skip to main |
skip to sidebar
ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक
करून घेण्याचं
ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून
डब्यातलं खायचं
ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी
बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला
सांगून टाकायचं तिच्या उत्तराची वाट
पाहत रात्रंदिवस झुरायचं
ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर
नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत
एम.एस.ची स्वप्नं पहायचं
ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन
स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल
इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही
भांडणं झाली तरी आपण
मात्र शांत रहायचं
ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर
जागायचं शेअर मार्केटच्या
तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना
नाचवायचं
ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे
हट्ट पुरवायचं त्यांच्या साठी स्थळ
शोधताना आपलं तारूण्य आठवायचं
ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्या
पार पाडल्यावर गॅलरीत
पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त
यमाच्या निर्देशाची
वाट पाहत बसण्याचं.....
- अनामिक
0 comments:
Post a Comment