
इतिहास
परंपरा आणि ग्रंथसंपदा
आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा (Schools of Thought) आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत. तिसरी परंपरा कश्यपांची आहे. आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसवी सनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इसविसन ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारिक सिद्धांत आणि युक्त्या मूळ बौद्ध साहित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बर्याच लोकांनी संपादन केले आहे आणि अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही जी परंपरा आहे तिची सुरूवात सुश्रुताने केली असे मानतात.इसवीसनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणार्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदिक साहित्यांचे एकत्रीकरण केले. त्याला अष्टांग संहिता असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळ आधार समजले जाते आणि या तिघांना आदराने वृद्ध त्रयी , बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे.
आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्त्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्याप्रमाणात वापरली जाऊ लागली. आठव्या शतकात उग्रादित्य आणि चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बर्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाहीप्राणीज औषध म्हणून वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे.
मार्गदर्शक आणि मूळ तत्वे
पंचमहाभूते
- आकाश
- वायू
- अग्नी
- आप (पाणी)
- पृथ्वी
गुण
गुण | विरुद्ध गुण |
---|---|
गुरू (जड) | लघु (हलका) |
मंद (हळूहळू) | तीक्ष्ण (तीव्र) |
हिम, शीत (थंड) | उष्ण (गरम) |
स्निग्ध (तेलकट, ओशट) | रूक्ष (कोरडा) |
श्लक्ष्ण (गुळगुळीत) | खर (खरखरीत) |
सांद्र (घन, दाट) | द्रव (पातळ) |
मृदू (मऊ, कोमल) | कठीण (बळकट, दृढ) |
स्थिर (टिकाऊ) | चल, सर (गतिमान) |
सूक्ष्म (अतिशय बारीक) | स्थूल (मोठा) |
विशद (स्वच्छ) | पिच्छील (बुळबुळीत) |
दोष
वात दोष
कफ दोष
पित्त दोष
उपचारपद्धती
पंचकर्मे
वमन
विरेचन
बस्ती
नस्य
रक्तमोक्षण
औषधपद्धती
आसव
काढा
घन
चूर्ण
तैल
घृत
0 comments:
Post a Comment