- आले तीक्ष्ण, अग्निप्रदीपक, वायूहारक, तिखट, कफहारक, उष्ण व रुक्ष असे आहे.
- आले जेवणाच्या आधी मिठाबरोबर खाल्यास अरुचीवर फायदा होतो.
- आले व पुदिनाच्या रसात थोडे सैंधव घालून प्यायल्याने पोटशूळ बरा होतो.
- अरुची वाढणे, गॅसचा त्रास होणे. करपट ढेकरा येणे. अपचन, भूक न लागणे, मलावरोध होणे यावर सोपा उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात तेवढाच लिंबाचा रस घेऊन त्यात थोडे सैंधव घालून रोज सकाळी घेणे.
- आल्याचा व कांद्याचा रस एकत्र घेतल्याने उलटी बंद होते.
- घशात साचलेला कफ काढण्यासाठी दोन चमचे आल्याच्या रसात चमचाभर मध घालून प्यावे. यामुळे पोटातला वायूही दूर होतो. खोकल्यामध्ये, दम, श्वास लागणे इत्यादी विकारांवरही या उपायाने गुण येतो.
- ताप आलेल्या व्यक्तीस आल्याचा व पुदिन्याचा रस दिल्यास घाम येऊन ताप उतरतो.
- सर्दी झाली असता चहामध्ये आले ठेचून घालावे व तो चहा प्यावा. आराम मिळतो.
- लहान मुलांना दूध पचत नसेल तर त्यात थोडे आले ठेचून उकळवावे व मग ते दूध द्यावे.
- आवाज बसला असेल किंवा घसा दुखत असेल तर आले, लवंग, मीठ एकत्र करून खावे.
- आल्याचा रस खडीसाखरेसोबत घेतला असता भोवळ येणे, चक्कर येणे थांबते.
- आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळल्याने उचकी बंद होते.
टीप :
- ज्यांना कोरडा खोकला, आम्लपित्त, रक्तदाब, पंडुरोग किंवा मूत्रविकार आहे त्यांनी आल्याचे सेवन टाळावे.
- पावसाळ्यातील अनेक आजार हे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आलं हे उत्तम औषध आहे. साधारण जंतू संसर्गापासून ते कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करण्याचे काम आलं करते.
-
आल्याच काढा- आल्याचा काढा बनवण्यासाठी १५ ग्रॅम आलं वाटून एक कप पाण्यात टाकून उकळवावे व गाळावे. हा काढा असाच घेऊ शकता. यात लिंबू, गुळ किंवा मध, पुदिना टाकल्यास मस्त पाचक सरबत बनते.
0 comments:
Post a Comment