डेस्कटॉप, लॅपटॉपनंतर आले नोटबुक, टॅबलेट पीसी...पण आता टॅब्सलाही मागे टाकणारे "अल्ट्राबुक' आले आहेत. लॅपटॉप आणि टॅब पीसीचे कॉम्बिनेशन म्हणून "अल्ट्राबुक'कडे पाहिले जात आहे. सुरू होण्यासाठी (बूट) काही मिनिटांचा वेळ घेणारे लॅपटॉप आणि कायम ऑन असलेले टॅब्स याचा सुवर्णमध्य साधत, अल्ट्राबुक डिव्हाइस काही सेकंदांतच सुरू होतो, आणि एकदा चार्ज केले की त्याची बॅटरी तब्बल दहा तास चालते. "विंडोज 7' वर चालणारा हा डिव्हाइस म्हणजे 0.8 इंच जाडी असलेला परिपूर्ण कॉम्प्युटर आहे. कशामुळे हा अल्ट्राबुक एवढा फास्ट काम करू शकतो? इंटेलच्या "सॅंडी-ब्रीज प्रोसेसर' (कोअर ळ3 पासून ळ7) आणि यूएसबी 3.0 पोर्टची कमाल आहे. अन्य कॉम्प्युटरचे प्रोसेसर इंटेलच्या तुलनेत फारच स्लो आहेत. यूएसबी 3.0 मुळे डेटा ट्रान्स्फरचा स्पीड दहापटीने वाढलेला आहे. म्हणजे एखादी वीस पंचवीस जीबीची फाइल काही सेकंदांतच ट्रान्स्फर होऊ शकते. आणि यूएसबीच्या आधारे डिव्हाइस चार्जिंग करायला वेळही खूप कमी लागतो. अल्ट्राबुकमध्ये "बॅक-लिट कीबोर्ड'ही वापरायला मिळतो.
पण ही सगळी ऐश करायला पैसेही तितकेच मोजावे लागणार आहेत. अल्ट्राबुकची रॅम किती जीबी आहे, यूएसबी 3.0 पोर्ट दिला आहे का आणि कोणता इंटेल कोर प्रोसेसर वापरला आहे, यावर त्याच्या किमती अवलंबून आहेत. किमान तीस हजाराच्या पुढेच या अल्ट्राबुकची किंमत राहील. सॅमसंग सीरिज 5 अल्ट्राबुक लवकरच येतोय. तोपर्यंत एसरचा ऍस्पायर एस 3, एसस झेनबुक झेन, तोशिबा प्रोटीज झेड 830 किंवा डेल कंपनीचा एक्सपीएस 13 बघायला हरकत नाही... चिअर्स




















0 comments:
Post a Comment