मग मी त्या अनुषंगाने इंटरनेटवर सर्च करून माहिती मिळविली. ही सुविधा माझ्या ब्लॉगवर अॅड केली. आणि हीच माहिती तुम्हालाही द्यावी, याच उद्देशाने हा लेख लिहला आहे.
LinkWithin याचं हे विजेट आहे. हे विजेट आपल्या ब्लॉगवर अॅड केल्यावर आपल्या ब्लॉगवरील इतर पोस्टच्या लिंक्स आपोआपच सर्व पोस्टच्या खाली प्रदर्शित केल्या जातात.
याचा एक अतिशय महत्वाचा फायदा असा की, केवळ नवीनच नाही तर अगदी जुन्या पोस्टच्या लिंक्सही प्रदर्शित होत असल्यामुळे आपल्या जुन्या पोस्ट्सनाही पुन्हा वाचकवर्ग प्राप्त तर होतेच, परंतु एकदा ब्लोगवर आलेला वाचक, पोस्टच्या खाली प्रदर्शित झालेल्या इतर लिंक्समुळे ब्लॉगवरील इतर पोस्ट्स वाचण्यात गुंतून राहतो. त्यामुळे ब्लॉगच्या ट्रॅफिकमध्ये वाढ व्हायला हे विजेट उपयुक्त ठरू शकते. हे विजेट तुमच्या ब्लॉगवर अॅड करण्यासाठी खालील सूचनांचे अनुसरण करा.
१. LinkWithin या वेबसाईट वर जा.
२. तेथे तुमचा ईमेल आणि ब्लॉगचा अॅड्रेस द्या, ब्लॉगर वर्डप्रेस किंवा इतर अशापैकी तुमचा योग्य तो पर्याय निवडा, तीन, चार किंवा पाच पोस्टच्या लिंक्स प्रदर्शित करण्याचा कोणताही एक पर्याय निवडा आणि Get Widget वर क्लिक करा. एक नविन उघडलेले वेबपेज तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या Add Page Element येथे घेऊन जाईल.
३. त्यानंतर पुढीलप्रमाणे स्टेप्स फॉलोअप करा.
४. अॅड विजेटवर क्लिक करा.
५. अधिक चांगल्या परिणामासाठी हा अॅड झालेला LinkWithin बॉक्स Drag and Drop पद्धतीने "Blog Posts" बॉक्स खाली आणा.
६. आता सेव्ह वर क्लिक करा.
याप्रकारे हे विजेट तुमच्या ब्लोगवर केले जाईल. आणि याचा परिणाम कसा दिसतो हे या लेखाच्या खाली तुम्हाला प्रत्यक्षात दिसेलच.
संधर्भ :
http://nathtel.blogspot.com
0 comments:
Post a Comment