’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)



Friday, September 9, 2011

Beginners Guide to DSLR: Choosing the Right Camera for You

Digital Single-Lens Reflex Cameras (Digital SLR/DSLR) most likely defined as a type of digital cameras using a both mechanical mirror system and pentaprism so to be able to direct light from its lens to that of the optical viewfinder found at the back of the camera. This type of Camera has been widely used in the production of quality images in no time since it captures fast. Speed becomes its great advantage. There are many other benefits… many techniques and some other tips we may learn to effectively use it but how do we really choose the perfect DSLR for us?


This post could help answer such a significant question to single out a very important decision. Something that’s worth the price… So here goes a list of Tips to Help How to Choose the Best Camera that Fits You…

Wednesday, September 7, 2011

'आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गेले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.

Saturday, September 3, 2011

गणपती




गणपती
एकदंत.jpg
म्हैसूर शैलीतील गणपतीचे चित्र बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता
मराठी गणपती
वाहन उंदीर
शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत
वडील शंकर
आई पार्वती
पत्नी ऋद्धी, सिद्धी
अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
मंत्र ॐ गं गणपतये नमः
नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण
तीर्थक्षेत्रे अष्टविनायक

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.

पुण्यातील मानाचे गणपती




श्री कसबा गणपती
कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, असे मानतात. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. गणेशोत्सवात श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.

Friday, September 2, 2011

श्री गणेशाची पंचोपचारपूजा

प्रत्यक्ष पूजाविधीत पूजेच्या प्रारंभी करावयाची प्रार्थना
‘हे श्री सिद्धिविनायका, तुझी पूजा माझ्याकडून भावपूर्ण होऊ दे. पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे. तू प्रत्यक्ष माझ्यासमोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे, असा माझा भाव सतत असू दे. पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत. पूजेतील चैतन्य मला आणि सर्व उपस्थितांना मिळू दे.’

कोणत्याही देवतेची पूजा करतांना त्याचे आवाहन करणे, योग्य त्या उपचारांसह स्थापना आणि पूजा करणे आवश्यक असते. हे करतांना करावयाचे विधी, त्यांतील मंत्र आणि त्यांचा अर्थ माहीत असल्यास पूजकाकडून कृती अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकर्षित होऊन पूजकास अधिक लाभ होतो. याच उद्देशाने गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पंचोपचार पूजा येथे देत आहोत. शास्त्रानुसार या पद्धतीने दिवसातून तीन वेळा आणि ज्यांना तिन्ही वेळा पूजा करणे शक्य नसेल, त्यांनी सकाळी अन् सायंकाळी पूजा करावी.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers