Demo Site

Thursday, July 21, 2011

बॉम्बस्फोटात मृत झालेल्या व्यक्तीचे आत्मवृत्त............


काल १३ जुलै २०११ रोजी कबुतरखान्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलो,कित्ती बरं वाटतंय स्वर्गात येऊन.बरं झालं त्या भूलोकीच्या नरकातून सुटका तरी झाली एकदाची.संचार करता करता म्हणलं,नेहमीच्या रहाटगाडग्यात थोरामोठ्यांना पुस्तक रुपात सुद्धा भेटता आलं नाही,आता आलोच आहे तर म्हणलं प्रत्यक्ष भेटूनच घेऊ सर्वांना,तेवढ्यात छ.शिवाजी महाराज भेटले,म्हणाले "आलाssssत ........या..स्वागत आहे तुमचे.कालच्या बॉम्ब स्फोटात मेलात ना,खूप मर्दुमकी गाजवलीत! " कुठे गेले ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न?"आधी लगीन कोंडाण्याच आणि मग माझ्या रायबाचं" असं म्हणणारा तानाजी मालुसरे याच प्रदेशात जन्माला आला होता ना? मग कुठे गेली ती मनाची कणखर वृत्ती?पावनखिंडीत आपलं शीर तळहातावर घेऊन लढणारे बाजीप्रभू येथेच जन्मले होते ना मग दर वेळेला हे दहशतवादी देशाला खिंडीत गाठतातच कसे,स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या खंडोजी खोपडेचा कडेलोट करणाऱ्या आमच्या नशिबात देशाशी गद्दारी करणारेच सत्तेवर बसलेले पाहण्याचे दुर्भाग्य का म्हणून यावे?.राजाचं म्हणणं ऐकलं आणि शरम वाटली स्वतःची.आणि पुन्हा आपल्या वाट धरली.

पुढे जातो ना जातो तोच भेटले लोकमान्य टिळक,म्हणले,"आम्ही आज हिंदुस्थानात हयात असतो तर विचारले असते ,"हिंदुस्थानी जनतेचे डोके ठिकाणावर आहे काय ?" आणि छातीठोकपणे पुन्हा गर्जलो असतो "सुरक्षा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो आम्ही मिळवणारच....".तेवढ्यात आगरकर येऊन म्हणले "पहा टिळक,पहा ओरडून ओरडून सांगत होतो देशाला स्वातंत्र्याच्या आधी सुधारणेची,वैचारिक प्रगल्भतेची गरज आहे,केले ना ह्या लोकांनी राष्ट्राचे वाटोळे?".म्हणलं "इतका खोलात जर विचार केला असता तर माझ्यावर आणि माझ्यासोबत जे हिंदुस्थानात केवळ शरीररूपाने जिवंत आहेत अश्यांवर ही वेळ येऊन ठेपली नसती.......".पुढे चालू लागलो..

मजल दरमजल करत चालतोय तोच एक तेजःपुंज व्यक्ती समोर आली आणि ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर.जरा चिडलेलेच दिसले,म्हणाले "की घेतले न आम्ही व्रत हे अंधतेने" म्हणून स्वातंत्र्यासाठी आमच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या आमच्या देशात लोक देशाचे सरकार आंधळेपणाने निवडून देतात,भ्रष्टाचारी आणि मतांसाठी म्लेंच्छांच्या दाढ्या कुरवाळणारे हे लोक मग काय तुमचे संरक्षण करतील?मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस,भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव ह्यांना इतक्यात तुम्ही विसरलात?अरे ह्या देशाला केवळ चरखा चालवून स्वातंत्र्य नाही मिळाले,स्वतःच्या प्राणांचे बलिदान अनेक लोकांनी केले आहे,अनेकांना असह्य यातना सहन कराव्या लागल्या आहेत.इतक्यात का हे सगळे तुम्ही विसरलात?स्वार्थी लोकांनो धिक्कार असो तुमचा!
मित्रहो असं वाटलं खरच routine lyfe मध्ये इतका बिझी होतो,की कधी विचार सुद्धा केलं नाही ह्या गोष्टींचा.पण,मी केली ती चूक तुम्ही 'जिवंत' हिंदुस्थानी नागरिक करू नका.जागे व्हा..राजकीय, सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ होण्याचा प्रयत्न करा.जात,भाषा,प्रांत ह्या सर्वांच्या डबक्यात अडकून पडू नका,प्रखर राष्ट्रीयत्व अंगी भिनवाल तरच तुम्ही मुक्तपणे संचार करू शकाल,अन्यथा तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुमच्या नावाने शिव्या शाप देत बसतील,दुसरा काही पर्यायच त्यांच्यासमोर उरणार नाही.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers