बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा
स्वार्थी बनत चालला माणूस, काळ बदलतोय माणुसकीचा.....
ज्यांनी केले लहानाचे मोठे, त्यांना आज मुले विसरली
स्वता राहिले उपाशी तापाशी, मुलांच्या जीवनात सूखे भरली
रात्रण दिवस मेहनत करुनी, स्वता ओढली दुखाची सावली
त्याच मुलांनी घरा बाहेर काढुनी, गळा घोटला मनवतेचा.....
हीच आहे का आजची पीढी, प्याशन पैशापाठी धावत चालली
आई वडीलांनी घाम गालुनी, मुलांसाठी अनेक स्वप्न पाहीली
यांच मुलांनी हाकलून देताच, स्वप्न यांची अश्रुंनी वाहीली
अरे देव कोणी पाहीला नाही, पण देवारा असतो हा प्रतेक घरचा.....
भरत चालली आज वृध आश्रमे, जड वाटू लागले आई बाप
उतरत्या वयात सहारा छिनूनी, मुले करतात मोठे पाप
आई वडिलांना पैशाने तोलतात, विसरून जातात कर्तव्याचे माप
काय म्हणायच या पिढीला, स्वार्थ आहे हा आंधळे पणाचा.....
देवालाही जे जमले नाही, ते दिले आज आई वडिलांनी
पैशापुढे सर्व विसरले, मुले नाही त्यांची ऋणी
मुले असून नसल्या सारखे झाले, अनाथ झाले हे म्हातारपणी
आजच्या पिढीस सागने आहे, अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.
0 comments:
Post a Comment