Demo Site

Friday, May 20, 2011

ओसामाच्या आईची अंगाई.........


ओसामाला ठार मारलं, त्याच्या आदल्या दिवशी ओबामा ला त्याच्या आईनी अंगाई गाऊन झोपवलं असं आज व्हाईट हाउस नी अधिकृतपणे जाहीर केलं , ती अंगाई   अशी : -

पाकिस्तानच्या गावामध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

नसे आमच्या देशात, मुशर्रफ म्हणतो बाई
रझा गिलानी सुद्धा , मान्य करतंच नाही

मात्र आपण त्यांच्या, सांगण्यावर जायचं नाही ..
कसाब ला देखील, त्यांनी आपलं मानलं नाही ....

पाकच्या अबोटाबादमध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

गुहा नसे ती बाळा, भाग्य बिल्डींग चे भाळी ..
घरातला केर कचरा, कुंपणाच्या आतच जाळी ..

नसे फोन वा इंटरनेट, फेसबुक , यु- ट्युब नाही ..
तरीही दिवसभर त्याचा, वेळ कसा ग जाई ..

पाकच्या अबोटाबादमध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

खबर आहे पक्की, ओसामाचा लागलाय माग ..
जेंव्हा केला 'सी आय ए' नी, कुरियरचा पाठलाग ..

तो पळून जायच्या आधी, करायला पाहिजे घाई ..
पाकिस्तान ला न सांगता, करू आता कारवाई ...

पाकच्या अबोटाबादमध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers