Demo Site
Showing posts with label कुठेतरी छानसे वाचलेले. Show all posts
Showing posts with label कुठेतरी छानसे वाचलेले. Show all posts

Friday, August 10, 2012

महाभारत : काल्पनिक काल्पनिक कि सत्य ??




महाभारत के बाद से आधुनिक काल तक के सभी राजाओं का विवरण क्रमवार तरीके से नीचे प्रस्तुत किया जा रहा है...!


आपको यह जानकर एक बहुत ही आश्चर्य मिश्रित ख़ुशी होगी कि महाभारत युद्ध के पश्चात् राजा युधिष्ठिर की 30 पीढ़ियों ने 1770 वर्ष 11 माह 10 दिन तक राज्य किया था..... जिसका पूरा विवरण इस प्रकार है :

क्र................... शासक का नाम.......... वर्ष....माह.. दिन

Thursday, July 19, 2012

जेनेरिक औषधे


तुमच्या डॉक्टरनं लिहून दिलेलं एखादं औषध तुम्हाला खूप्पच महाग वाटलं तर तुम्ही काय करता ?... ' अरे बापरे ' म्हणत, मनातल्या मनात शिव्या देत, खिशातले पैसे केमिस्टच्या हातावर टेकवून निमूटपणे ते औषध खरेदी करता... हो ना ? मग आता, ऑगस्ट महिन्यापासून महागडं औषध असं नाखुषीनं विकत घ्यायची गरज नाहीए. कारण, महागड्या औषधांना स्वस्त औषधांचा पर्याय देणारी एसएमएस सेवा केंद्र सरकार देशभर सुरू करतंय.


आमीर खानच्या ' सत्यमेव जयते ' मधून जेनेरिक औषधांवर प्रकाशझोत पडल्यानंतर, कुठलंही औषध घेताना सजग नागरिक त्याच्या ' ख-या ' किमतीचा विचार करू लागलाय. अनेक औषधांच्या किंमती अगदीच नगण्य असतात, पण कंपन्या ' ब्रँडिंग ' चा भरभक्कम खर्च आपल्या खिशातून वसूल करतात, हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे अनेकांनी जेनेरिक औषधं कुठे-कशी मिळतील, याचा शोध सुरू केलाय. त्यांचं हे संशोधन सोपं करण्यासाठी सरकार पुढे सरसावलंय. फक्त एका एसएमएसवर त्यांना त्याच आजारावरची, समान घटकद्रव्यं असलेली, दोन-तीन इतर कंपन्यांची स्वस्त औषधं सुचवण्याची अभिनव योजना त्यांनी आखली आहे.


समजा, तुम्हाला डॉक्टरांनी एखादं औषध सुचवलं आणि त्याची किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाइलवरून ठरावीक नंबरवर एसएमएस करायचा. त्यानंतर काही वेळातच, त्याच औषधाला दोन ते तीन पर्याय तुम्हाला सुचवणारा मेसेज तुम्हाला येईल. उदाहरणच द्यायचं झालं तर, तुम्हाला डॉक्टरांनी ' ऑग्मेंटिन ' ही टॅब्लेट सुचवली आणि तुम्ही हे नाव संबंधित नंबरवर एसएमएस केलंत, तर कदाचित तुम्हाला
' मॉक्सीकाइंड सीव्ही ' हा पर्याय सुचवला जाऊ शकेल. ही गोळी ' ऑग्मेंटिन ' पेक्षा स्वस्त आहे. अर्थात, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही पर्यायी गोळी घ्या, अशी सूचनाही मेसेजसोबत केली जाणार आहे.


या एसएमएस सेवेमुळे समान गुण असलेलं औषध ग्राहकांना स्वस्त दरात मिळू शकेल, असा विश्वास एका अधिका-यानं व्यक्त केला. अँटि-इन्फेक्टिव्ह, पेनकिलर्स, गॅस्ट्रो-इन्टेस्टाइनल औषधांना पर्याय देण्याची जय्यत तयारी केंद्र सरकारनं चालवली आहे. काही वेळा डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधाची किंमत आणि पर्यायी औषधाच्या किंमतीत १० ते १५ पट फरक असू शकेल.


काही वर्षांपूर्वी, केमिस्टच्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारनं अशीच हेल्पलाइन सुरू केली होती. एखादं औषध नसल्याचं सांगून त्याऐवजी महागडं औषध देणा-या औषध विक्रेत्यांना त्यामुळे चांगलाच चाप बसला होता.


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15015816.cms

आषाढ अमावस्या


आषाढ अमावस्या म्हणजे ‘दिवळी अमावस्या‘ किंवा ‘दिव्याची आवस‘ असे म्हणतात . हल्ली त्याला ‘गटारी‘ हे घाणेरडं नाव का दिलं आहे कुणास ठाऊक…..!
गटारी आमावस्या चा अर्थ नुसते दारू पिऊन धुंद होत मांस-मच्छीवर आडवा हात मारणे असा आहे का.......?,
की…..,याचे आणखीनही काही दुसरे महत्त्व आहे….!
हे…..आपल्याला माहीत आहे का.....? 


पूर्वी घरातले सर्वच्या सर्व दिवे पितळेचेच असत.
त्या दिवशी ते घासूनपुसून लख्ख करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं.कणे-रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहायची.गोडाचा नैवेद्य ठेवायचा. लामण दिव्याने त्या प्रज्वलित केलेल्या सगळ्या दिव्यांना आरती ओवाळायची. आषाढी अमावस्येला दीपपूजेला महत्त्व असतं.


अशा या दीप आमावस्येला दिव्यांची पूजा करून सर्वाना “तमसो मा ज्योतिर्गमय” असा संदेश देऊन आषाढ आमवस्या साजरी करुया
सर्वाना दीप आमावस्येच्या ज्योतिर्गमय शुभेच्छा !!!


माहिती स्त्रोत - स्मिता टिकले

Monday, April 23, 2012

Indian Independence Act, 1947

इस फोटो को अधिक से अधिक शेयर करें ..... "Transfer of Power Agreement" को जाने और दुसरो को बताएं 14 अगस्त 1947 कि रात को आजादी नहीं आई बल्कि ट्रान्सफर ऑफ़ पॉवर का एग्रीमेंट हुआ था सत्ता के हस्तांतरण की संधि ( Transfer of Power Agreement ) यानि भारत के आज़ादी की संधि | ये इतनी खतरनाक संधि है की अगर आप अंग्रेजों द्वारा सन 1615 से लेकर 1857 तक किये गए सभी 565 संधियों या कहें साजिस को जोड़ देंगे तो उस से भी ज्यादा खतरनाक संधि है ये | 14 अगस्त 1947 की रात को जो कुछ हुआ है वो

Saturday, December 24, 2011

आजही म्हणता नाही आलं

माझ्या सारख्या एका मुलाची कथा
७ वी ला असताना ...

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी "बेस्ट फ्रेंड " होती ...
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??" :(((

दारू ने केला नाश


आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण ‘पिऊ’ नकोस.. !
आई,

Friday, December 23, 2011

महाभारत की एक सांझ

महाभारत का अंतिम चरण, एक भयंकर द्वन्द युद्ध व दुर्योधन की पराजय के साथ एक अधर्म का सर्वनाश, परन्तु लुप्त तथ्यों पर प्रकाश डालने पर एक प्रश्न उठता है की अधर्मी कौरव थे कि पांडव??
सांझ का समय,दुर्योधन अपनी अंतिम साँसों को गिन रहा है एकाएक एक स्वर दुर्योधन को पुकारता हुआ...भाई, भाई दुर्योधन...
दुर्योधन आँखें खोलता है तो देखता है की युधिष्टर उससे मिलने आया है. दोनों का ये संवाद एक विवादित पहलु उजागर करता है और यह सोचने पर विवश करता है की दुर्योधन का कर्म, कोई अधर्म नहीं था...बहुत साल पहले एक पाठ पढ़ा था जो कि माखन लाल चतुर्वेदी द्वारा लिखित है. 


दुर्योधन आँखें खोलके जैसे ही युधिष्टर को देखता है, बोल पढता है-
दुर्योधन-- जीवन भर मुझसे द्वेष रखा,मृत्यु पर तो मुझे चैन प्रदान होने देते, क्या देखने आये हो मेरी विवशता, या अब भी तुम्हारी छल पूर्ण विजय में कोई त्रुटी रह गयी??
युधिष्टर- नहीं भाई, तुमने जो किया वो अधर्म था और इसका यही अंत होना था...
युधिष्टर- और यह तुम्हे भी ज्ञात था दुर्योधन की तुमने सर्वदा अधर्म का साथ दिया.

Thursday, December 22, 2011

का बापाचं आपल्या मुलीला लिहिलेलं पत्र शेवटच्या क्षणी......



माझ्या बाळा कशी आहेस ग तू ?
विसरलीस का ग ह्या बापाला, आठवण तरी येते का कधी ?
जेव्हा लहान होतीस ना नेहमी माझी वाट पहायचीस घरी यायची.
केव्हा तुझा बाबा तुला जवळ घेईल आणि तुझ्या बरोबर खेळेल,
आठवतं का तुला माझ्या हाताला हाथ धरून चालायला शिकली होतीस.
जेव्हा तू धडपडून पडायचीस तेव्हा तुला सावरणारा तुझा बाबा होता,

Tuesday, October 4, 2011

श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन

एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
...' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

Wednesday, September 7, 2011

'आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गेले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.

Saturday, September 3, 2011

गणपती




गणपती
एकदंत.jpg
म्हैसूर शैलीतील गणपतीचे चित्र बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता
मराठी गणपती
वाहन उंदीर
शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत
वडील शंकर
आई पार्वती
पत्नी ऋद्धी, सिद्धी
अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
मंत्र ॐ गं गणपतये नमः
नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण
तीर्थक्षेत्रे अष्टविनायक

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.

Sunday, August 28, 2011

बाप

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,

कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,

एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या

नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,

एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,

जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक

बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,

भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,

दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,

बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,

अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,

बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,

बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,

चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,

जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,

आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

Friday, August 26, 2011

पाऊस भेट


  • पाऊस भेट तो नाही म्हणाला सकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश . रस्त्यावर जणू सोनेरी सडाच टाकलेला. आणि समोर तो.उंच.रुबाबदार. त्याला पाहताक्षणी माझी दुनियाच बदलून गेली. इथे-तिथे-जिथे तिथे मला तोच दिसायचा. मी नववीत असेल तेव्हा. तो खूप खूप हुशार, शांत. त्याचं बोलणं, हसणं, बसणं, वागणं सारंच मला आवडायचं. त्याचं दर्शन झालं की, पूर्ण दिवस मी खूप आनंदात राहायचे. घरची सर्व कामं करताना डोक्यात तोच असायचा. त्या नादात कामही चांगलं व्हायचं. मला सतत त्याच्यासारखंच व्हायचं होतं. हुशार, परफेक्ट. त्याच्यासारखाच अभ्यास करायचा होता. मला त्याचाच ध्यास लागला होता. मी अभ्यासाला लागले होते, कारण तो खूप अभ्यास करायचा. मार्क्‍स चांगले पडायला लागले. मी हुशार मुलगी म्हणून ओळखले जाऊ लागले. मन बहरू लागले. माझ्या मनातल्या प्रेमानं चांगलंच बाळसं धरलं होतं. त्यात माझ्या घरी गरिबी अमाप. मी स्वकष्टानं शिकत होते, भावंडांना मदत करत होते. कधी कधी उपाशी झोपावं, तर झोपही येत नसे. पुस्तक वाचत जागी राहायचे. पण मनात जिद्द होती आणि समोर तो होता माझी प्रेरणा म्हणून उभा.! मी प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश मिळवायचे. फलकावर नाव झळकायचं. वाटायचं तो वाचेल माझं नाव, त्यानं वाचलं समजा तर त्यापेक्षा दुसरं मोठं बक्षीस नाही.! माझ्या घरचा खूप विरोध, कॉलेजला जायला नकारच होता. लग्न करून टाकायची घाई. मी दिसायलाही चारचौघीत उठून दिसणारी, लाघवी, हुशार. दोन-तीन नोकरदार स्थळं आली; पण मी ठाम नकार दिला. मी रोज पहाटे उठून देवाजवळ बसून प्रार्थना करायचे, माझ्या वडिलांना मला शिकवण्याची सुबुद्धी दे देवा, अशी भीक मागायचे. पण, सगळं व्यर्थ. ते तयार नव्हतेच. पण मी लाख प्रय} केले. अखेरीस परवानगी मिळाली. ड्रेस नाहीत, पैसे नाहीत. हे प्रश्न तर फार लांबचे होते. मी कशीबशी अकरावी सायन्सला अँडमिशन घेतले. कॉलेजला गेले, अभ्यास मन लावून केला. प्रेम हृदयाच्या कप्प्यातच बंद करून टाकलं. बी.एस्सी. झाले. पुढे एम.एस्सी.साठी विद्यापीठात गेले. आता स्वातंत्र्य मिळाले होते मला माझी वाट निवडण्याचे. दरम्यान, तो डॉक्टर होणार होता. आम्ही कधीही बोललो नाही, भेटलो नाही; पण त्याच्या आठवणीशिवाय माझा एक क्षणही गेला नाही. एक दिवस ठरवलं, त्याला भेटायचं. सांगायचं खरं काय ते.! त्याला फोन केला. तीनशे किलोमीटरचे अंतर पार करून त्याला भेटायला गेले. महिनाभराचे मेसचे पैसे खर्च करून त्याच्या शहरात पोहचले. तो भेटला. सोबत त्याचे आणखी दोन मित्र होते. बाहेर जोराचा पाऊस बरसत होता. मन खुलवत होता. माझ्या मनात जपलेलं नऊ वर्षं प्रेमाचं गुपित मी आज त्या पावसाच्या साक्षीनं सांगणार होते. आम्ही दोघं पावसाच्या सरीसोबत चालत होतो. त्याचे मित्रही मागे सोबत चालत होते. मी त्याला सारे सांगितले, मी त्याच्याचमुळे जगायला शिकले हेदेखील सांगितले. त्यानं सारं ऐकून घेतलं. आणि. ‘नाही’ म्हणाला.! मी गहिवरले. डोळ्यातून उधाणलेले अर्शू मला थांबवता आले नाही; पण पावसासोबत तेही धुतले गेले. मी परत बसमध्ये चढले. माझ्या गावी परत आले. सारे संपले होते. ज्याच्यासाठी, ज्याच्यामुळे जगत होते. तो फक्त ‘नाही’ म्हणाला. पण जगणं थोडीच थांबणार होतं. नाहीच थांबलं. पुढची काही वर्षं माझे हात रोज वीस-वीस तास काम करत होते. मी नोकरी केली. पुढे पाच वर्षांनी विवाह झाला. मुले झाली. सारं आयुष्य चाकोरीतून आनंदाच्या वाटेवर जगायला लागलं. पण.? ती ‘पाऊसभेट’ मात्र दरवर्षी आठवते.पाऊस जगवतो सार्‍या जगाला.त्यानं मला जीवदान दिलं. तो नाही म्हणून मी थांबले नाही उलट मनाचा एक कोपरा कायम ओलाचिंब असतो.आणि जन्मभर राहीन.! - सागरराणी-- ऑक्सिजन (लोकमत ) मध्ये आलेला एक लेख

Tuesday, August 16, 2011

अण्णा हजारे ह्यांचे डॉ. मनमोहन सिंह ह्यांना एक पत्र


डॉ. मनमोहन सिंह  
 एक पत्र
पंतप्रधान,
भारत सरकार,
नवी दिल्ली


प्रिय. डॉ. मनमोहन सिंह जी!

मला हे पत्र अतिशय खेदाने लिहावं लागतंय. मी यापूर्वी 18 जुलै रोजी आपल्याला एक पत्र लिहून सांगितलं होतं की सरकारने जर संसदेत सशक्त लोकपाल विधेयक मांडलं नाही तर मी पुन्हा 16 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करेन. त्याच पत्रात मी असंही सांगितलं होतं की माझं हे उपोषण तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत सरकार सशक्त लोकपाल विधेयक म्हणजे जनलोकपाल विधेयकातील सर्व तरतुदी असलेलं विधेयक संसदेत मांडलं जात नाही.

Sunday, August 14, 2011

निरागस प्रेम कि प्रेमभंग

रोजसकाळी bus stop वर ७ च्या गाडी ला ,
उभी असते ती जशी,
दिसावी ती म्हणून रोज, तिच बस पकडतो.
तिच्या मागे चढण्यासाठी मी लाईनहि तोडतो.

कधी सलवार, कधी जीन्स, कधी मिडी, कधी साडी.
हतात म्याचींग पर्स अन डोळ्यावर गॉगलची काडी.
पिंगट कर्ली केस तिचे अन कपाळावर फ्लिक्स.
हातात म्याचींग घड्याळ अन चपला हाय हिल्स.

Friday, August 12, 2011

रक्षाबंधन

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

Monday, August 8, 2011

प्रेम रोग....

आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

एक गोष्ट .

दोन मित्र होते... खूप छान मित्र होते ..
इतकं कि एकाला फटकावला कि दुसरं भोकड पसरायचं...
.
मोठी झाली...
आणि एका मित्राच्या life मध्ये एक मुलगी आली...
दुसरा तसाच खेळकर होता... त्या दोघानाची मैत्री ज|म घट्ट होती..
पण पहिला जास्त वेळा मैत्रिणी सोबत घालवायला लागला...

जेव्हा मित्रांत भांडण होतात... तेव्हा...

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार,
त्या चुकीसाठी एवढी शिक्षा खूप झाली यार.
त्यादिवशी आपण एकमेकांशी विनाकारण भांडलो,
मग तू माझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतलीस,
तू माझ्याशी बोलणं सोडलस आणि मला एकट केलंस,
तोंड असून माझ्याकडे मला मुकं करून टाकलस,
खरंच सांगतो, मी आजकाल फारसं कुणाशी बोलत नाही रे,
बोलण्याकरता अनेक गोष्टी सुचतात आणि आतल्या आत विरतात...
तू जरी बोलणं सोडलस, तरी मी मात्र तुझ्याशी आजही पूर्वी इतकाच बोलतो,
पूर्वी फक्त मी तुझ्यातल्याच तुझ्याशी बोलायचो,
आज मी माझ्यातल्या तुझ्याशी बोलतो...
आजकाल तू मला नेहमीच टाळतोस,
मी असेन जिथे, तेथून तू पळ काढतोस,
थांबावं लागलंच तुला, तर माझ्या आरपार तू पाहतोस,
इतर मित्रांमध्ये तू खूष आहेस, आनंदात आहेस,
हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतोस,
कधी एकदा माझ्याकडे, माझ्या डोळ्यांकडे बघ,
खात्रीनं सांगतो, मी त्याही वेळेस तुझ्याच कडे बघत असणार......


ते पण एक वय असतं....


ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक
करून घेण्याचं
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers