Saturday, November 13, 2010
एक उत्क्रांती अशीही
आमिरचा घजनी आल्याबरोबर बर्याच तरूणांनी 'घजनी कट' मारला. ते पाहून नाक मुरडणारे त्यांचे काका-मामा म्हणाले, "काय ही आजकालची पोरं! काहीतरी फ्याड आहे झालं." अर्थात ते त्यांच्या काळात देव आनंदसारखा केसांचा कोंबडा ठेवत होते ते सोडा. पण खरेच ही गोष्ट फ्याड म्हणून सोडून देण्याइतकी क्षुल्लक आहे का? की यामागे काही वेगळेच कारण आहे? माणूस आणि इतर प्राण्यांमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाकडे संस्कृती आहे. संस्कृती या शब्दाची व्याप्ती बरीच मोठी आहे. भाषा, साहित्य, संगीत यापासून ते रोजच्या फ्याशन किंवा जेवताना पाळायचे नियम हे सर्व संस्कृतीमध्येच येतात. पण उत्क्रांती होताना माणसाला माणूसपण मिळाल्यानंतर हे सर्व नियम कसे अस्तित्वात आले असतील?
Friday, November 12, 2010
टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार
"मला माझ्या दंडावर सिंहाचे तोंड गोंदवून घ्यायचे आहे. " काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्रवर्यांनी आपली इच्छा सहजच माझ्यासमोर मांडली.
"ईईईईव! हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का? आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड

Subscribe to:
Posts (Atom)