"कसा मस्त आहे की नाही ?"
हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले.
आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.
हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.
आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा > त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत > त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवध्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.
थोडा विचार +विचारपुस करता " जिलेटिन " + दुध = खरवस हा फॉर्मुअला समजला.
बाटली बंद " लोणची " आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत , लोण्च्यामधील तेलाचे प्रमाण व लोण्च्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......
दोन चार ठिकाणी चापापणी केली . मग ऊलगडा झाला. " लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )आसते.
बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक आसिड " ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक आसिड = फक्कड लस्सी.
हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.
हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर " पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्यजी थोडा पानी ऑर्.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्शा खूप स्वस्त आहेत.
ऊसाचा रस ऊन्ह्ळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन " वापरतात्..... थोढ्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्यचा वापर एवढा सर्रास नाही.
टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून " बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो .
नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...
ही थोडी झलक.
एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .
शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी .
तो पर्यन्त " वडापावाच्या" लसूण चट्णीत " लाकडाचा नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात
लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.
1 comments:
ase kaheetaree hot asnaar yaachee shanka hoteech...pan lassi chya formula ne chakeet kele.
amache vadil nehamich mhanat...hotel madhe khaayche asel tar tyachya bhataarkhaanyaat kadhihi dokawun naye. pan tyaweles hotel madhe khaane hi navalaee hotee. aajachya saarkha roj uthun hotel madhe khaanyachya sanskruti madhe citric acid ani baki bhesal tabbeticha nuksaan kelyashiwaay rahanaar nahi.
changla lekh ahe.
Post a Comment