Demo Site

Tuesday, May 31, 2011

एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट



एका मुलाला कॅन्सर होता. अवघ्या महिन्याचाच तो सोबती होता. तो रोज एका सीडीच्या दुकानावर जायचा. या दुकानात एक छानशी मुलगी होती. ती त्याला फार आवडायची. मनोमन तो तिच्यावर प्रेम करायचा. सीडी आणायला गेला की तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ कधी संपायचा ते त्याला कळायचंही नाही. तिच्याशी बोलायला मिळतंय म्हणून तो अगदी रोज... त्या दुदुकानावर जायचा. पण आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती तो कधीही करू शकला नाही. त्याचं तेवढं धाडसंच झालं नाही.

एका महिन्यानंतर दुखणं बळावलं आणि त्याचा मृत्यू झाला. तिच्यावरचं त्याचं प्रेम त्याच्या मनातच राहून गेलं.

बर्‍याच दिवस तो येत का नाही म्हणून सीडीच्या दुकानातली मुलगी एकदा त्याचा पत्ता शोधत घरी पोहोचली. घरी त्याची आई होती. आईला तिने त्याच्याविषयी विचारलं. त्या माऊलीच्या ओघळत्या आसवांनीच तिला सारं काही सांगितलं. त्याची आई तिला त्याच्या खोलीत घेऊन गेली.

त्या खोलीत गेल्यानंतर तिनं पाहिलं. सगळ्या सीडी जशा नेल्या तशाच ठेवल्या होत्या. न उघडता.

आता मात्र तिला रडू आवरेना. कारण माहितेय?

कारण तिनं त्याला लिहिलेली सगळी प्रेमपत्र त्या सीडीच्या पाकिटात तशीच राहून गेली. त्यानं न वाचता. तीही त्याच्यावर तितकंच उत्कट प्रेम करत होती. पण.....

म्हणून कुणावर प्रेम करत असाल तर त्या प्रेमाला वेळीच अभिव्यक्त करा. याबाबतीत कुसुमाग्रजांनी सांगितलेलं एवढं नक्कीच लक्षात ठेवा.

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंडयासारखा फडकू नकोस.

उधळून दे तूफान सगळं,
काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं,
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा,
मेघापर्यंत पोहचलेलं.

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू


विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी.
कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे
ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी
सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही
अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिका......णी बसून त्यावर चर्चा करत असत.
प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर
मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.

Monday, May 30, 2011

45+ Adobe AIR Applications for Designers and Developers

Adobe AIR (Adobe Integrated Runtime) is a cross-platform runtime environment used to build rich internet applications using Adobe Flash, Flex, HTML and Ajax, helping web developers and designers to perform their task with ease and much efficiently. This is one of the most appreciated application platform which become a very popular platform for internet-enabled desktop applications in recent years. With the increase in its popularity, the number of utilities and tools are also increased significantly.
45+ Adobe AIR Applications for Designers and Developers
If you are designer or developer then you must check these handy and convenient tools based on Adobe AIR platform which will offer ease and flexibility in your daily routine.

Wednesday, May 25, 2011

दिनूचे बिल

दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणीतपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत. कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा."तर कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं बिल किती झालं ते सांगा."

दिनू एका लहानश्या खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या ...बऱ्याचशा गोष्टी त्याला आताकळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे त्याला अजून कळले नव्हते.

दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"

डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात बिल. वाच!"

Tuesday, May 24, 2011

ती रात...... .......................

ती रात...... .......................
नदी तीरावर चांदण्याराती..
तरंगता बिंब पाण्यावरती...

असा समीप तू येता मनाशी..
श्वासांचे गुंजन होई कानाशी...

मंद वा-याची झुळुक फ़िरते
स्पर्शुनी ह्रुदयास तनात विरते...

नशिला गंध श्वासाचा तुझ्या
बेभान भिनला श्वासात माझ्या..

गुंफ़ीत शब्द माळूनी मनास..
मोरपिसी स्पर्श वेचुनी तनात..

रातंदिन रत झाली स्म्रुतीत
एकांताची गोडी लागे अविट...

Monday, May 23, 2011

प्रेमात हरलेला मुलगा .......

जेव्हा मुलाचा प्रेम भंग होतो आणि मग त्याला आठवते ती आई... 
बघा मग पटत का तुम्हाला...
प्रेमात हरलेला मुलगा .......त्याच्या आईस … काय म्हणतो ??/

आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?

Saturday, May 21, 2011

Moon Sines

Aries
aries moon signMars is the lord of Aries therefore when moon is placed in Aries it shows sheer determination to reach the goals. the people born under this moon sign are attracted to other passionate, physical and active people. They are  Straight, with no hidden agenda, they have quick thinking, instantaneous and get bored with minor practical details. Due to its Fire Sign aspect They are  quick tempered and are often ignited by their impatience. As quick as they are to anger, they are just as quick to forget. they are like aggressive Ram with a soft corner as of a gentle lamb. 

Aries Moon signs natives may not be as intuitive as other signs  but they have the desire to succeed. Aries, relentlessly pursue their desires with the passion and energy of impatience. They are  masters of their own success or failure in life. The guiding forces of Aries are: persistence, aggressiveness, impulse, originality in thought and action, quick temper and impatience.   Aries Moon Signs have the reputation of action that can be motivated by instant gratification. Aries have a warm heart and they try there level best to comfort people who are in need.




आयुष्याची गाडी.............

त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच.

बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.

गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र......

Friday, May 20, 2011

ओसामाच्या आईची अंगाई.........


ओसामाला ठार मारलं, त्याच्या आदल्या दिवशी ओबामा ला त्याच्या आईनी अंगाई गाऊन झोपवलं असं आज व्हाईट हाउस नी अधिकृतपणे जाहीर केलं , ती अंगाई   अशी : -

कुठेतरी छानसे वाचलेले.....................

 
जगण्याचा कोर्स चार भिंतींच्या आत करता येत नाही.
त्यासाठी प्रत्यक्ष जगण्यातच स्वत:ला झोकून द्यावे लागते.
न सुटणारी गणिते,हाताची घडी-तोंडावर बोट ठेवून किंवा उसन्या सांत्वनी रूमालांनी सुटणार नसतात. त्यासाठी पुन:पुन्हा आणि पुन:पुन्हा गणित सोडवतच राहावे लागते.
...काही वेळा उत्तर मिळत नाही.
पेन्सिल संपून जाते.
पाटी फटून जाते.
पण जगणे प्रवाही राहते.
शेवाळ साठत नाही.
धावण्यानेच जीवनाला अर्थ येतो.

कुठेतरी छानसे वाचलेले.....................

कुटुंब….. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
           
एकमेकांवर अवलंबून असणं केवळ आर्थिकचं नसतं.ते मानसिकही असाव लागतं. परगावी गेल्यावर मुलांची ओढ वडिलांना लागते,ती पुर्ण मानसिकच असते. संध्याकाळी विशिष्ट वेळ टळुन गेल्यावर ”अजुन बाबा का बरे आले नाहित? ” हि हुर हुर लागणं,हे नाती जिवंत असल्याचं लक्षण आहे.

...मनामनाची निरपेक्ष गुंफण म्हणजे कुटुंब
यात आई-मुलं,आजी-आजोबा,घरात नसलेली इतरही नाती या सगळ्याविषयी वाटणारा प्रेमयुक्त आदरभाव असतो.तेव्हा व्यवहार संपल्यावर घराकडे येण्यासाठी पावलं आपोआप वळतात

Wednesday, May 18, 2011

कुठेतरी छानसे वाचलेले.....................

एक असंही प्रेम होतं…
.
“अम्या असं कसं झालं रे… नक्की काय म्हणाली ती?”


...“तुला सांगितलं, तेच म्हणाली. आणि त्यानंतर काही बोलण्यासारखं राहिलंही नव्हतं…’

“रागावू नकोस; पण मला पुन्हा एकदा सांगतोस काय झालं ते…’

“जवळपास गेला आठवडा आम्ही फारसे भेटत नव्हतो, हे तुला माहितीच आहे. तेव्हाही न भेटण्याचं तसं विशेष काही कारण नव्हतं; पण भेट घडत नव्हती हे खरं… काल तिचा फोन आला. आज नक्की भेटूया म्हणाली. मी नेहमीप्रमाणे तिला खेचू लागलो,
तर ती खूप सिरीअस वाटली. आवाजावरून रडल्यासारखी वाटत होती. मी कारण विचारलं तिला… तर काहीच बोलली नाही… भेटल्यावर बोलू म्हणाली.’

“मग?’

“मग काय आम्ही भेटलो आज. काहीतरी गडबड आहे… काहीतरी विचित्र घडलंय किंवा घडणार आहे असं मला सारखं वाटत होतं… आज मनूला भेटताना नेहमीसारखं मस्त नव्हतं वाटत… म्हणजे इतर वेळी आम्ही भेटणार म्हटल्यावर जसं वाटायचं तसं नव्हतं वाटत.
तुला सांगता येत नाहीये आत्ता… म्हणजे काय वाटत होतं ते शब्दांत नाही सांगता येत…; पण ते काहीतरी विचित्र फिलिंग होतं…’

गब्बरचे चरित्र



भारतातील महान व्यक्तीपैकी एक म्हणजे गब्बर सिंग होय. पण चरित्रकरांनी त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला आहे. गब्बर यांचे प्रेरणादायी जीवन लोकांना कळावे म्हणून गब्बरचे हे चरित्र लिहिले आहे.

आयुर्वेद - शेकडो वर्षांची परंपरा

आयुर्वेदशास्त्राला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळूहळू आयुर्वेदशास्त्राची खूप प्रगती झाली. आज आधुनिक वैद्यकाच्या जशा बालरोग, स्त्रीरोग, शल्यकर्म अशा विविध शाखा आहेत तशाच आयुर्वेदाच्या एकूण आठ शाखा अस्तित्वात होत्या. कायचिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांगचिकित्सा, शल्यचिकित्सा, विषचिकित्सा, रसायन आणि वाजीकरण या त्या आठ शाखा होत. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथातून याबद्दलचे सविस्तर उल्लेख सापडतात. काही शस्त्रक्रियाही आयुर्वेदकाळात केल्या जात होत्या. मर्मचिकित्सा, सिध्द, योग, इत्यादी शास्त्रेही आयुर्वेदाशी निगडित आहेत. होमिओपथीस समांतर कल्पना आयुर्वेदात होत्या असे दिसते. आयुर्वेदशास्त्र आणि स्थानिक आरोग्यपरंपरा यांच्या संबंधातून दोन्ही बाजूंची वाढ होत राहिली. शेकडो वनस्पतींचे औषधी गुणधर्म आयुर्वेदाने नोंदवून ठेवले. एकेकाळी अत्यंत प्रगत असलेल्या या शास्त्राची व परंपरेची पीछेहाट का झाली याचा विचार करणेही आवश्यक आहे.

आयुर्वेद परंपरेचा होण्याची आधुनिक काळात काही कारणे आहेत. एक म्हणजे ब्रिटिश काळात त्याची जाणूनबुजून झालेली उपेक्षा, आणि अन्याय. दुस-या बाजूला वेगाने वाढणा-या आधुनिक वैद्यकशास्त्राला मिळालेला राजाश्रय. आजही ही परिस्थिती फार वेगळी नाही. आजही आयुर्वेद-वैद्याने दिलेला आजारांचा दाखला मानायला खळखळ होते. दोन्ही उपचारपध्दतींमध्ये मूलभूत शास्त्रीय फरक आहे. आधुनिक वैद्यकाला इतर शास्त्रशाखांचे (रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिक, इ.) साहाय्य मिळाल्याने त्याची वेगाने प्रगती झाली. हे खरे असले तरी त्याची गुणवत्ता हे त्याच्या प्रगतीचे एकमेव कारण नाही. स्वतंत्र भारतातही शिक्षित व सत्ताधारी वर्गात आधुनिक वैद्यकाला स्थान मिळाले. आयुर्वेद या विषम स्पर्धेत मागे पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र आयुर्वेदानेही आधुनिक काळाशी जुळवून घेण्याची गतिमानता दाखवली नाही. ब्रिटिशपूर्व काळात आयुर्वेद बंदिस्त होण्यामुळे आयुर्वेदाची पीछेहाट झाली.

पण आजही आयुर्वेदाचे स्वतःचे महत्त्व आहे. असे अनेक आजार व समस्या आहेत, की त्या केवळ आयुर्वेदिक परंपरेतूनच सुटू शकतील. स्थानिक साधनसामग्री आणि सांस्कृतिक परंपरांच्या दृष्टिकोनातूनही आयुर्वेद आणि स्थानिक उपचारपध्दतींना योग्य तो मान मिळणे आवश्यक आहे.

Monday, May 16, 2011

कुठेतरी छानसे वाचलेले.....................


अडचणी किंवा समस्या यांना सामोरे जाताना कठीण वाटत असेल, तर लहान मूल कसे शिकते ते आठवा.कितीही वेळा पडले तरी ते पुनःपुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करते.त्याचे हे प्रयत्न जाणल्यावर तुम्हालाही पुढचे पाऊल टाकण्यासाठी नवीन बळ मिळाल्याचे जाणवले.

अखेरचा डाव!

बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
"तो' पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि "ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही...' ची मस्त शीळ देत ड...ोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या "हॅपी मूड'मुळे सुखावली.
आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.
न राहवून तिनं विचारलंच,""आज एकदम मूड चेंज, काय भानगड?'
""ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!''
तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!
क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.


दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच "टॅक्‍सी' या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी!
दोघे टॅक्‍सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?
थिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.
त्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.
तिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली
""जरा तिकडं बघतेस!' असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.''
अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.
तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!
तब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या...
स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.
"जाईन विचारीत रानफुला...' किशोरींनी सुरू केलं आणि... वाह।।। च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या!
त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!
ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना "तो' आयुष्यात आला!
ंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!
एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
"नाही म्हणूच शकले नाही!'
सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना "त्याला'ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली! गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना... आज अचानक?
टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.
दोघेही उठले...बाहेर आले...
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.
नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.
दोघेही एका ठिकाणी बसले... बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.
तिनं मौनाला बोलतं केलं!
"काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये...घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्‍सी, मग "किशोरी' तीही पहिल्या रांगेत बसून...गजरा...रेस्टॉरंट आणि आता इथे... काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही! फक्त नदीकडे पाहत राहिला!
"बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी' म्हणून ती उठू लागली!
आता त्याचं मौन सुटलं! तो आश्‍वासक हसला!
हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय?
काहीही विसरलो नाही! असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, "हॅपी व्हॅलेंटाईन!'
आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे! तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!
बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.
कसली तिकिटं आहेत?
"पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय!'
"कशाला?'
"दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे! त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!
त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले!
.
जीवन हे सुंदर आहे..
एकदाचा मिळत .
घ्या कि जागून...
बाकीचा देव आहेच बघायला..

Sunday, May 15, 2011

कुठेतरी छानसे वाचलेले.....................



भांडा पण माफही करा!
एकमेकांसाठीच असण्याचे गुलाबी दिवस संपतात आणि दोघांचाही 'इगो' मान वर काढतो.
मत पटत नाहीत.
रागवारागवी होते.
शब्दाने शब्द वाढतो.
...चक्क भांडणं होतात आणि सगळंच बिनसतं.


प्रेमात इगो आला की गडबड होतेच. स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही याची काळजी घेताना लहान सहान गोष्टी सोडूनही देता यायला पाहिजे.
भांडणं झाली की प्रेम वाढतं हे खरंच पण भांडण किती ताणायचं हेही समजायला हवं नाहीतर छोत्या गोष्टीचा बागुलबुवा होतो आणि मानं दुखावली जातात.
प्रेमाच्या मामल्यात एकाधिकार आला म्हणजे त्या नात्याचा टवटवीतपणा कुठे तरी कमी व्हायला लागतो.
एक सांगणार आणि दुसरा ऐकणार हे गणित प्रेमासाठी अगदी अयोग्य आहे.दोघांच्या मतानं आणि विचाराने हे नातं फुलायला हवं.
तू तू मै मै गरजेची आहे. पण त्यातून वाद आणि पुढे टोकाची भांडणं झाली तर सगळाच बेरंग होतो.

Saturday, May 14, 2011

कुठेतरी छानसे वाचलेले.....................

एकत्र असा ,एकमेकांचे असा
कुठलंही नात फुलण्यासाठी त्या नात्याला आवश्यक तो वेळ देण गरजेचं असतं.
ती वेळ आणि तीई स्पेस जर त्या नात्याला नाही देता आली तर ते नात लवकर कोमेजून जात .
एकमेकांसाठी वेळ काढण अतिशय महत्वाचं आहे. तो वेळ क्वांटिटिव हवा की क्वालिटेटिव्ह याचाही विचार आवश्यक आहे.
खुप वेळ एकमेकांबरोबर पन एकत्र असूनही एकमेकांबरोबर नाही असं... असण्यापेक्षा थोडाच वेळ एकत्र पण तो वेळ १००% एकमेकांचा याला अधिक अर्थ आहे.

साध्या साध्या गोष्टिंमध्ये आनंद लपलेला असतो.
ते छोटे छोटे क्षण अचुक पकडता यायला हवेत.
म्हणजे मग प्रेमातली गम्मत वाढते.
आपण कुणाला तरी आवडतो ही भावना अशाच सहज,सुंदर क्षणातून फुलते.

आयुष्यातील एक खंत..............

ह्या सगळ्याची सुरवात एका मेल पासून झाली.हि मेल मला मित्रांकडून फोरवर्ड होवून मेळाली होती.ह्या मेल पासून माझ्या डोक्यातले वादळ पुन्हा एकदा उभे राहिले.आयुष्यावर बोलू काही ह्यातलें "दमलेल्या बाबाची या कहाणी तुला.." हे गाणे आयुष्यात मी १८ वर्षाचा असताना प्रथम ऐकले होते.तेव्हा पासून हे वादळ माझा पाठलाग करत आहे.ह्या लेखा मूळे परत जुन्या आठवणीना उजाळा मिळाला   .जेव्हा पासून हा लेख वाचला आहे तेव्हा पासून मनाला एक  चुटपूट लागून राहिली आहे.आपण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी इतके मर मर कष्ट करतो,त्या आपल्या  मुलांसाठी किती वेळ देतो? आज माझे वडील ह्यात नाही आहेत,पण मला आजहि हि खंत जाणवते कि मला माझ्या वडिलांबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही.उद्या हीच खंत आपल्या मुलांना जाणवू नए ह्याची  काळजी घेण्याचे जाणीव मला परत एकदा ह्या पत्रानी करून दिली.मीही आज माझ्या वडिलान इतकाच कामात व्यग्र असतो.माझी पत्नीची हि हीच ओरड असते."जरा घरात लक्ष देत चला"पण   काय करणार ऑफिस मधून काही सुटका नसते.लवकर काम झाले तर बॉस आणखीन काम देतो.आपण सागळेच इतके व्यस्त झालो आहोत कि आपण आपला नोकरी करण्याचा मुळ उदिष्ट विसरत चाललो आहोत.का माणूस इतका पैशाच्या मागे वेडा होऊन धावत आहे? काय करणार ऑफिस मधून काही सुटका नसते.लवकर काम झाले तर बॉस आणखीन काम देतो.आपण सागळेच इतके व्यस्त झालो आहोत कि आपण आपला नोकरी करण्याचा मुळ उदिष्ट विसरत चाललो आहोत.का माणूस इतका पैशाच्या मागे वेडा होऊन धावत आहे? ह्या काही प्रश्नांची उत्तरे शोधायचा मी प्रयत्न करतो आहे काही वर्षा पासून.हाय सगळे ह्या मेल मूळे परत आठवले. कित्येंक  दिवसांपासून हे लिहून काढायची इत्चा होती.म्हटल काही प्रत्श्नाची उत्तर आपल्याला नाही सापडत तर कोणाला तरी विचारवी.हा माझा पहिलाच अशा काही लिहायचा प्रयत्न आहे.काही जास्त बोलत बोलत असेल तर माफ करा.तर आता तुम्हाला जास्त त्रास न देता ते मेलच देतो वाचायला.ते मेल मी खाली देत आह.



हॅलो सर, मी बर्लिनहून बोलतोय! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स! मी पीएच.डी. झालोय..नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं..! मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा! माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवरदमलेला बाबागाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.आता माझ्या तोंडून हं.. हंसुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे! हे काय आहे? दाद ? चांगल्या गाण्याला प्रतिसाद़़? की रसिकता़़़, हळवेपणा, खरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच, की याला म्हणतात नातं.
दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..
हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला? आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही! ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र बाबासरकत होते..
खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून हॅलो हॅलो. मी बाऽबाम्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून माझी आठवण काढतात ना मुलं? मी आठवतो ना त्यांना? अशा प्रश्नांना बायकोच्याहो..या उत्तरासाठी आसुसलेला बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही..असं म्हणणारा बाबा’!
बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणाराबाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना तू बारीक का वाटतेस गं? तिकडे खूप त्रास होतोय का?’ म्हणतनाही तर सरळ परत ये भारतातअसं सुचवणारा बाबा..
या सगळ्या बाबांचीहाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा करकळतं, पण साधायचं कधी? कसं? ते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?
माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?
अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -
न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.
असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी माझ्या बाबाला का रडवलंसम्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी बाबा गाणं ऐकलंत?' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणि दुखऱ्या..
हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..
प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से, वेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या, दुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!!)
आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो की, या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात, पण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं, पटतं. जे ठरवतो, ते हातून घडत नाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमी करायला हवाय..
पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?
लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला..

--डॉ. सलील कुलकर्णी

Monday, May 9, 2011

Get A Read Receipt When Friends Open Your Email Message

gmail read receiptIf you are using Microsoft Outlook with Exchange Server, you can easily request read receipts and get notified when your email is opened by the recipient(s). 
 Gmail does not provide such a feature.Many e-mail provider does not provide such a feature.

Sunday, May 8, 2011

अक्षय्य तृतीया

ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.

ही नाती सुगंधी


जानू…जानू…लवकर ऊठ..
अगं आम्ही निघतोय आता..आवर तू पण..किती वेळ झोपून राहणारेस ? आठ वाजलेत.
किती वेळच्या हाका मारतेय मी,ऊठ लवकर आणि खाली ये..आम्ही निघतोय.
आईच्या हाका ऐकून "हं" म्हणण्याइतपतच जान्हवीच्या अंगात बळ होतं,तेवढं एकवटून "हो,उठतेय" म्हणत तिने डोळे उघडायचा निष्फळ प्रयत्न केला.थोडी चुळबूळ केली पण उडालेली झोपही आता काही लागत नव्हती.
खिडकीच्या पडदयामधून शिरलेली अजाण सूर्यकिरणंही तिच्या झोपाळू डोळ्यांना सहन होत नव्हती.
काश्श ! ह्या सूर्याने पण एक दिवस सुट्टी घेतली असती तर….
म्हणत डोळे चोळतच ती बिछान्यातून उठली.रोजच्या सवयीप्रमाणे सरळ खिडकीकडे गेली.
खिडकीच्या पडद्यामधून सूर्यकिरणं गाळून आत येत होती.
तिनं पडदा बाजूला करुन पाहिलं तर सूर्याचा जणू काही चंद्र झाला होता.सूर्याला काळ्याभोर ढगांनी कुशीत घेतलं होतं.एरव्ही लालिमेने वेढलेलं त्याचं अस्तित्व शीतल धुरकट झालं होतं.आकाशभर काळ्या जांभळ्या ढगांचे पुंजके हसत खिदळत होते.
ही कुठली गाणी गाताहेत पक्षी आज ?
अन ही झाडं अशी काहीतरी लबाडी केल्यासारखी चुपचाप का उभीयेत ?
मधुनच सळसळतात,हिरवे दात विचकत.

Saturday, May 7, 2011

शेरलॉक होम्स : संत्र्याच्या पाच बिया

मी शेरलॉक होम्सच्या केसेसबद्दल नोंदी ठेवत असतो आणि त्या वेळोवेळी काढून माझ्या मित्राचे बुद्धिचातुर्य आणि एकूणच परिस्थितीचे अचूक विश्लेषण करून त्यातील गाभा जाणून घेण्याचे कसब पाहताना आश्चर्यचकित होणे मला आवडते.
आज मी अशीच एक कथा सांगणार आहे. आजपर्यंत माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या सर्व कथांमधे या कथेमधल्या विचित्र आणि धक्कादायक घटनाक्रमासारखे प्रसंग सापडणार नाहीत.
१८८७ सालच्या सप्टेंबर महिन्याचे शेवटचे दिवस होते. शरदसंपातामुळे निर्मांण होणाऱ्या वादळाने भयंकर उग्र रूप धारण केले होते. पूर्ण दिवसभर गरजणाऱ्या वाऱ्याने आणि अक्षरशः कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने लंडनच्या भर शहरी वस्तीत राहणाऱ्या लोकांनाही आपल्या शहरी कोशातून बाहेर येऊन निसर्गाच्या बलवान पंचमहाभूतांच्या अस्तित्त्वाची दखल घेण्यास भाग पाडले होते. खवळलेली महाभूते एखाद्या बंदिस्त आणि संतापलेल्या सिंहासारखी गरजत होती अंगावर चालून येत होती.वादळाचा वेग दर क्षणाला वाढत होता आणि पाऊस त्याला साथ देत होता. फायरप्लेसच्या एका बाजूला शेरलॉक होम्स आपल्याच तंद्रीत त्याच्या त्या डकवबुकातील नोंदी तपशीलवार लावत बसला होता आणि मी क्लार्क रसेलच्या सागरी कथांमधे बुडून गेलो होतो. वादळाची गर्जना समुद्राच्या गंभीर गाजेशी आणि पावसाचा मारा लाटांच्या सळसळीशी एकरूप होत असल्यामुळे मोठी झकास वातावरणनिर्मिती होत होती. माझी बायको तिच्या माहेरी गेली होती आणि काही दिवसांकरिता मी पुन्हा एकदा माझ्या बेकर स्ट्रीटवरच्या घरात मुक्काम ठोकला होता.

Friday, May 6, 2011

शेरलॉक होम्स : नौदलाच्या कराराचा मसुदा

          
जुलै महिन्याचे दिवस होते. माझं नुकतंच लग्न झालं होतं. त्या काळात होम्स काही विवक्षित आणि राजकीय महत्त्वाच्या केसेसमधे अगदी गळ्यापर्यंत बुडाला होता. त्यातल्या एका केसमधे इंग्लंडचं राजकीय भवितव्यच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणातील काही मोलाच्या गोष्टींना मोठाच धोका निर्माण झाला होता. सुदैवाने या केसबद्दल बोलण्याची मुभा मला होम्सकडून मिळालेली आहे.
या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एके दिवशी सकाळी मला आलेल्या एका पत्राने. सकाळच्या डाकेने मला माझ्या एका जुन्या शाळामित्राचं पत्र आलं. पर्सी फेप्स त्याचं नाव. हा गडी अतिशय हुशार, खिलाडू आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा होता. प्रसिद्ध राजकारणी आणि पुढारी लॉर्ड होल्डहर्स्ट हे त्याचे सख्खे मामा. पण त्याला मिळालेल्या अफाट यशाचं पूर्ण श्रेय त्यालाच जातं. मामाच्या लौकिकाला साजेशी कामगिरी त्याच्या मदतीशिवाय पर्सी करून दाखवत होता. वयाने असेल माझ्याएवढाच. पण चांगल्या दोन इयत्ता गाळून तो पुढे गेला. मिळवता येण्याजोगी सगळी बक्षीसं त्याने मिळवली.केंब्रिज कॉलेजची मानाची शिष्ज्यवृत्तीही त्याने पटकावली. तिथेही पठ्ठ्याने गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण करत दैदिप्यमान यश मिळवलंन. मग परराष्ट्रीय विभागात त्याला नोकरी मिळाली आणि तो सरसर वर चढला. एखाद्या परिकथेत शोभावी अशी त्याची ही कारकीर्द मला माहीत होती. पण शाळेनंतर आमचा पत्रव्यवहार मात्र कमी होत गेला आणि गेली काही वर्षं तर तो बंदच होता.
अशा पर्सीचं पत्र सकाळच्या डाकेनं टेबलावर येऊन पडलं आणि माझं मन काही क्षण त्या जुन्या रम्य दिवसांमधे भरारी मारून आलं. मोठ्या उत्सुकतेने मी ते पत्र फोडलं आणि वाचू लागलो
"ब्रायरब्री,
वोकिंग
प्रिय वॉटसन,
ओळखलंस का मला? मी 'बेडक्या' फेप्स.
तुला माहीतच असेल की माझ्या मामाच्या, लॉर्ड होल्डहर्स्टच्या दबदब्यामुळे परराष्ट्र खात्यात मी एका चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतो. माझ्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी आजवर मी मोठ्या सचोटीने आणि निष्ठेने अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आलो आहे. पण काही दिवसांपूर्वी माझ्यावर असा काही दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे की माझं सर्वस्व पणाला लागलं आहे. आणि अतिशय लाजिरवाण्या अशा बेअब्रूची तलवार माझ्या डोक्यावर टांगली गेली आहे....
या सगळ्या परिस्थितीबद्दल या पत्रात काहीही सांगणं मला शक्य नाही..जर तू माझ्या म्हणण्याला होकार दिलास तर मी तुला प्रत्यक्षच ते सगळं सांगेन.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers