Sunday, June 19, 2011
केळीच्या पानावर जेवायचे महत्त्व ?
आ. केळीचे पान हे पवित्र, चैतन्ययुक्त आणि दैवी असते.
इ. केळीच्या पानात जेवणार्या व्यक्तीला होणारे लाभ
१. केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.
२. केळीच्या पानातील चैतन्याचा प्रवाह व्यक्तीकडे प्रवाहित होतो. त्यामुळे शरिराची शुद्धी होऊन शरिराभोवती चैतन्याचे कवच मंद गतीने निर्माण होते. अशा प्रकारे नेहमी केळीच्या पानावर जेवल्यास हे कवच वाढत जाऊन ते अभेद्य होते.
३. केळीच्या पानातील सगुण चैतन्य त्यावर जेवणार्या व्यक्तीला ‘चांगले वाटणे’ या स्वरूपात अनुभवता येते. केळीच्या पानाकडून येणारे सगुण चैतन्य आणि पाटावर बसून जेवतांना होणारी शरिराची मुद्रा यांमुळे जेवणार्या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी सगुण चैतन्याचे वलय (१ टक्का) निर्माण होते. त्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत.
४. केळीच्या पानाकडून भूदेवीतत्त्वाचा प्रवाह जेवणार्या व्यक्तीकडे प्रवाहित होतो. त्यामुळे त्या व्यक्तीची अंतर्बाह्य १ टक्का शुद्धी होते आणि तिच्या देहातील काळी शक्ती नष्ट होते.
५. जेवणार्या व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चैतन्याचे वलय मंद गतीने निर्माण होते. त्यामुळे तिचे मन शुद्ध होते आणि ते शांत रहाते.’
- सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment