आज आपण पाहु की संपुर्ण संगणकच आपण ओपन सोर्सवर कसा चालवु शकतो! शिवाय ब्लॉग डिझाईन करताना लागणारी सॉफ्टवेअर्स - मोफत [मोफत म्हंजे फुकाट!] आहेत काय? महाजालावर - इंटरनेटवर शोधलं तर बरीच अशी सॉफ्टवेअर्स सापडतील - मात्र त्या बाबत चांगलं मत / प्रतिक्रिया असल्याशिवाय ते इंस्टॉल करायलाही आपण धास्तावतो. चला, मी वापरुन पाहिलेल्या/ वापरत असलेल्या अशाच काही मुक्त्त स्रोत आज्ञावलींबद्दल थोडक्यात माहिती करुन घेऊ!
१. संगणकप्रणाली [ऑपरेंटींग सिस्टम]: सध्या तर या विभागात मायक्रोसॉफ्टच्या विंडो'ज ची चलती आहे. मात्र मॅक [ आणि गुगलची क्रोम ] ही सुध्दा कमालीची प्रसिध्द संगणकप्रणाली आहे. मुळत: सर्वर म्हणुन वापरली जाणारी युनिक्स - लिनक्स [लायनक्स] या आता युजर इंटरफेस असणार्या रुपात उपलब्ध झाल्याने तिचाही वापर वाढतो आहे. तर - संगणकप्रणाली साठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे - उबंटु! काही दिवसांपुर्वीपर्यंत ऑनलाईन रजिस्टर करुन आपण ही संगणकप्रणाली मोफत मागवु शकत होता. मात्र आता आपण नाममात्र पैसे देवुन सीडी मागवु शकता. डाऊनलोड साठी मात्र ही संप्र अगदी मोफत उपलब्ध आहे.
विकि वरुन घेतलेली अधिक माहिती अशी:उबुंटु अथवा उबुंटू लिनक्स ही एक लोकप्रिय लिनक्स प्रणाली आहे. उबुंटूचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याचे मुख्य कार्यालय आयले ऑफ़ मॅन येथे आहे. दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध अब्जाधीश मार्क शटलवर्थ ह्याच्या प्रोत्साहनातून आणि त्याच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून उबुंटुचा विकास केला गेला आहे. स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणार्या आवृत्त्या अशी उबुंटुची वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. याशिवाय केडीई डेस्कटॉप मॅनेजर वापरून कुबुंटु, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एडुबुंटु, हलकाफुलका एक्ससीएफई विंडो मॅनेजर वापरणारा क्सुबुंटु अशी उबुंटुची अनेक भावंडे आहेत.
मी सुध्दा काही दिवस ही प्रणाली वापरली आहे. आपणांस या प्रणाली बद्दल अधिक माहिती - मदत हवी असल्यास या संगणकप्रणालीचे आघाडीचे वापरकर्ते व प्रचारक विद्यार्थी श्री. विशाल तेलंग्रे यांच्याशी संपर्क साधा!
२. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऐवजी ओपन ऑफिस: ओपनऑफिस हे उपयोजन सॉफ्टवेअर आहे. त्याची सर्वात नवी आवृत्ती ओपनॉफिस.ऑर्ग बीटा आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर मराठीतही उपलब्ध आहे. ओपनऑफिस मध्ये वर्ड - एक्सेल - डाटाबेस - प्रेझेंटेशन हे सर्व करता येते. शिवाय एका क्लिक मध्ये मस्तपैकी पी.डी.एफ. ही बनवता येते. [ तुमच्या ब्लॉग - पोस्टचे ई-बुक बनवण्यासाठी झक्कास ना!] देवनागरी - मराठी - हिंदी वगैरे भाषांसाठीही ओपनऑफिस एकदम उपयुक्त आहे. उबुंटु संगणकप्रणाली सोबतही आपण हे ओपनऑफिस इंस्टॉल करु शकता.
उबुंटु संगणकप्रणाली सोबत फायफॉक्स ब्राऊजर व ईतर बरीच सॉफ्टवेअर्स येतात. थोडक्यात उबुंटु संगणकप्रणाली आपला संगणक वापरण्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करुन देते.
जर आपण मॅक संगणकप्रणाली वापरत असाल व अशाच काही मुक्त्त स्रोत आज्ञावली [ओ.सो. सॉ.] साठी ओपनसोर्समॅक.ओर्ग या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
आता ब्लॉग च्या डिझाईन बद्दल बोलु:
३. फोटो एडिटींग - ग्राफिक्स यांसाठी: या विभागात फोटोशॉप हे सगळ्यात वरती आहे. मात्र ते घेणं सगळ्यांनाच परवडेल असं नाही! तर त्यासाठी मुक्त्त स्रोत मध्ये "गिंप" नावाचं सॉफ्टवेअर आहे. मी अजुनही ते वापरतोय. सुरुवातीला थोडा सराव केला तर यात बर्याच गोष्टी करता येतील. माझ्या ब्लॉगवरील बर्यापैकी ग्राफिक्स गिंप मध्येच बनवलेली आहेत.
या शिवाय काही ऑनलाईन एडिटरही आहेत जसं:
एविअरी: यामध्ये फोटो इफेक्ट पासुन गाण्याचे इफेक्ट करता येतात
पिक्सलर: फोटो इफेक्ट
पिकनिक: फोटो इफेक्ट व काही कलाकारीही करता येते!
शिवाय गुगलचे पिकासा मध्ये आपणांस काही सुंदर फोटो इफेक्ट्स देता येतील.
इतर काही छोटी - पण उपयुक्त माहिती:
४. फेव-आयकन: ब्लॉग किंवा संकेतस्थळावर बुकमार्क केलेल्या दुव्यासमोर दिसणारा तो छोटासा आयकन आपण पाहिलाच असेल. तो ऑनलाईन तयार करण्यासाठी डायनॅमिक ड्राईव्ह ला भेट द्या. शिवाय या संकेतस्थळावर आपणांस अजुन काही उपयोगी प्रोग्राम मिळतील.
५. एव्हरीस्टॉकफोटो.कॉम: ब्लॉगवर वापरण्यासाठी फोटो - तेही कॉपीराईट्सच्या माहितीसहीत शोधण्यासाठी हे एक उत्तम संस्थळ. एडव्हांस सर्च वर क्लिक करुन "लायसेंस" च्या खाली - Show only licenses that allow commercial usage हा पर्याय निवडा. शिवाय त्या फोटो - इमेजच्या वापराबद्दलची माहितीही त्याच फोटोखाली मिळेल.
तुम्हालाही माहित असणारी काही उपयुक्त माहिती प्रतिक्रियेच्या स्वरुपात देता येईल! ... चला अधिक माहिती पुढच्या पोस्टमध्ये!
0 comments:
Post a Comment