Friday, July 22, 2011
दूरदर्शन - एका बुडत्या सूर्याचे अखेरचे दर्शन
आजच्या काळात दूरदर्शन हि एक आठवणच राहिली आहे आता. आता मी पण गद्धे पंचविशी ओलांडत आहे .तरी पण आजही दूरदर्शनचा विषय निघाला कि बालपणाच्या अनेक आठवणी जाग्या होतात .आज घराघरात केबल टीवी आले आहेत पण मला हात वाटत कि त्यांना आपल्या दूरदर्शनची सर आहे .आज केबल / डिश टीवी वर इतके channel आले आहेत पण त्या दूरदर्शनची आठवण काही जात नाही .माझ्या तर अनेक आठवणी ह्या दूरदर्शनशी निगडीत आहेत .आपण जे दर्जेदार कार्यक्रम लहानपणी बघत होतो तसे आता दिसत नाहीत .सगळीकडे नुसती हाणामारी आणि अश्लीलता भरून राहिली आहे .हाय मधेय कधीतरी दूरदर्शनची अत्वान जागी होते ,आणि मग मध्यामाश्याच्या मोहोळाला धक्का लागल्यावर जश्या मधमाश्या जाग्या होतात तश्या मनाच्या मोहोळातून आठवणींच्या मधमाश्या जाग्या होतात .
आज अचानक अशी जोरात आठवण यायचं करांच तसा आहे .रोजच्या प्रमाणे सकाळी उठून एक सामान्य माणसांसारखा पेपर वाचताना बायकोने केलेल्या वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत होतो .बाहेर पाऊस सुरु होता. अचानक लक्ष एका बातमी कडे गेले .महाराष्ट्र टाइम्स मध्ये " मटा सजेशन " म्हणून एक कॉलम आहे . तिथे ह्या दूरदर्शनच्या ब्लॉग बद्दल वाचले .त्याची लिंक इथे देत आहे .म्हटले आज दूरदर्शनच्या नवावर एक पोस्ट टाकावीच म्हणजे राहावलच नाही . ऑफीसमध्ये आल्या आल्या आधी हि पोस्ट लिहायला घेतली .बऱ्याच दिवसापासून मनात घोळत होत कि ते कार्यक्रम परत बघायला मिळाले तर केती मज्जा येईल .म्हटल कि आपणच हे सुरु करावं . आज दूरदर्शनची अवस्था पहिली कि गलबलून येत .की होत आणि काय झाल
.राजकारण्यांच्या आणि शासनच्या हलगर्जीपणामुळे आज एके कालचा सूर्य अस्ताला
जात आहे .ह्या सूर्याला माझा नमस्कार .ह्याच सूर्यामूळे मोगली ,चंद्रकांता
,रामायण ,अलिफ लेला ,देख भाई देख , व्योमकेश बक्षी असे अनेक कार्यक्रम
बघितले .हे यादी नसंपणारी आहे .
आज पासून मी एक नवीन पोस्ट सुरु करत आहे .दूरदर्शनच्या मालिका आणि कार्यक्रम पोस्ट करत आहे .त्यातली आज हि पहिली पोस्ट टाकत आहे . सुरवात मी सगळ्याच्या आवडत्या आणि त्या काळात प्रचंड गाजलेल्या सुरभी ह्या कार्यक्रमच्या titile song पासून करत आहे .एकेकाळी हा कार्यक्रम इतका प्रसिद्ध होता कि हा कार्यक्रम सुरु झाला कि रस्ते ओस पडायचे .
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment