तिची हकीकत ऎकुन राजा रागाने लाल झाला आणि म्हणाला, ’गुरुची निंदा करणा-या हिचा ताबडतोब शिरच्छेद करा!’
तेव्हा प्रधानास द्या येऊन त्याने हात जोडून राजास प्रार्थना केली की, ’खुदावंत! आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे हिचे आपण संगोपण केलेत, तेव्हा एवढी भयंकर शिक्षा तिला देऊ नये!’ तेव्हा राजा म्हणाला, ’ठीक आहे! तुमच्या म्हणण्याला मान देऊन मी हिला हद्दपार करून हिची सर्व संपत्ती जप्त करून टाकण्याचा हुकूम देत आहे.’
खरी हकीकत सांगूनही राजाचा उलटा न्याय पाहून बानू अतिशय दु:खी अंतकरणाने आपल्या दाईसह उद्वेगाने अरण्याच्या मार्गाने चालू लागली. पुढे चालून दमल्याने त्या दोघी एका झाडाखाली विश्रांती घ्यावी म्हणुन थांबल्या, बानुला आपल्या पूर्वीच्या परिस्थितीची जाणी झाली व ती दाईस म्हणाली, ’आई! देवाचा असा काय गुन्हा केला आहे म्हणुन ही भयंकर शिक्षा तो मला भोगावयास लावीत आहे.’ तेव्हा दाई म्हणाली, ’बेटी! दैव फिरल्यावर देवाला दोष काय देणार?’
श्रम, तहान आणि भुकेने व्याकुळ झाल्याने त्यांना त्या अवस्थेत झोप लागली, झोपेत बानुच्या स्वप्नात एक दिव्य साधू आला आणि तिला म्हणाला, ’मुली! तू दु:खी कष्टी होऊ नकोस. या वृक्षाखाली अलोट संपत्तीने भरलेल्या सात खोल्या आहेत त्या तुला मी बक्षीस देतो. येथेच एक शहर बसवून तू सुखाने राहा.’ हुस्नबानु दचकून जागी झाली. लगेच तिने दाईला जाने केले आणि आपले स्वप्न सांगितले. तेव्हा तिलाही समाधान वाटले.
त्याप्रमाणे थोडे खणू लागताच द्र्व्य आढ्ळू लागले. परमेश्वरी लीलेचे कौतुक करीत तिने थोडे दाईकडे दिले व बाजारातून आवश्यक त्या वस्तु खरेदी करून आणण्यास सांगितले. पण भीषण अरण्यात बानूला एकटी सोडून जाण्यास ती प्रेमळ दाई तयार होईना.
थोड्याच वेळात एक फकीर रस्त्याने जाताना दिसला. दाईने त्याला ओळखुन हाक मारली. बानूचा चुलत भाऊच होता. त्याला घडलेली सर्व हकीकत सांगून बाजारात पाठवून दिले. त्याने येताना अन्न, वस्त्र, कारागीर व बांधकामाचे साहित्य आणले. त्यानंतर साधूच्या दिव्य संदेशाप्रमाणे शहर वसविण्याचा ती विचार करु लागली. ती राजाची हद्द असल्याने शहर वसविण्यासाठी प्रथम त्याची परवानगी आणा असा सल्ला बानुला कारागिरांनी दिला. त्यासाठी ती बादशहाकडे आली.
0 comments:
Post a Comment