कधी कधी माझा मी
मलाच उमगत नाही
भेटती सारे सगे नव्याने
परी मी गवसत नाही.........
भास्-आभासांचा रंगे
खेळ हा सारा......
कधी स्तब्ध किनारे
कधी वादळी वारा
ह्या वार्यावर भरकटताना
मी मजला अडवत नाही.....
...........................कधी कधी माझा मी
सुटल्या सार्या गाठी
मी निखळून गेलो
गुंतल्या सार्या वाटा
मी हरवून गेलो
मागे सांडलेल्या पाऊलखुणा
आता मजला ओळखत नाही...
...........................कधी कधी माझा मी
होती जेव्हा सांज आसुसलेली
मी बहकलो नाही
होती जेव्हा रातराणी बहरलेली
मी मदहोशलो नाही
आता शोधतो ती चांदणी नशीली
पण ती रात्र वैरी उगवत नाही.........
कधी कधी माझा मी
मलाच उमगत नाही
भेटती सारे सगे नव्याने
परी मी गवसत नाही.........
कधी कधी माझा मी
मलाच उमगत नाही
भेटती सारे सगे नव्याने
परी मी गवसत नाही.........
भास्-आभासांचा रंगे
खेळ हा सारा......
कधी स्तब्ध किनारे
कधी वादळी वारा
ह्या वार्यावर भरकटताना
मी मजला अडवत नाही.....
...........................कधी कधी माझा मी
सुटल्या सार्या गाठी
मी निखळून गेलो
गुंतल्या सार्या वाटा
मी हरवून गेलो
मागे सांडलेल्या पाऊलखुणा
आता मजला ओळखत नाही...
...........................कधी कधी माझा मी
होती जेव्हा सांज आसुसलेली
मी बहकलो नाही
होती जेव्हा रातराणी बहरलेली
मी मदहोशलो नाही
आता शोधतो ती चांदणी नशीली
पण ती रात्र वैरी उगवत नाही.........
कधी कधी माझा मी
मलाच उमगत नाही
भेटती सारे सगे नव्याने
परी मी गवसत नाही.........
0 comments:
Post a Comment