Demo Site

Friday, August 17, 2012

काळाकिल्ला



किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : मुंबई
श्रेणी : सोपी

आजची एकसंध दिसणारी मुंबई ही पूर्वी सात बेटांचा समुह होती. ही बेटे ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आपले पारंपारीक शत्रु सिध्दी, मराठे, पोर्तुगिज ह्यांच्या पासून मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याला स्थानिक लोक ‘‘काळ किल्ला‘‘ म्हणून ओळखतात.

Friday, August 10, 2012

महाभारत : काल्पनिक काल्पनिक कि सत्य ??




महाभारत के बाद से आधुनिक काल तक के सभी राजाओं का विवरण क्रमवार तरीके से नीचे प्रस्तुत किया जा रहा है...!


आपको यह जानकर एक बहुत ही आश्चर्य मिश्रित ख़ुशी होगी कि महाभारत युद्ध के पश्चात् राजा युधिष्ठिर की 30 पीढ़ियों ने 1770 वर्ष 11 माह 10 दिन तक राज्य किया था..... जिसका पूरा विवरण इस प्रकार है :

क्र................... शासक का नाम.......... वर्ष....माह.. दिन

Monday, July 30, 2012

कोथळीग



उंची : ४७२ मीटर/१५५० फूट
प्रकार :गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी :बिकट
ठिकाण : महाराष्ट्र
जवळचे गाव : पेठ(ता.कर्जत जि.रायगड)
डोंगररांग :कर्जत-भिमाशंकर



कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.

धारावी किल्ला




किल्ल्याची ऊंची : 190
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे
श्रेणी : सोपी

वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला, भाइंदर जवळ आहे. अनेकजण धारावी किल्ला व धारावी झोपडपट्टीत असलेला "काळा किल्ला" ह्यात गफलत करतात. चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत ह्या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती. इ.स. १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले. धारावी किल्ला वसईच्या किल्ल्यासमोर आहे. एका बाजूला वसईची खाडी, दुसर्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्रा व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते.

दुंधा किल्ला




किल्ल्याची ऊंची : 2280
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील बागलाणात कर्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. दुंधा किल्ल्याला स्थानिक लोक किल्ला म्हणून न ओळखता दुंधेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात. श्रावणी सोमवारी गडावर यात्रा भरते.
पहाण्याची ठिकाणे :दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी दुंधेश्वर महाराजांचे देऊळ आहे. या देवळांच्या बाजूला पाण्याची विहीर आहे. देवळाच्या बाजूने गडावर चढायची पायवाट आहे. ही पायवाट गर्द झाडीतून जाते. १० मिनीटात आपण दगडात खोदलेल्या पायर्यांपाशी येतो. या पायर्या चढून गेल्यावर शंकर मंदिराजवळ येतो. २ डेरेदार वृक्षांच्या सावलीत हे छोटेखानी मंदिर उभ आहे. मंदिराच्या मागे पाण्याचे छोट कुंड आहे, पण या पाण्याला कुबट वास येत असल्यामुळे त्याचे पाणी केवळ भांडी घासण्यासाठी वापरतात.

दुर्गाडी किल्ला




किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे
श्रेणी : सोपी
प्राचीन काळापासून कल्याण हे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिध्द होते. ह्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी, ११ बुरुज व अनेक दरवाजे होते. कल्याणच्या ह्या भूइकोटा शेजारी खाडीवर शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला बांधला व मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.

गडगडा (घरगड)




किल्ल्याची ऊंची : 3156
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अंबोली पर्वतरांग (नाशिक)
जिल्हा : नाशिक
श्रेणी : अत्यंत कठीण
नाशिकपासून १८ किमीवर असलेल्या "गडगड सांगवी" गावाच्या मागे एक डोंगररांग पसरलेली आहे स्थानीक लोक या डोंगररांगेस अंबोली पर्वत या नावाने ओळखतात. या पर्वत रांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. यातील उजवीकडील शिखराला ‘अंबोली‘ व डावीकडील शिखराला ‘अघोरी’ या नावाने ओळखतात. या दोन शिखरांच्यामध्ये असलेले शिखर म्हणजे ‘गडगडा किल्ला’ होय. हा किल्ला सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. किल्ल्याचे स्थान पाहाता याचा उपयोग मुख्यत: टेहाळणीसाठी केला जात असावा.


किल्ल्याची ऊंची : 2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: तळ कोकण
जिल्हा : कोल्हापूर
श्रेणी : मध्यम

महाराष्ट्राचे ‘‘चेरापूंजी’’ म्हणून ओळखल्या जाणार्या गगनबावडा गावात गगनगड उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मुळ स्थान, १९ व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रकाश झोतात आले. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे आजही गडावर लोकांचा राबता आहे.

Thursday, July 19, 2012

चौल्हेर



किल्ल्याची ऊंची : 3700
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच गड आहे. चौरगड चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे.

कुलाबा किल्ला



किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे.

अफजलखानाचे थडगे



ही कोणती वास्तू आहे ते ओळखले का?
नाही ओळखता आले तरी काही हरकत नाही, कारण ही जी ईमारत सोबतच्या फोटोत दिसत आहे तीला लवकरच जमिनदोस्त करण्यात यावे असा निर्णय खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला आहे.

मुळात ही ईमारतच बेकायदेशीर आहे. वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करूनच हे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहे.
ही ईमारत ज्या ईसमाच्या नावाने बांधलेली आहे तो ईसम तर तिनशे वर्षाँपुर्वीच नरकात (जहन्नूम) गेलेला आहे.
खुद्द शिवाजी महाराजांनी आपल्या पवित्र हातांनी त्या नराधमाचा कोथळा काढून मरणांति वैराणि ह्या न्यायाने त्याचे थडगे तीथे बांधले होते.

बरोबर, आता अगदी बरोबर ओळखलेत!
होय, त्या अफजलखानाचे  हे थडगे आहे.
मुळच्या लहानशा दगडी कबरीभोवती हे प्रचंड आणि अलिशान बांधकाम अलीकडच्या काळातच बांधण्यात आलेले आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी जरा खालीच बेकायदेशीरपणे व वनखात्याची जमीन बळजबरीने अतिक्रमण करत केलेले हे बांधकाम समस्त शिवप्रेमी मराठी जनतेला वाकूल्या दाखवत उभे आहे.

खुद्द महाराजांचा प्रतापगड जीर्ण व दुर्लक्षीत अवस्थेत असताना हे त्या नराधमाचे थडगे मात्र मोठ्या दिमाखात उभे आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशद्रोही शक्तीँना प्रोत्साहन देणारे सरकार राज्य करत असल्यामूळेच असले प्रकार ह्या शिवरायांच्या पावन भुमीत घडत आहेत.

मित्रांनो हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात यावे असा आदेश सुप्रिम कोर्टाने 5 मार्च रोजीच आपल्या राज्य सरकारला दिलेला होता.
मात्र हे बांधकाम पाडणे तर दुरच उलट तिथे संरक्षणासाठी पोलीसांची जादा कुमक पाठवण्याचे काम गृहमंत्री आबांनी करून आपण शिवरायांपेक्षा अल्पसंख्यक समाजाच्या अफजलखानाला अधीक मानतो हे दाखवून दिले.

तसेच हे बांधकाम पाडण्यात येऊ नये अशी याचिकाच अफजलखान मेमोरियल ट्रस्टने सुप्रिम कोर्टात दाखल केली होती.
मात्र मा. कोर्टाने नुकतीच ही याचिका निकालात काढलेली आहे व याचिका मागे घेण्याचे आदेश दिलेले आहेत.



संदर्भ - http://www.facebook.com/drpriya.pawar

जेनेरिक औषधे


तुमच्या डॉक्टरनं लिहून दिलेलं एखादं औषध तुम्हाला खूप्पच महाग वाटलं तर तुम्ही काय करता ?... ' अरे बापरे ' म्हणत, मनातल्या मनात शिव्या देत, खिशातले पैसे केमिस्टच्या हातावर टेकवून निमूटपणे ते औषध खरेदी करता... हो ना ? मग आता, ऑगस्ट महिन्यापासून महागडं औषध असं नाखुषीनं विकत घ्यायची गरज नाहीए. कारण, महागड्या औषधांना स्वस्त औषधांचा पर्याय देणारी एसएमएस सेवा केंद्र सरकार देशभर सुरू करतंय.


आमीर खानच्या ' सत्यमेव जयते ' मधून जेनेरिक औषधांवर प्रकाशझोत पडल्यानंतर, कुठलंही औषध घेताना सजग नागरिक त्याच्या ' ख-या ' किमतीचा विचार करू लागलाय. अनेक औषधांच्या किंमती अगदीच नगण्य असतात, पण कंपन्या ' ब्रँडिंग ' चा भरभक्कम खर्च आपल्या खिशातून वसूल करतात, हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे अनेकांनी जेनेरिक औषधं कुठे-कशी मिळतील, याचा शोध सुरू केलाय. त्यांचं हे संशोधन सोपं करण्यासाठी सरकार पुढे सरसावलंय. फक्त एका एसएमएसवर त्यांना त्याच आजारावरची, समान घटकद्रव्यं असलेली, दोन-तीन इतर कंपन्यांची स्वस्त औषधं सुचवण्याची अभिनव योजना त्यांनी आखली आहे.


समजा, तुम्हाला डॉक्टरांनी एखादं औषध सुचवलं आणि त्याची किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाइलवरून ठरावीक नंबरवर एसएमएस करायचा. त्यानंतर काही वेळातच, त्याच औषधाला दोन ते तीन पर्याय तुम्हाला सुचवणारा मेसेज तुम्हाला येईल. उदाहरणच द्यायचं झालं तर, तुम्हाला डॉक्टरांनी ' ऑग्मेंटिन ' ही टॅब्लेट सुचवली आणि तुम्ही हे नाव संबंधित नंबरवर एसएमएस केलंत, तर कदाचित तुम्हाला
' मॉक्सीकाइंड सीव्ही ' हा पर्याय सुचवला जाऊ शकेल. ही गोळी ' ऑग्मेंटिन ' पेक्षा स्वस्त आहे. अर्थात, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही पर्यायी गोळी घ्या, अशी सूचनाही मेसेजसोबत केली जाणार आहे.


या एसएमएस सेवेमुळे समान गुण असलेलं औषध ग्राहकांना स्वस्त दरात मिळू शकेल, असा विश्वास एका अधिका-यानं व्यक्त केला. अँटि-इन्फेक्टिव्ह, पेनकिलर्स, गॅस्ट्रो-इन्टेस्टाइनल औषधांना पर्याय देण्याची जय्यत तयारी केंद्र सरकारनं चालवली आहे. काही वेळा डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधाची किंमत आणि पर्यायी औषधाच्या किंमतीत १० ते १५ पट फरक असू शकेल.


काही वर्षांपूर्वी, केमिस्टच्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारनं अशीच हेल्पलाइन सुरू केली होती. एखादं औषध नसल्याचं सांगून त्याऐवजी महागडं औषध देणा-या औषध विक्रेत्यांना त्यामुळे चांगलाच चाप बसला होता.


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15015816.cms

आषाढ अमावस्या


आषाढ अमावस्या म्हणजे ‘दिवळी अमावस्या‘ किंवा ‘दिव्याची आवस‘ असे म्हणतात . हल्ली त्याला ‘गटारी‘ हे घाणेरडं नाव का दिलं आहे कुणास ठाऊक…..!
गटारी आमावस्या चा अर्थ नुसते दारू पिऊन धुंद होत मांस-मच्छीवर आडवा हात मारणे असा आहे का.......?,
की…..,याचे आणखीनही काही दुसरे महत्त्व आहे….!
हे…..आपल्याला माहीत आहे का.....? 


पूर्वी घरातले सर्वच्या सर्व दिवे पितळेचेच असत.
त्या दिवशी ते घासूनपुसून लख्ख करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं.कणे-रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहायची.गोडाचा नैवेद्य ठेवायचा. लामण दिव्याने त्या प्रज्वलित केलेल्या सगळ्या दिव्यांना आरती ओवाळायची. आषाढी अमावस्येला दीपपूजेला महत्त्व असतं.


अशा या दीप आमावस्येला दिव्यांची पूजा करून सर्वाना “तमसो मा ज्योतिर्गमय” असा संदेश देऊन आषाढ आमवस्या साजरी करुया
सर्वाना दीप आमावस्येच्या ज्योतिर्गमय शुभेच्छा !!!


माहिती स्त्रोत - स्मिता टिकले

Monday, April 23, 2012

Indian Independence Act, 1947

इस फोटो को अधिक से अधिक शेयर करें ..... "Transfer of Power Agreement" को जाने और दुसरो को बताएं 14 अगस्त 1947 कि रात को आजादी नहीं आई बल्कि ट्रान्सफर ऑफ़ पॉवर का एग्रीमेंट हुआ था सत्ता के हस्तांतरण की संधि ( Transfer of Power Agreement ) यानि भारत के आज़ादी की संधि | ये इतनी खतरनाक संधि है की अगर आप अंग्रेजों द्वारा सन 1615 से लेकर 1857 तक किये गए सभी 565 संधियों या कहें साजिस को जोड़ देंगे तो उस से भी ज्यादा खतरनाक संधि है ये | 14 अगस्त 1947 की रात को जो कुछ हुआ है वो

Tuesday, March 13, 2012

Top 10 Free Proxy Softwares


To visit YouTube, Twitter, Facebook and some other websites that are blocked in China, sometimes I use free online proxy tools, but most of the time, I like using free proxy softwares, since they are faster and free of ADs.
Among those free proxy softwares, below 10 are the most popular.

1. Freegate

Free Proxy Software
The Freegate proxy software supports both English and Chinese languages, you can download and run it without any installation.
When Freegate runs, it will automatically open Dynaweb homepage in IE, which you can turn off in the settings. For any other browser, you can set the browser HTTP proxy to 127.0.0.1:8580.

Saturday, March 3, 2012

10 Essential Blogger Plugins and Blogger Widgets

Blogger one of the widely used blogging platform, and a favorite of mine. When it comes to plugins and widgets availability, there are numerous available over the Internet, but choosing the best is little tricky. So here is our collection of 10 best blogger plugins and widgets, which takes blogger a step ahead in blogging. Lets get into serious blogging.

Tuesday, January 31, 2012

टॅब्लेट पीसी घेताय? "अल्ट्राबुक'साठी थांबा!

डेस्कटॉप, लॅपटॉपनंतर आले नोटबुक, टॅबलेट पीसी...पण आता टॅब्सलाही मागे टाकणारे "अल्ट्राबुक' आले आहेत. लॅपटॉप आणि टॅब पीसीचे कॉम्बिनेशन म्हणून "अल्ट्राबुक'कडे पाहिले जात आहे. सुरू होण्यासाठी (बूट) काही मिनिटांचा वेळ घेणारे लॅपटॉप आणि कायम ऑन असलेले टॅब्स याचा सुवर्णमध्य साधत, अल्ट्राबुक डिव्हाइस काही सेकंदांतच सुरू होतो, आणि एकदा चार्ज केले की त्याची बॅटरी तब्बल दहा तास चालते. "विंडोज 7' वर चालणारा हा डिव्हाइस म्हणजे 0.8 इंच जाडी असलेला परिपूर्ण कॉम्प्युटर आहे.

कशामुळे हा अल्ट्राबुक एवढा फास्ट काम करू शकतो? इंटेलच्या "सॅंडी-ब्रीज प्रोसेसर' (कोअर ळ3 पासून ळ7) आणि यूएसबी 3.0 पोर्टची कमाल आहे. अन्य कॉम्प्युटरचे प्रोसेसर इंटेलच्या तुलनेत फारच स्लो आहेत. यूएसबी 3.0 मुळे डेटा ट्रान्स्फरचा स्पीड दहापटीने वाढलेला आहे. म्हणजे एखादी वीस पंचवीस जीबीची फाइल काही सेकंदांतच ट्रान्स्फर होऊ शकते. आणि यूएसबीच्या आधारे डिव्हाइस चार्जिंग करायला वेळही खूप कमी लागतो. अल्ट्राबुकमध्ये "बॅक-लिट कीबोर्ड'ही वापरायला मिळतो.

Friday, January 6, 2012

मि. ईस्टवूडचे साहस

 ईस्टवूडने मान वळवून आढ्याकडे पाहिलं. परत खाली जमिनीकडे, तिथून उजव्या भिंतीकडे. शेवटी काही निश्चयानंच त्याने पुढ्यात ठेवलेल्या आपल्या टा‌ईपरायटरकडे लक्ष केंद्रित केलं. मात्र ठळक टायपात छापलेलं शीर्षक सोडलं तर तो कागद पूर्ण कोरा होता.

’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ असं ते नाव होतं. एक लक्षवेधक शीर्षक! 'असल्या नावाच्या गोष्टीत आहे तरी काय? एक काकडी! आणि ती सुद्धा दुसरी? वाचून तरी बघूयात.' असा विचार वाचकाने नक्कीच केला असता, अँथनी ईस्टवूडला वाटलं. या रहस्यकथांच्या बादशहाने एका साध्या काकडी भोवती किती थरारक कथानक गुंफले आहे! वाचक नक्कीच खिळून गेला असता.
इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. कथा कशी असावी हे चार लोकांप्रमाणेच अँथनी ईस्टवूडला चांगलं माहीत असलं तरी गाडं पुढे सरकत नव्हतं. शीर्षक आणि कथानक हे कथेचे मुख्य घटक. ते जमलं तर बाकीचं जमायला काय वेळ लागणार? आणि कधीकधी तर शीर्षक सुचलं की कथा आपो‌आप सुचत जाते. मात्र यावेळी शीर्षक साधलं तरी कथानकाचा मागमूस नव्हता.
अँथनी ईस्टवूडची नजर पुन्हा एकदा, काहीतरी सुचावं, कथानकाला आकार यावा म्हणून छत, भिंतीवरचा वॉलपेपर वगैरेंवरून रेंगाळत राहिली. मात्र विशेष काही जमत नव्हतं. "नायिकेचं नाव असावं सोनिया" काहीतरी सुरुवात करण्यासाठी अँथनी स्वत:शीच म्हणाला. सोनिया किंवा मग डोलोरस. तिचा वर्ण असेल मोतिया रंगाचा! मात्र आजारपणामुळे पांढराफटक दिसतो तसा नाही. तिचे डोळे! थांग न लागणार्‍या एखाद्या गूढ जलाशयासारखे. नायकाचं नाव असेल जॉर्ज! किंवा मग जॉन. काहीतरी छोटंसं आणि ब्रिटीश. मग माळ्याचं नाव? अर्थात कथेत माळी तर असायलाच हवा होता. काहीही करून ती काकडी कथेत घुसडण्यासाठी तो बराच उपयोगी पडला असता. त्याला आपण स्कॉटिश बनवूया. एकदम निराश आणि चिडचिड करणारा.
अँथनीची ही पद्धत कधीकधी काम करत असली तरी आज मात्र त्यातून काही निष्पन्न होण्याचे चिन्ह दिसेना. कारण त्याने स्वत: कितीही जॉर्ज, सोनिया आणि त्या माळ्याला नजरेसमोर आणले तरी आपण जरा अंग मोडून हालचाल करावी, इकडेतिकडे फिरावं अशी त्या कुणाचीच इच्छा दिसत नव्हती. "एखादं केळं पण चालून जा‌ईल म्हणा!" अँथनीने मनाशीच विचार केला. किंवा मग सॅलड, एखाददुसरी स्थानिक भाजी वगैरे. स्थानिक म्हणताच एखादा अमीर उमराव, हरवलेले महत्त्वाचे दस्त‌ऐवज वगैरे गोष्टी झरझर त्याच्या नजरेसमोर तरळल्या. पण क्षणभरच! प्रकाशाचा एखादा किरण चमकून गेल्यासारखं त्याला झालं, मात्र मागे काहीच उरलं नाही. अमीर उमरावदेखील आकार घे‌ईना आणि आता तर काकडी, चिडखोर माळी वगैरे सर्वच गोष्टी त्याला विजोड वाटू लागल्या.

Wednesday, January 4, 2012

ऑफिस मध्ये facebook / orkut सारख्या block site कश्या उघडाल ?

facebook हि site जगातील बरेच जण वापरतात. मित्रांना, नातेवाईकांना एकमेकांशी जोडण्याचे काम हि site खूप चांगल्या प्रकारे करते आहे. हि website आज तरुणांच्या गळ्यातील ताइत झाली आहे. काही कला पूर्वी orkut हि website हि इतकीच प्रसिद्ध झाली होती. म्हणतात ना " कालाय तस्मेय नमः "
         तर मी म्हणत होतो कि facebook प्रसिद्धी दिवसंदिवस वाढतच आहे. हि गोष्ट तरुणांसाठी छान आहे पण विविध ऑफिस साठी हि एक डोकेदुखी ठरत आहे. अनेक ऑफीस मध्ये हि site block करण्यात आली आहे. माझे हि ह्या site वर account  आहे आणि मी हि हि site खूप वापरतो. माझ्या ऑफीस मध्ये हि site  block करण्यात आली आहे. आता हि सीते कशी वापरायची हा माझ्यापुढे एक यक्ष पेर्श्ना निर्माण झाला होता. तसा तो अनेक लोकांसमोर निर्माण होतो. काही जण काही गैर मार्गाचा वापरकरून website वापरतात तर काही चरफडत boss च्या नावानी शांत बसतात. मी बरेच दिवस ह्यावर उपाय शोधत होतो. शेवटी मला एक छान उपाय सापडला. तर आज्ज आपण ह्या श्या ऑफीस मध्ये बंद केलेल्या site कश्या उघडायच्या हे आपण बघणार आहोत .
  1. सर्वात आधी http://hootsuite.com  हि site उघडा.
  2. इथे जाऊन Sign Up Free click करून फ्री registration करून घ्या .
  3. एकदा  registration झाले कि तुमच्या account चा dashboard उघडेल.
  4. त्यातील Add a social network ह्यावर click केले कि एक मोठी social network ची list उघडेल . ह्यातील कोणतीही website तुम्ही ह्या account शी link करून तेथील update घेऊ शकता.

Top 10 social media dashboard tools


  1. Threadsy: Unify your email, social networks
  2. Myweboo: Organize your information streams
  3. Hootsuite: Integrate all your platforms
  4. Spredfast: For teams of social marketers
  5. MediaFunnel: Collaborative, permission-based system
  6. CoTweet: Advanced features for Enterprise users
  7. Seesmic: Free, clean & credible
  8. Netvibes: Share your widgets with the world
  9. TweetDeck: Connect with your contacts
  10. Brizzly: Simplify your updating       



    Related Posts Plugin for WordPress, Blogger...

    लेखनाधिकार

    myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
    upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
    Based on a work at upakram.blogspot.com.
    Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

    Followers