Demo Site
Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, December 24, 2011

दारू ने केला नाश


आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण ‘पिऊ’ नकोस.. !
आई,

Thursday, December 22, 2011

का बापाचं आपल्या मुलीला लिहिलेलं पत्र शेवटच्या क्षणी......



माझ्या बाळा कशी आहेस ग तू ?
विसरलीस का ग ह्या बापाला, आठवण तरी येते का कधी ?
जेव्हा लहान होतीस ना नेहमी माझी वाट पहायचीस घरी यायची.
केव्हा तुझा बाबा तुला जवळ घेईल आणि तुझ्या बरोबर खेळेल,
आठवतं का तुला माझ्या हाताला हाथ धरून चालायला शिकली होतीस.
जेव्हा तू धडपडून पडायचीस तेव्हा तुला सावरणारा तुझा बाबा होता,

Friday, December 16, 2011

मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल.....

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल....

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

Sunday, August 28, 2011

बाप

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,

कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,

एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या

नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,

एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,

जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक

बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,

भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,

दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,

बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,

अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,

बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,

बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,

चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,

जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,

आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

Sunday, August 14, 2011

निरागस प्रेम कि प्रेमभंग

रोजसकाळी bus stop वर ७ च्या गाडी ला ,
उभी असते ती जशी,
दिसावी ती म्हणून रोज, तिच बस पकडतो.
तिच्या मागे चढण्यासाठी मी लाईनहि तोडतो.

कधी सलवार, कधी जीन्स, कधी मिडी, कधी साडी.
हतात म्याचींग पर्स अन डोळ्यावर गॉगलची काडी.
पिंगट कर्ली केस तिचे अन कपाळावर फ्लिक्स.
हातात म्याचींग घड्याळ अन चपला हाय हिल्स.

Monday, August 8, 2011

एक गोष्ट .

दोन मित्र होते... खूप छान मित्र होते ..
इतकं कि एकाला फटकावला कि दुसरं भोकड पसरायचं...
.
मोठी झाली...
आणि एका मित्राच्या life मध्ये एक मुलगी आली...
दुसरा तसाच खेळकर होता... त्या दोघानाची मैत्री ज|म घट्ट होती..
पण पहिला जास्त वेळा मैत्रिणी सोबत घालवायला लागला...

मैञी दिन...!!

म्हणजेच Friendshi Day
मराठीत मैञी दिन म्हटलं तर पटकन लक्षात नाहि येत,
तेच जर Friendshi Day म्हटलं तर
लगेच डोळ्यां समोर येतात ते College Day's
त्याच Day's मधिल हाही एक महत्वाचा दिवस.
पण याचा उगम का झाला?
कुठे झाला?
कधि झाला?
या बद्दल आपन विचारच नाहि करत ?
फक्त enjoy करायच बस !

जेव्हा मित्रांत भांडण होतात... तेव्हा...

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार,
त्या चुकीसाठी एवढी शिक्षा खूप झाली यार.
त्यादिवशी आपण एकमेकांशी विनाकारण भांडलो,
मग तू माझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतलीस,
तू माझ्याशी बोलणं सोडलस आणि मला एकट केलंस,
तोंड असून माझ्याकडे मला मुकं करून टाकलस,
खरंच सांगतो, मी आजकाल फारसं कुणाशी बोलत नाही रे,
बोलण्याकरता अनेक गोष्टी सुचतात आणि आतल्या आत विरतात...
तू जरी बोलणं सोडलस, तरी मी मात्र तुझ्याशी आजही पूर्वी इतकाच बोलतो,
पूर्वी फक्त मी तुझ्यातल्याच तुझ्याशी बोलायचो,
आज मी माझ्यातल्या तुझ्याशी बोलतो...
आजकाल तू मला नेहमीच टाळतोस,
मी असेन जिथे, तेथून तू पळ काढतोस,
थांबावं लागलंच तुला, तर माझ्या आरपार तू पाहतोस,
इतर मित्रांमध्ये तू खूष आहेस, आनंदात आहेस,
हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतोस,
कधी एकदा माझ्याकडे, माझ्या डोळ्यांकडे बघ,
खात्रीनं सांगतो, मी त्याही वेळेस तुझ्याच कडे बघत असणार......


ते पण एक वय असतं....


ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक
करून घेण्याचं

Thursday, August 4, 2011

का ग तु अशी वागतेस गं......


तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ..

कधी कधी माझा मी........




कधी कधी माझा मी
मलाच उमगत नाही
भेटती सारे सगे नव्याने
परी मी गवसत नाही.........




भास्-आभासांचा रंगे
खेळ हा सारा......
कधी स्तब्ध किनारे
कधी वादळी वारा
ह्या वार्‍यावर भरकटताना
मी मजला अडवत नाही.....
...........................कधी कधी माझा मी

फक्त तुज्यासाठी.............

तो अश्रू...
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

Wednesday, August 3, 2011

देवदास


तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....


बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा
स्वार्थी बनत चालला माणूस, काळ बदलतोय माणुसकीचा.....

ज्यांनी केले लहानाचे मोठे, त्यांना आज मुले विसरली
स्वता राहिले उपाशी तापाशी, मुलांच्या जीवनात सूखे भरली
रात्रण दिवस मेहनत करुनी, स्वता ओढली दुखाची सावली
त्याच मुलांनी घरा बाहेर काढुनी, गळा घोटला मनवतेचा.....

हीच आहे का आजची पीढी, प्याशन पैशापाठी धावत चालली
आई वडीलांनी घाम गालुनी, मुलांसाठी अनेक स्वप्न पाहीली
यांच मुलांनी हाकलून देताच, स्वप्न यांची अश्रुंनी वाहीली
अरे देव कोणी पाहीला नाही, पण देवारा असतो हा प्रतेक घरचा.....

भरत चालली आज वृध आश्रमे, जड वाटू लागले आई बाप
उतरत्या वयात सहारा छिनूनी, मुले करतात मोठे पाप
आई वडिलांना पैशाने तोलतात, विसरून जातात कर्तव्याचे माप
काय म्हणायच या पिढीला, स्वार्थ आहे हा आंधळे पणाचा.....

देवालाही जे जमले नाही, ते दिले आज आई वडिलांनी
पैशापुढे सर्व विसरले, मुले नाही त्यांची ऋणी
मुले असून नसल्या सारखे झाले, अनाथ झाले हे म्हातारपणी
आजच्या पिढीस सागने आहे, अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.

Saturday, July 30, 2011

लग्नाच्या गाठी

जन्मोजन्मीचं वैर काढत
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

Thursday, July 28, 2011

मुली असतात फुलासारख्या..

मुली असतात फुलासारख्या
मुली लहान मुलासारख्या.....

...त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे
त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे..

मुली म्हणजे relations
मुली म्हणजे emotions..

छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसणार्या
शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या..

मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला
मुली म्हणजे मोर श्रावणातल्या..

मुली म्हणजे ठसून सौंदर्य
मुली म्हणजे त्याग औंदर्य...

मुली असतात softcorner
मुली असतात melting point...
घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point..

त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू
पण रुसण म्हणजे अर्धांगवायू...

मुली वाटतात हव्याहव्याश्या
मुली वाटतात आपल्याशा...

आमच मन समजून घेणार्या
दुखात आम्हाला आधार देणार्या...

कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला
काही नाव नसत पण तरही ते जपायच असत....

खरे प्रेम असावे…..

गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवरव प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसेअनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसेक्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!

Monday, July 25, 2011

वेश्या

संध्याकाळी ८ वाजता ती मला मारून झोपवायची
तिला माझ्या दुसऱ्या दिवशीच्या भुकेची काळजी असायची

गज्र्यांच्या वासाने,अत्तराच्या घमघमाटाने माझ डोक दुखायच

चुर्गळलेल्या फुलांचं टोपलं माझ्या घरात नेहमीच असायचं

Thursday, July 21, 2011

रिटायर्ड माणसाला कोंबडी परवडत नाही'.....!

[पोस्टातले नाना निवृत्त झाले . कोंबडी त्याना अतिशय प्रिय. रविवारी पिशावी घेऊन बाहेर जाताना दिसले
गमत म्हणून सहज विचारले .काय नाना आज काय कोंबडी का ?हसून म्हणाले नाहीरे बाबा रिटायर माणसाला कोंबडी नात परवडत .. ]

नुकताच रिटायर्ड झालो
पेन्शन कसली
१५२० रुपये मासिक महिन्याची
पेन्शन चालू होईल
होईल तेव्हा होईल ......!
कधी होईल माहीत नाही ....?

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं ........
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers