Demo Site

Saturday, July 30, 2011

लग्नाच्या गाठी

जन्मोजन्मीचं वैर काढत
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

Thursday, July 28, 2011

मुली असतात फुलासारख्या..

मुली असतात फुलासारख्या
मुली लहान मुलासारख्या.....

...त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे
त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे..

मुली म्हणजे relations
मुली म्हणजे emotions..

छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसणार्या
शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या..

मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला
मुली म्हणजे मोर श्रावणातल्या..

मुली म्हणजे ठसून सौंदर्य
मुली म्हणजे त्याग औंदर्य...

मुली असतात softcorner
मुली असतात melting point...
घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point..

त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू
पण रुसण म्हणजे अर्धांगवायू...

मुली वाटतात हव्याहव्याश्या
मुली वाटतात आपल्याशा...

आमच मन समजून घेणार्या
दुखात आम्हाला आधार देणार्या...

कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला
काही नाव नसत पण तरही ते जपायच असत....

अंतराळात जाणारे पहिले कोण

रशियन : अंतराळात जाणारे पहिले आम्ही आहोत
.
.
.
अमेरिकन : चंद्रावर जाणारे पहिले आम्ही आहोत
.
.
.
इंडियन : सूर्यावर जाणारे आम्ही पहिले आहोत
.
.
.
रशियन आणि अमेरिकन : सूर्यात खूप उष्णता आहे तुम्ही जळून खाक व्हाल
.
.
.
इंडियन : तुम्हाला काय आम्ही मूर्ख वाटतो .... आम्ही तिथे रात्री जातो


खरे प्रेम असावे…..

गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवरव प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसेअनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसेक्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!

Wednesday, July 27, 2011

ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स: मुक्त्त स्रोत प्रणाली - आज्ञावली

आज  आपण पाहु की संपुर्ण संगणकच आपण ओपन सोर्सवर कसा चालवु शकतो! शिवाय ब्लॉग डिझाईन करताना लागणारी सॉफ्टवेअर्स - मोफत [मोफत म्हंजे फुकाट!] आहेत काय? महाजालावर - इंटरनेटवर शोधलं तर बरीच अशी सॉफ्टवेअर्स सापडतील - मात्र त्या बाबत चांगलं मत / प्रतिक्रिया असल्याशिवाय ते इंस्टॉल करायलाही आपण धास्तावतो. चला, मी वापरुन पाहिलेल्या/ वापरत असलेल्या अशाच काही मुक्त्त स्रोत आज्ञावलींबद्दल थोडक्यात माहिती करुन घेऊ!



तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली तर चोरी?


ब्लॉगवरचा लेख/ फोटो/ क्रिएटीव्ह कॉपी - पेस्ट करणे हे काही नवीन नाही. काही प्रकरणांत हा उद्देश प्रामाणिक असतो - म्हणजे - आवडलं म्हणुन शेअर केलं - अर्थात ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न नसतो. तर काही प्रकरणांत चोरुन - त्यावरचा लोगो - वॉटरमार्क काढुन ते साहित्य आपल्याच नावावर खपवायचा प्रयत्न असतो.

बराच वादाचा आणि "काँप्लिकेटेड" म्हणावा असा एक मुद्दा! मित्रांनीही बर्‍याचदा यावर प्रश्न विचारलेले. मी काही कायद्याचा तज्ञ अथवा पंडित नाही, मात्र उपलब्ध असणार्‍या माहितीच्या आधारे काही माहिती इतरांसाठी लिहितोय.

भारतीय प्रताधिकार कायदा हा ब्रिटीश प्रताधिकार कायदा - १९११ वरुन तयार करण्यात आलेला असुन सध्या तो भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार अंमलात आहे.

Tuesday, July 26, 2011

आईस पत्र

प्रिय आईस,
पत्ता :- देवाचे घर.

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,

थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं.
वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.
तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.
बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.
आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच.
  - -तुझाच
लाडका मुलगा

google+ VS facebook


शासन व्यवस्था म्हणजे काय हो?

दररोजचा शीस्तीचा भाग म्हणून पेपर वाचणार्या बंड्याने त्याच्या बाबांना वीचारलं, "बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो?" "त्याचं असं आहे".... बाबा वीचार करत म्हणाले..."हे बघ, मी घरात पैसे कमावून आणतो. म्हणजे मी भांडवलदार; तुझी आई हा पैसा कुठे-कसा खर्च करायचा हे ठरवते म्हणजे ती सरकार; आपल्या घरातली मोलकरीण काम करते म्हणजे ती झाली कामगार; तू सामन्य नागरीक आणी तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पीढी. समजलं?"

बंडया वीचार करत झोपी गेला. रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरूण ओलं केल्यामुळे तो रडत होता. बंडया आईला उठवायला गेला. ती गाढ झोपलेली असल्याने तो मोलकरणीला उठवायला गेला तर तीच्या खोलीत बंडयाचे बाबा झोपलेले होते.


सकाळी बाबांनी बंडयाला वीचारलं..."काय बंडोपंत?...कळली का लोकशाही?" बंडया म्हणाला..."कळलं बाबा. जेव्हा भांडवलदार कामगारांचं शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपेत असतं. देशाची भावी पीढी मूलभूत सोयींसाठी रडत असते आणी या सर्वांचा त्रास फक्त सामन्य नागरीकाला सहन करावा लागतो".

Monday, July 25, 2011

वेश्या

संध्याकाळी ८ वाजता ती मला मारून झोपवायची
तिला माझ्या दुसऱ्या दिवशीच्या भुकेची काळजी असायची

गज्र्यांच्या वासाने,अत्तराच्या घमघमाटाने माझ डोक दुखायच

चुर्गळलेल्या फुलांचं टोपलं माझ्या घरात नेहमीच असायचं

मुले परीक्षेत नापास का होतात ?

एका वर्षामध्ये फक्त ३६५ दिवस असल्यामूळे शक्यतो मुले परीक्षेत नापास होतात.आता बघुया एखाद्या मुलाचे शैक्षणिक वर्ष कसे जाते.
तुम्हाला माहित आहे तरीही लक्षात ठेवा की एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात.
एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात. आता रविवारी अभ्यास करणार की खेळणार. मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस.
उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस.
दररोज आपण ८ तास झोपतो. म्हणजे वर्षाला १३० दिवस झोपतो. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १४१ दिवस.
मुले रोज १ तास खेळतात. खेळल्याने मुलांची तब्येत सुधारते. अशा प्रकारे रोज १ तास म्हणजे वर्षाला १५ दिवस खेळतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १२६ दिवस.
दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. म्हणजेच वर्षाला एकुण ३० दिवस लागतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत ९६ दिवस.
दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे वर्षाला १५ दिवस लागतात. हे दिवस वजा केल्यास राहिलेत ८१ दिवस.
वर्षातील ३५ दिवस शाळेमध्ये परीक्षा असतात. आता परीक्षेच्या दिवशी अभ्यास करणार का पेपर सोडविणार हे दिवस वजा केल्यास राहिले ४६ दिवस.
वर्षातील ४० दिवस निरनिराळे सण, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, इतर लहान-मोठे सण यांच्यामध्ये जातात. आता हे ४० दिवस वजा केल्यास राहिलेत ६ दिवस.
वर्षातील ३ दिवस तरी निदान आजारपण, ताप, सर्दी तांच्यामध्ये जातात. आता राहिलेत ३ दिवस.
वर्षातील २ दिवस ( फक्त ) चित्रपट, टिव्हीवरील कार्यक्रम बघण्यात जातात.
आता उरला १ दिवस.
आणि त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस असतो आणि या दिवशी तरी कोणी अभ्यास करतो का ?
मग उरले ० दिवस.
आता सांगा मुले अभ्यास करणार कधी आणि परीक्षेमध्ये पास होणार कधी. :P

Saturday, July 23, 2011

नका उडवू झोप आमची

नका उडवू झोप आमची, काय केला आम्ही गुन्हा
धर्मं जातीचे नाव घेउनी, बॉम्ब फोडतात पुन्हा पुन्हा.....

मास बिघरते रक्त सांडते, मरतात इथे निष्पाप जीव

आई वडीलान पासून मूल छिनते, पाहून येते त्यास कीव
डोळ्यांमधून अश्रु वाहता, दुखाने होतो व्याकुळ जीव
नेता येते पाहून जातो, जाहिर करतो पैसे पुन्हा.....

असो हिंदू असो मुसलमान, या धर्तीचे लेकरे आपण

धर्मं जातीचे नाव घेउनी, नेता साधतो आपली साधन
निष्पाप जनता आगीत लपटते, नेत्यास मिळते त्याचे आसन
नका लढू रे आपआपसात, आपल्याच हातून घडतोय गुन्हा.....

आई मरते बाप मरतो, पोरके होते मूल तान्हे

घर बनते स्मशान घाट, बिखरतात आयुष्याची सर्व पाने
या आगीत मरतात सारे, मरतात इथे हिंदू मुसलमाने
दहशतवाद्यास ठेचुन काढा, देऊ नका त्यास पन्हा.....

हवा बुद्ध हवा येशु, नको आम्हास रक्त पिशासु

शांत प्रिय देशास माझ्या, डोळ्यात येते रक्ताचे आसू
निरागस जनतेच्या चिंधड्या उड़ताच, दहशतवाद्यास येते हसू
असा हां भयानक राक्षस, बॉम्ब फोडतो पुन्हा पुन्हा.

मिले सूर मेरा तुम्हारा.....



While Nostalgia was at play, had to put this one up. Mile Sur Mera Tumhara ... to sur bane hamara. One of those that sticks to your head. At one time, I could sing it all, despite the different languages. National Integration Message at its best. :)




Friday, July 22, 2011

दूरदर्शन - एका बुडत्या सूर्याचे अखेरचे दर्शन

आजच्या काळात दूरदर्शन हि एक आठवणच राहिली आहे आता. आता मी पण गद्धे पंचविशी ओलांडत आहे .तरी पण आजही दूरदर्शनचा विषय निघाला कि बालपणाच्या अनेक आठवणी जाग्या होतात .आज घराघरात केबल टीवी आले आहेत पण मला हात वाटत कि त्यांना आपल्या दूरदर्शनची सर आहे .आज केबल / डिश टीवी  वर इतके channel आले आहेत पण त्या दूरदर्शनची आठवण काही जात नाही .माझ्या तर अनेक आठवणी ह्या दूरदर्शनशी निगडीत आहेत .आपण जे दर्जेदार कार्यक्रम लहानपणी बघत होतो तसे आता दिसत नाहीत .सगळीकडे नुसती हाणामारी आणि अश्लीलता भरून राहिली आहे .हाय मधेय कधीतरी दूरदर्शनची अत्वान जागी होते ,आणि मग मध्यामाश्याच्या मोहोळाला धक्का लागल्यावर जश्या मधमाश्या जाग्या होतात तश्या मनाच्या मोहोळातून आठवणींच्या मधमाश्या जाग्या होतात .
                

Thursday, July 21, 2011

रिटायर्ड माणसाला कोंबडी परवडत नाही'.....!

[पोस्टातले नाना निवृत्त झाले . कोंबडी त्याना अतिशय प्रिय. रविवारी पिशावी घेऊन बाहेर जाताना दिसले
गमत म्हणून सहज विचारले .काय नाना आज काय कोंबडी का ?हसून म्हणाले नाहीरे बाबा रिटायर माणसाला कोंबडी नात परवडत .. ]

नुकताच रिटायर्ड झालो
पेन्शन कसली
१५२० रुपये मासिक महिन्याची
पेन्शन चालू होईल
होईल तेव्हा होईल ......!
कधी होईल माहीत नाही ....?

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं ........

बॉम्बस्फोटात मृत झालेल्या व्यक्तीचे आत्मवृत्त............


काल १३ जुलै २०११ रोजी कबुतरखान्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलो,कित्ती बरं वाटतंय स्वर्गात येऊन.बरं झालं त्या भूलोकीच्या नरकातून सुटका तरी झाली एकदाची.संचार करता करता म्हणलं,नेहमीच्या रहाटगाडग्यात थोरामोठ्यांना पुस्तक रुपात सुद्धा भेटता आलं नाही,आता आलोच आहे तर म्हणलं प्रत्यक्ष भेटूनच घेऊ सर्वांना,तेवढ्यात छ.शिवाजी महाराज भेटले,म्हणाले "आलाssssत ........या..स्वागत आहे तुमचे.कालच्या बॉम्ब स्फोटात मेलात ना,खूप मर्दुमकी गाजवलीत! " कुठे गेले ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न?"आधी लगीन कोंडाण्याच आणि मग माझ्या रायबाचं" असं म्हणणारा तानाजी मालुसरे याच प्रदेशात जन्माला आला होता ना? मग कुठे गेली ती मनाची कणखर वृत्ती?पावनखिंडीत आपलं शीर तळहातावर घेऊन लढणारे बाजीप्रभू येथेच जन्मले होते ना मग दर वेळेला हे दहशतवादी देशाला खिंडीत गाठतातच कसे,स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या खंडोजी खोपडेचा कडेलोट करणाऱ्या आमच्या नशिबात देशाशी गद्दारी करणारेच सत्तेवर बसलेले पाहण्याचे दुर्भाग्य का म्हणून यावे?.राजाचं म्हणणं ऐकलं आणि शरम वाटली स्वतःची.आणि पुन्हा आपल्या वाट धरली.

पुढे जातो ना जातो तोच भेटले लोकमान्य टिळक,म्हणले,"आम्ही आज हिंदुस्थानात हयात असतो तर विचारले असते ,"हिंदुस्थानी जनतेचे डोके ठिकाणावर आहे काय ?" आणि छातीठोकपणे पुन्हा गर्जलो असतो "सुरक्षा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो आम्ही मिळवणारच....".तेवढ्यात आगरकर येऊन म्हणले "पहा टिळक,पहा ओरडून ओरडून सांगत होतो देशाला स्वातंत्र्याच्या आधी सुधारणेची,वैचारिक प्रगल्भतेची गरज आहे,केले ना ह्या लोकांनी राष्ट्राचे वाटोळे?".म्हणलं "इतका खोलात जर विचार केला असता तर माझ्यावर आणि माझ्यासोबत जे हिंदुस्थानात केवळ शरीररूपाने जिवंत आहेत अश्यांवर ही वेळ येऊन ठेपली नसती.......".पुढे चालू लागलो..

मजल दरमजल करत चालतोय तोच एक तेजःपुंज व्यक्ती समोर आली आणि ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर.जरा चिडलेलेच दिसले,म्हणाले "की घेतले न आम्ही व्रत हे अंधतेने" म्हणून स्वातंत्र्यासाठी आमच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या आमच्या देशात लोक देशाचे सरकार आंधळेपणाने निवडून देतात,भ्रष्टाचारी आणि मतांसाठी म्लेंच्छांच्या दाढ्या कुरवाळणारे हे लोक मग काय तुमचे संरक्षण करतील?मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस,भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव ह्यांना इतक्यात तुम्ही विसरलात?अरे ह्या देशाला केवळ चरखा चालवून स्वातंत्र्य नाही मिळाले,स्वतःच्या प्राणांचे बलिदान अनेक लोकांनी केले आहे,अनेकांना असह्य यातना सहन कराव्या लागल्या आहेत.इतक्यात का हे सगळे तुम्ही विसरलात?स्वार्थी लोकांनो धिक्कार असो तुमचा!
मित्रहो असं वाटलं खरच routine lyfe मध्ये इतका बिझी होतो,की कधी विचार सुद्धा केलं नाही ह्या गोष्टींचा.पण,मी केली ती चूक तुम्ही 'जिवंत' हिंदुस्थानी नागरिक करू नका.जागे व्हा..राजकीय, सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ होण्याचा प्रयत्न करा.जात,भाषा,प्रांत ह्या सर्वांच्या डबक्यात अडकून पडू नका,प्रखर राष्ट्रीयत्व अंगी भिनवाल तरच तुम्ही मुक्तपणे संचार करू शकाल,अन्यथा तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुमच्या नावाने शिव्या शाप देत बसतील,दुसरा काही पर्यायच त्यांच्यासमोर उरणार नाही.

Wednesday, July 20, 2011

नाग पंचमी

nag_panchami1.jpgHinduism as a religion is many-sided yet bound by a common search for Truth and to Hindus it means a way of life and a fellowship of faiths. With the advent of the Aryans, it originated as a simple form of worship of the forces of Nature, drawing in its system action in social organisations, local cults, deities’ diversebeliefs and modes of worship.


Nag-Panchami is an important all-India festival and is celebrated on the fifth day of the moonlit-fortnight in the month of Shravan (July /August). This is the time when serpents invariably come out of their holes that get inundated with rain-water to seek shelter in gardens and many times in houses. As such they pose a great danger to man. May be therefnag_panchami.jpgore, snakes are worshiped on this day. Right from the times when mankind started acquiring some sort of culture, Sun and the snake have been invoked with prayers and ritual worship in most of the countries. In India even before the Vedic times, the tradition of snake-worship was in vogue.



The Legend
In ancient India, there lived a clan by the name of "NAGAS" whose culture was highly developed. The Indus Valley civilisation of 3000 B.C. gives ample proof of the popularity of snake-worship amongst the Nagas, whose culture was fairly wide-spread in India even before the Aryans came. After the Naga culture got incorporated into Hinduism, the Indo-Aryans themselves accepted many of the snake deities of the Nagas in their pantheon and some of them even enjoyed a pride of place in the Puranic Hinduism.


The prominent Cobra snakes mentioned in the Puranas are Anant, Vasuki, Shesh, Padma, Kanwal, Karkotak, Kalia, Aswatar, Takshak, Sankhpal, Dhritarashtra and Pingal. Some historians state that these were notsnakes but Naga Kings of various regions with immerse power.


The thousand-headed Shesh Nag who symbolises Eternity is the couch of Lord Vishnu. It is on this couch that the Lord reclines between the time of the dissolution of one Universe and creation of another. Hindus believe in the immortality of the snake because of its habit of sloughing its skin. As such Eternity in Hinduism is often represented by a serpent eating its own tail.


In Jainism and Buddhism snake is regarded as sacred having divine qualities. It is believed that a Cobra snake saved the life of Buddha and another protected the Jain Muni Parshwanath. To-day as an evidence of this belief, we find a huge serpent carved above the head of the statue of Muni Parshwanath. In medieval India figures of snakes were carved or painted on the walls of many Hindu temples. In the carves at Ajanta images of the rituals of snake worship are found. Kautilya, in his "Arthashastra" has given detailed description of the cobra snakes.


Fascinating, frightening, sleek and virtually death-less, the cobra snake has always held a peculiar charm of its own since the time when man and snake confronted each other. As the cobra unfolded its qualities, extra-ordinary legends grew around it enveloping it in the garble of divinity. Most of these legends are in relation with Lord Vishnu, Shiv and Subramanyam.


The most popular legend is about Lord Krishna when he was just a young boy. When playing the game of throwing the ball with his cowherd friends, the legend goes to tell how the ball fell into Yamuna River and how Krishna vanquished Kalia Serpent and saved the people from drinking the poisonous water by forcing Kalia to go away.


sv.jpgIt is an age-old religious belief that serpents are loved and blessed by Lord Shiv. May be therefore, he always wears them as ornamentation around his neck. Most of the festivals that fall in the month of Shravan are celebrated in honour of Lord Shiv, whose blessings are sought by devotees, and along with the Lord, snakesare also worshiped. Particularly on the Nag-Panchami day live cobras or their pictures are revered and religious rights are performed to seek their good will. To seek immunity from snake bites, they are bathed with milk, haldi-kumkum is sprinkled on their heads and milk and rice are offered as "naivedya". The Brahmin who is called to do the religious ritual is given "dakshina" in silver or gold coins some times, even a cow is given away as gift.




निस्वार्थ प्रेम

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग
केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे
बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा
शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार,
प्रेमाबिमात नाही पडणार' त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स' असंच
...लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला.
शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही
सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता;
पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा.
पण... पण आज त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठं पळून गेलंय.
तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती.
कसलाही विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं.
ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.


खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा
स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला,
तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी
त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.

तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे
पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच
फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं
घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून
तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं
तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली
होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं
चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या
दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच.
त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन
ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण कुणीच उचलला नाही.
घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानंही परत तिला फोन
केला नाही. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू
झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून
मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला.
आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न
करता त्यानं गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌ आम्ही तिच्या गावाकडं
गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला
सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही
तिच्या बाबांना भेटलो अन्‌ अर्ध्या तासात माघारी फिरलो.

मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी
काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्‌ एका
झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता
अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर
दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा
स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय. त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती
नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला
दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो
अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे.
त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं
म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह
स्टोरी' अर्धवट राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर ही
निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.'

Tuesday, July 19, 2011

Cinemagraph: 28 Still Photos With Subtle Motion

Today  we’re going to showcase animated GIF artwork but there are not the regular GIF we use on websites. These are beautiful twist from somehow nasty animated Gif artworks with the use of high quality photos from modern photography, and the pioneer, Jamie Beck and Kevin Burg called it – Cinemagraph.
5659130034 7fc3dcfb8c o Cinemagraph: 28 Still Photos With Subtle Motion

GoogleMinus: Know who removes you from Google+


The recently launched social networking website Google+ is increasing its number of users at a very fast rate . In the 1st week itself Google+ surpassed the 10 million users count. When somebody joins you on Google+ you get a notification, but when someone leaves your circle you don’t get any notification from Google+ . If you wish to know who has removed you from Google+ , here is how you can .
GoogleMinus is a browser extension that lets you know when someone deletes you from their circles on Google+.  It can be installed on Google Chrome, Firefox or Safari. Once installed, you will receive a notification each time someone removes you from his / her Circles on Google+.



Monday, July 18, 2011

पाचक आलं

पावसाळा सुरू झाला आहे. अशा मस्त वातावरणात छानपैकी आल्याचा गरमागरम चहा प्यायला मिळाला तर पावसाळ्याच्या आनंद वाढतो. खरं तर पावसाळा असो वा नसो, आलं टाकून बनवलेला चहा प्यायल्यावर शरीरात तरतरी येते. मन उत्साहित होते. थकवा दूर होतो. काम करायला उत्साह येतो. अशा या आल्याचा उपयोग केवळ चहाची चव वाढवण्यासाठीच होत नाही तर पावसाळ्यात उद्भवणार्‍या विविध आजारांवर औषध म्हणूनही होतो.

माणसे जोडण्यासाठी……काय कराल?

माणसे जोडणे म्हणजे माणसाना प्रभावित करणे,
माणसावर प्रभुत्व गाजवणे नव्हे.
माणसे जोडणे म्हणजे मनमोकळे, मतमोकळे असणे.
मनाचे मनाशी नाते जोडणे.
माणसे जोडणे म्हणजे अंतरीच्या जीव्हाळ्यासाठी ‘जिवंत निमित्त’ शोधणे.

Post Automatically to Facebook and Twitter from Google+



Do you love to share good contents with your friends on twitter and facebook ? Are you on Google+  ? If theanswer to both is yes , then here is a tool that lets you share your posts to twitter and facebook automatically whenever you post it on Google +

Start G+ is a Google Chrome extension , whenever you post something on Goggle+ , this plugin automatically post it to twitter and facebook . After you have successfully installed the plugin , next time you shareanything on Google+ you will see the twitter and facebook button below the share box  . To toggle sharing just click on the button .

आप-आपला चन्द्र

नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो

बर याला प्रेम म्हणाव, तर
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतच प्रेमात पड्लेल्या त्या दोघानकडून
अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात,

अश्याच समाजकन्टकामुळे, प्रत्येकजन प्रेमात रखड्लेला असतो,
तरी, प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो

Friday, July 15, 2011

माझे बाबा

आज गुरुपौर्णिमा ....
माझे आवडते गुरु म्हणजे माझे बाबा..
म्हणून एका
बाबांवर पण एका लहान मुलींच्या स्वरूपातील कविता आहे...
 

तिने चांगला मेकअप केला होता
व तिचा आवडता ड्रेस घातला होता
तिच्या शाळेत आज दिवस होता खास
सगळे आपल्या बाबांना घेऊन येणार होते आज

गुरुपौर्णिमा - गुरू पूजनाचा दिवस

आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.

Wednesday, July 13, 2011

मराठी हुशारी...!!!

एकदा बिल गेट्स मायक्रोसोफ्ट साठी नवा चेअरमन शोधायचा असतो..!!!
तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!
त्यातला एक असतो आपला “संकेत”
बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट करून लिहीत आहे समजदार समजून जातील)

पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५१ वर्षे पूर्ण ...

नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम....

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५१ वर्षे पूर्ण होत्तात.

पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली.

Monday, July 11, 2011

आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास


पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करा...वा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्यदैत्याला मारले. ही जी शक्तीदेवीतीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.

Thursday, July 7, 2011

आयुष्य़ाची स्वप्ने पाहताना,


आयुष्य़ाची स्वप्ने पाहताना,
वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना,
काट्याच भान ठेवायचं असतं,
प्रितिच्या मोहात वावरताना,
जपुन पाऊल टाकायचं असतं,
काळजाला झटका बसल्यावर,
कधीच रडायचं नसतं,
उध्वस्त झालेले विश्व आपल्,
शुन्यातुन उभ करायचं असतं..

मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....


मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....
माझ्या मनात कधीकधी विचार येतात
आज काल ची मुलं,
मुलींच्या मागे लागून
स्वताचा वेळ वाया का घालवतात???

Chance मिळाला तर प्रतेक मुलीला
पटवायचा प्रयातना करतात,
जर नवीन नाही पटली तर
जुन्या GirlFriend वर भागवतात.

Monday, July 4, 2011

माझी अंत्ययात्रा

माझी एक इच्छा आहे...
माझी अंत्ययात्रा मला पहायची आहे...
पहायचंय मला, कोण रडतंय माझ्या मरणावर,
अन् पहायचंय कोण हसतंय माझ्या सरणावर...
पहायचंय मला कोण म्हणतय "अरेरे गेला...!",
...अन् पहायचंय मला कोण म्हणतय "बरं झालं मेला...!"
आणि हो... अजुन एक इच्छा ऐका माझी,
मला जाळन्यापुर्वी वाट पहा 'तिची'...
येईल 'ती' जरुर हे मात्र नक्की आहे,
नाहीच आली तर, स्वर्गात भेट आमची पक्की आहे...
माझ्या तिरडीवर लावू नका फुल-तुरे,
तिच्या डोळ्यातून निघालेले दोन अश्रुच पुरे....!
माझ्या मृत्युवर नका करू कळवळT,
तिची सारी प्रेमपत्रे फ़क्त अग्निमद्धे जाळT...
मला अग्नि देता क्षणी ती सुद्धा रडणार आहे,
कारण माझ्यासोबत तिचे ह्रदय सुद्धा जळणार आहे...
मी मेल्यावरच आमचे प्रेम जगाला कळणार आहे...
.
मला बघायचा आहे कोण माझ्या कपड्यान वरून प्रेमळ हात फिरवणार आहे ...
कोण माझ्या फोटो ला कवटाळून ढसा ढसा रडत आहे...
कोण माझी खेळणी न्याहाळत आहे...
कोण माझ्या कविता वाचत आहे....
मला पाहायचा आहे कोण माझ्यासाठी मला आवडणारी खीर घेवून येत आहे...
मला पाहायचा आहे कोण मला अग्नी देता आहे..
मला पाहायचा आहे मला कोणते चार खांदे मिळत आहे आधाराला...
किती जन रडत आहे ...
आणि महत्वाचा राहिलाच किती मित्र आणि खास म्हणजे किती मैत्रिणी मला miss करणार आहे...
मला खरच
माझ्या साठी किती मुली रडत आहे हे हि मला पाहायचे आहेच... माझी अंत्ययात्रा

एक गोष्ट पैशाची

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

Friday, July 1, 2011

भेसळ

काल बायकोने खर्वस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
"कसा मस्त आहे की नाही ?"

हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले.

आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.

माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

जीवनात माझ्या शंका कुशंका ना नेहमी थार राहला राव ,
शाळेत प्रवेश घेताना पन्नास दा विचार केला आम्ही raao,
बेस्ट शाळेतच मी प्रवेश घेत आहे ना कि आहे एक फडतूस शाळा राव ??
...माझी निवड चुकली तर नाही ना राव ???

शाळेत मित्र जोडताना त्याच संभ्रम अवस्थेत जगलो आम्ही राव,
मित्र धोका देणार तर नाही ना हा विचार करत राहलो राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

दादा मला एक गणपती आण ।।

गोरा गोरा पान ,सुपाएवढे कान

गणपतीला आणायला रंगीत गाडी
गाडीला जोडली उंदराची जोडी
...उंदराच्या जोडीला चिमुकले कान
दादा मला एक गणपती आण

गणपतीला बसायला रंगीत पाट
पाटापुढे वाढले चांदीचे ताट
ताटापुढे थोडीशी रांगोळी काढ
दादा मला एक गणपती आण

गणपतीच्या ताटामध्ये मोदकाचा मान
त्याच्यावरी ठेवले तुळशीचे पान
नैवेद्य नको त्याला हाताने चार
दादा मला एक गणपती आण

बुद्धीची देवता ती फार विदवान
डोक्यावरी माझ्या इथे गणिताचा ताण
सांगून त्याला, माझा भवसागर तार
दादा मला एक गणपती आण

गणपतीच्या दर्शनाला भक्तांची रांग
सर्वांना हवे तुझ्या काळजामध्ये स्थान
अक्षम्य चुका माझ्या पोटात घाल
नि जागा माझी पिट्टूशा उंदरापाशी मांड
दादा मला एक गणपती आण

गणपतीला नको माझ्या ,डॉल्बी नि ढोल
सुपाएवढया कानांमध्ये आवाज जाई खोल
फटाक्यांच्या धुराने डोळे होई लाल
गणपतीला आवडी वीणा नि टाळ
भजनाच्या साथीला माझ्या कवितांचा ताल
दादा मला एक गणपती आण

गणपतीच्या विसर्जनाला झिन्ग्नार्यांची रीघ
तळाशी नदीच्या मुर्त्यांचा ढीग
नका रे रोखू त्याच्या श्वासांची लय
हवे त्यासी आपुल्या प्रेमाचे गीत
जोपुया सारे एकतेची रीत
दादा मला एक गणपती आण
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers