Thursday, September 15, 2011
शिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)
शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ’शिवछत्रपतीचे चरित्र’ ही बखर. ह्या बखरीत केलेल्या उल्लेखानुसार हा ग्रंथ शालिवाहन शके १६१६ (इ०स० १६९४) या वर्षाच्या सुमारास (म्हणजे महाराजांच्या मृत्युनंतर केवळ १४ वर्षांनी) लिहिला गेला असे दिसते. याच्या सत्यासत्यतेबद्दल अर्थातच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण तरीही याचे वाचन सुरस ठरावे.
शेवटच्या ’राज्याची मोजदाद’ या प्रकरणात फारच माहितीपूर्ण व सुरस तपशील सापडतो. कारखाने, महाल, खजिना (सोने-नाणे, कापड-जिन्नस इ०), घोडे, पागा, त्यावेळचे सरदार, शिलेदार, सुभेदार, हत्ती, जहाजे, आरमार, सरदार, गड-कोट-जंजिरे (जुने ५०, शिवाजी राजांनी वसवलेले १११ व कर्नाटक प्रांतातील काबीज केलेले ७९ असे एकूण २४०).
मृणाल विद्याधर भिडे ह्यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक टंकन करून मराठीप्रेमींसाठी उपलब्ध करून दिलेला हा ग्रंथ आपले मित्र श्री० मिलिंद पंडित (सदाशिव पेठ, पुणे) ह्यांनी आपल्याकरिता पाठवलेला आहे.
संपूर्ण बखर खालील दुव्यावर वाचण्यास उपलब्ध आहे.
Saturday, September 10, 2011
Friday, September 9, 2011
Beginners Guide to DSLR: Choosing the Right Camera for You
Digital Single-Lens Reflex Cameras (Digital SLR/DSLR) most
likely defined as a type of digital cameras using a both mechanical
mirror system and pentaprism so to be able to direct light from its lens
to that of the optical viewfinder found at the back of the camera. This
type of Camera has been widely used in the production of quality images
in no time since it captures fast. Speed becomes its great advantage.
There are many other benefits… many techniques and some other tips we
may learn to effectively use it but how do we really choose the perfect
DSLR for us?
This post could help answer such a significant question to single out a very important decision. Something that’s worth the price… So here goes a list of Tips to Help How to Choose the Best Camera that Fits You…
This post could help answer such a significant question to single out a very important decision. Something that’s worth the price… So here goes a list of Tips to Help How to Choose the Best Camera that Fits You…
Wednesday, September 7, 2011
'आई, बटन तुटलंय ग
शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत
म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ
उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या
डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या
प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू
बाबा आले का बघून ये'. 'कुठे गेले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर
आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त
आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू
लागला.
Saturday, September 3, 2011
गणपती
| गणपती | |
म्हैसूर शैलीतील गणपतीचे चित्र बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता |
|
| मराठी | गणपती |
| वाहन | उंदीर |
| शस्त्र | पाश, अंकुश, परशु, दंत |
| वडील | शंकर |
| आई | पार्वती |
| पत्नी | ऋद्धी, सिद्धी |
| अन्य नावे/ नामांतरे | ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन |
| मंत्र | ॐ गं गणपतये नमः |
| नामोल्लेख | गणेश पुराण, मुद्गल पुराण |
| तीर्थक्षेत्रे | अष्टविनायक |
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.
Labels:
इतिहास / माहिती,
कुठेतरी छानसे वाचलेले,
माहिती,
लेख
पुण्यातील मानाचे गणपती

श्री कसबा गणपती
कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, असे मानतात. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. गणेशोत्सवात श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.
Friday, September 2, 2011
श्री गणेशाची पंचोपचारपूजा
प्रत्यक्ष पूजाविधीत पूजेच्या
प्रारंभी करावयाची प्रार्थना
‘हे श्री सिद्धिविनायका, तुझी पूजा माझ्याकडून भावपूर्ण होऊ दे. पूजा करत
असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे. तू प्रत्यक्ष
माझ्यासमोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे, असा माझा भाव सतत
असू दे. पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत. पूजेतील चैतन्य मला आणि सर्व
उपस्थितांना मिळू दे.’
कोणत्याही देवतेची पूजा करतांना त्याचे आवाहन करणे, योग्य त्या
उपचारांसह स्थापना आणि पूजा करणे आवश्यक असते. हे करतांना करावयाचे विधी,
त्यांतील मंत्र आणि त्यांचा अर्थ माहीत असल्यास पूजकाकडून कृती अधिक
भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकर्षित
होऊन पूजकास अधिक लाभ होतो. याच उद्देशाने गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची
पंचोपचार पूजा येथे देत आहोत. शास्त्रानुसार या पद्धतीने दिवसातून तीन वेळा
आणि ज्यांना तिन्ही वेळा पूजा करणे शक्य नसेल, त्यांनी सकाळी अन् सायंकाळी
पूजा करावी.
Subscribe to:
Posts (Atom)



















