Demo Site
Showing posts with label आयुर्वेद. Show all posts
Showing posts with label आयुर्वेद. Show all posts

Monday, July 18, 2011

पाचक आलं

पावसाळा सुरू झाला आहे. अशा मस्त वातावरणात छानपैकी आल्याचा गरमागरम चहा प्यायला मिळाला तर पावसाळ्याच्या आनंद वाढतो. खरं तर पावसाळा असो वा नसो, आलं टाकून बनवलेला चहा प्यायल्यावर शरीरात तरतरी येते. मन उत्साहित होते. थकवा दूर होतो. काम करायला उत्साह येतो. अशा या आल्याचा उपयोग केवळ चहाची चव वाढवण्यासाठीच होत नाही तर पावसाळ्यात उद्भवणार्‍या विविध आजारांवर औषध म्हणूनही होतो.

Tuesday, June 14, 2011

आयुर्वेद: परंपरा आणि ग्रंथसंपदा




आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
  • इतिहास

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवानधन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.

Wednesday, May 18, 2011

आयुर्वेद - शेकडो वर्षांची परंपरा

आयुर्वेदशास्त्राला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळूहळू आयुर्वेदशास्त्राची खूप प्रगती झाली. आज आधुनिक वैद्यकाच्या जशा बालरोग, स्त्रीरोग, शल्यकर्म अशा विविध शाखा आहेत तशाच आयुर्वेदाच्या एकूण आठ शाखा अस्तित्वात होत्या. कायचिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांगचिकित्सा, शल्यचिकित्सा, विषचिकित्सा, रसायन आणि वाजीकरण या त्या आठ शाखा होत. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथातून याबद्दलचे सविस्तर उल्लेख सापडतात. काही शस्त्रक्रियाही आयुर्वेदकाळात केल्या जात होत्या. मर्मचिकित्सा, सिध्द, योग, इत्यादी शास्त्रेही आयुर्वेदाशी निगडित आहेत. होमिओपथीस समांतर कल्पना आयुर्वेदात होत्या असे दिसते. आयुर्वेदशास्त्र आणि स्थानिक आरोग्यपरंपरा यांच्या संबंधातून दोन्ही बाजूंची वाढ होत राहिली. शेकडो वनस्पतींचे औषधी गुणधर्म आयुर्वेदाने नोंदवून ठेवले. एकेकाळी अत्यंत प्रगत असलेल्या या शास्त्राची व परंपरेची पीछेहाट का झाली याचा विचार करणेही आवश्यक आहे.

आयुर्वेद परंपरेचा होण्याची आधुनिक काळात काही कारणे आहेत. एक म्हणजे ब्रिटिश काळात त्याची जाणूनबुजून झालेली उपेक्षा, आणि अन्याय. दुस-या बाजूला वेगाने वाढणा-या आधुनिक वैद्यकशास्त्राला मिळालेला राजाश्रय. आजही ही परिस्थिती फार वेगळी नाही. आजही आयुर्वेद-वैद्याने दिलेला आजारांचा दाखला मानायला खळखळ होते. दोन्ही उपचारपध्दतींमध्ये मूलभूत शास्त्रीय फरक आहे. आधुनिक वैद्यकाला इतर शास्त्रशाखांचे (रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिक, इ.) साहाय्य मिळाल्याने त्याची वेगाने प्रगती झाली. हे खरे असले तरी त्याची गुणवत्ता हे त्याच्या प्रगतीचे एकमेव कारण नाही. स्वतंत्र भारतातही शिक्षित व सत्ताधारी वर्गात आधुनिक वैद्यकाला स्थान मिळाले. आयुर्वेद या विषम स्पर्धेत मागे पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र आयुर्वेदानेही आधुनिक काळाशी जुळवून घेण्याची गतिमानता दाखवली नाही. ब्रिटिशपूर्व काळात आयुर्वेद बंदिस्त होण्यामुळे आयुर्वेदाची पीछेहाट झाली.

पण आजही आयुर्वेदाचे स्वतःचे महत्त्व आहे. असे अनेक आजार व समस्या आहेत, की त्या केवळ आयुर्वेदिक परंपरेतूनच सुटू शकतील. स्थानिक साधनसामग्री आणि सांस्कृतिक परंपरांच्या दृष्टिकोनातूनही आयुर्वेद आणि स्थानिक उपचारपध्दतींना योग्य तो मान मिळणे आवश्यक आहे.

Monday, February 14, 2011

बहुगुणी अभ्यंगस्नान

दिवाळीतील अभ्यंगस्नानाला अतिशय महत्त्व आहे. तेल चोळून, उटणे लावून भल्या पहाटे अभ्यंगस्नान होते. या स्नानामुळे त्वचेबरोबरच मनालाही तजेला मिळतो.


अभ्यंग उपचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे; पण त्याचा प्रसार मात्र सध्या परदेशात होत आहे. अंगाला तेल रगडणे, याला नाव दिलंय “मसाज’. उटण्याच्या खरखरीतपणाने त्वचा खसखसून धुणे, याला म्हणतात “स्क्रब’ आणि अंग कोरडे पुसून उटी लावणे, याला ते म्हणतात “डस्टिंग".

Friday, January 28, 2011

आयुर्वेदाच्या इतिहासात

आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे व कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे समजावे? यावर गुरुंनी उत्तर दिले की बागेत काम करण्याची खुरपणी घेऊन चारही दिशांनी प्रवास कर व जे औषधी नाही असे द्रव्य घेऊन ये.
जीवक निघाले, काही दिवसांनी परत येऊन म्हणाले, आचार्य मी चारही दिशांना खूप फिरलो पण मला औषधी नाही असे काहीच सापडले नाही. यावर गुरु म्हणाले, तुझे शिक्षण पूर्ण झाले. पुढे हेच वैद्य राजवैद्य झाले.
ही गोष्ट इथे सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याही घरात, आसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमधे काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार याप्रमाणे होत.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers