परत नम्रताला झोप काही आली नाही. तिला परत परत तेच दृशा दिसत होते. तो आवाज कानात घुमत होता. तिच्या लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या. तिला स्वप्नात दिसला तसा डोंगर, तशी गुहा तिने कुठेतरी बघितली होती पण कुठे ते काही तिला आठवेना. ती आठवण्याचा प्रयत्न करत परत झोपेत जाण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती. नम्रता डॉक्टर झाली होती. ती तिवडे नावाच्या एका छोट्याश्या पाड्यातून आली होती. तिचे गाव रात्नागरी जिल्यातील अदरवाडी गावाजवळ होते. इतकी वर्ष झाली तरी अजून बस काही त्यांच्या गावात आली नव्हती. वीज सुद्धा आता काही वर्षापूर्वीच दाखल झाली होती.
तिला परत परत तोच प्रसंग आठवू लागला. त्या प्रसंगातील गोष्टींशी या स्वप्नाचा काही संबंध असेल का ? तिच्या माहिती प्रमाणे तरी ह्या स्वप्नातील जागा तीच होती ह्यची तिला पक्की खात्री होती तो आवाज तोच होता. नक्कीच . तो आवाज ती कसा विसरू शकत होती .त्या अवजामूळेच तिने आपले गाव सोडून इतक्या लांब येवून राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आज इतक्या वर्षांनी तो आवाज तिला ऐकू यावा हे एक आश्चर्यच होते . काय संबंध असेल ह्या स्वप्नाचा त्या गोष्टीशी,त्या आवाजाशी ? ती लहानपणीचा काळ आठवू लागली . तिच्या लहानपणी गावात वीज नव्हती. गावात चौथी पर्यंत शाळा होती. पुढे शिकण्यासाठी talukya भल्या पहाटे सूर्य उगवायच्या आधी लोक उठून शेतावर जायला निघत.संध्याकाळ झाली कि सगळे आपापली कामे आटपून अंधार व्हायच्या आधी घरात पोहोचत असत. रात्री कंदिलाच्या प्रकाशात बायका जेवण बनवत असत. ती एका पारंपरिक ब्राम्हण कुटुंबातील मुलगी होती. गावात एक जुने काळी देवीचे मंदिर होते. तिचे वडील त्या मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे त्यांना गावात एक विशेष मान होता. त्यांच्या घरात समोरच्या अंगणात रोज संध्याकाळी बैठक भरत असे. बैठक म्हणजे तिचे वडील कोणाच्या अंगात आलेले भूत उतरवत असत. तसे त्यांना जडी-बुटीचे उत्तम जाण होती. पंचक्रोशीतील लोक त्यांच्या कडे येत असत. नम्रताचे घर म्हणजे एक आश्चर्याच होते. तिचे घर म्हणजे घर कमी आणि महाल जास्त वाटत असे. त्याला कारणही तसेच होते. तिचे घर म्हणजे एक मोठा एक मजली वाडाच होता. त्यात ४ कुटुंब राहत होती. चारीही ब्राम्हण कुटुंबे होती. त्यातील त्यांचे कुटुंब वैदिक ब्राम्हण होते. म्हणजे मंत्र पठन करणारे. त्यांच्या घरात कित्येक जुन्या पोथ्या-पुराणे होती. अगदी ताम्रापात्राची बाडेही होती.आजोबांच्या खोलीत हे सर्व बाड होते. आजोबा तिला कधीच कोठल्या पोथ्या वाचायला थांबवत नसत.ते म्हणत असत " वाच पोरी हीच विद्या तुला पुढे उपयोगी येणार आहे. तुझ्या नशिबात की लिहून ठवले आहे ते त्या देवालाच माहित." तेव्हा तिला ह्या वाक्याचा अर्थ संजय नसे. त्यांच्या खोलीत एक मोठी पेटी होती. ती लाकडी पेटी होती.किती जुनी होती कोण जाणे. तिला मात्र आजोबा अजिबात हात लावू देत नसत. तिला म्हणत "पुढे तुला हेच करायची आहे. थोडी मोठी हो.हे सर्व तुझ्या हातातच सोपवणार आहे मी. " तिने आजीला खूपदा विचारले होते कि हा वाडा किती जुना आहे? पण तिला हि माहित नव्हते कि हा वाडा किती जुना आहे ते. तिच्या आजोबांना हि ते माहित नव्हते. फार पुरातन काळातील तो वाडा होता. त्यात अनेक गुप्तद्वार, अनेक गुप्त खोल्या होत्या. पण तिचे आजोबा अमावसेच्या रात्री जंगलात कुठेतरी जात असत आणि रात्री उशिरा परत येत असत. ते एकटेच जात नसत तर वाड्यातील इतर कुटुंबातील प्रमुख व्यक्ती एकत्र जमून जात असत. तिला हे कधी विचारायची हिम्मत झाली नव्हती. आमवासेया आमावास्येच्या रात्री इतका अंधार असे कि डोळ्यात बोट गेले तरी समजायचे नाही.इतक्या अंधारात ते चार जण जंगलात जात असत. एकदा न राहावून ती त्यांच्या मागे जंगलात गेली होती. ती रात्र तिच्या स्मरणात कोरली गेली होती कायमची.
0 comments:
Post a Comment