जिवावर फुकट बसून खायचे
अंगात घोड्याचे बळ असताना
गाढवावनी घरात लोळायचे
आजूबाजूच्या उनाड पोरा बरोबर
बाहेर उनाडग्या करत फिरायचे
आणि रोज नव्या खोड्या कडून
काळ तोंडाला फसायचे
काम कर म्हटले की
तोंड वाकडे करायचे
कितीही कोणी ही काही ही बोलले
की निर्लजसारखे हसायचे
का म्हणून आपल्या नशिबी मित्रानो
इतके वाईट दिवस आणायचे
मनासारखे काम मिळत नाही
हे कारण रोज सांगायचे
पण आयुष्यात काही तरी करून दाखवयाचे
हेच तर खरे वय असते
कारण वेळ निघून गेल्यावर
मग सारेच काही फसते सारेच काही फसते...!!!!!!!!
0 comments:
Post a Comment