Monday, June 20, 2011
आहार किती घ्यावा ?
अ. मित आहार : आपण जे भोजन करतो, ते अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि त्याची प्राप्ती व्हावी म्हणून करत असल्याने ‘भोजन देहासाठी नसून देव जो महेश्वर तो भोक्ता आहे, त्याच्याकरिता आहे’, अशी
श्रद्धा मनात बाळगून जे भोजन केले जाते, त्याला ‘मिताहार’ असे म्हणतात.अपरे नियताहाराः । - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३०
अर्थ : नियत, मित आहार करणे.
पोटाचे दोन भाग अन्न ग्रहण करून तिसरा भाग पाणी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवणे, म्हणजे मिताहार.
लाभ : ‘आहार अल्प (कमी) केला, म्हणजे इंद्रिये क्षीण होतात, दुबळी होतात; पण त्यांची अंतःशक्ती विलक्षण वाढते. आपोआप क्षीण झालेल्या त्या इंद्रियांत, त्या त्या इंद्रियवृत्तीचा विजय होतो.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
आ. प्राणरक्षणापुरताच आहार घ्यावा ! : प्राणरक्षक आहारच प्राणवायू घेतो. शरिराला अंतर्वायू म्हणजे प्राण. त्याला अन्न आणि जल दिले की, त्याचे अस्तित्व अन् कर्मकर्तृत्व ठीक चालते. प्राणापुरताच आहार स्वीकारावा. आवश्यक आहारच घेतला नाही, तर विचार करणारे मन विकलांग आणि दुर्बल होते. विकल्पाने ज्ञाननाश होतो.’
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment