अबोल ती नाजूक ती
मी हळवा ती नैनपरी
हसली ती रुसली ती
बघता बघता हृदयात बसली ती
अजान ती घायाळ मी
दुखातही सदैव हसली ती
पाघरून ती मोरपिसांचे
मी काटेरी कुंपण मनातल
गुलाब ती प्रेमाचा
मी रानफूल रानातल
ती वारा मंजुळ गीत गाणारा
मी भवरा गुंगुणारा
ती फुलपाखरू बागेतील
मी पक्षी एक उनाड उडणारा
ती चंचल नदी वाहणारी
मी दगड धोंडा वाटेतला
ती स्वच सुंदर शीतल जल
मी धबधबा उचवरून पडणारा
ती चंद्र तारे आकाशातील
मी टीमटीमता तारा
ती प्रकाश प्रभाती
मी रात्रीच काळोख न्यारा
ती अप्सरा इंद्रलोकीची
मी नट नाटकातील
ती चंदन कस्तुरी
मी पामर न उलगणारा
0 comments:
Post a Comment