‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’ हा श्लोक उच्चारून एकाच वेळी जेवावयास बसत. या सर्वांना
चार-पाच दशकांपूर्वी कुटुंबातील सर्व जण जेवणापूर्वी हात-पाय आणि तोंड धुऊन, पाटावर मांडी घालून,
घरातील स्त्रिया
जेवण वाढत. पाट-पाणी घेणे, पानात योग्य ठिकाणी योग्य अन्नपदार्थ वाढणे यांपासून ते उष्टी
काढून भूमीला शेण लावण्यापर्यंत सर्व कृती मुला-मुलींना शिकवल्या जात. आता मात्र एकत्र कुटुंबव्यवस्थेचा
र्हास, आधुनिकतेचा प्रभाव आणि गतीमान जीवनशैली यांमुळे या सर्वांचा विचार कुठे होतो ? भोजनाशी
संबंधित नित्य आचार स्वतः पाळणे आणि ते पुढच्या पिढीला शिकवणे जवळजवळ थांबलेच आहे.
भोजनाशी संबंधित आचार पाळणे का आवश्यक आहे ? ‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार,
आध्यात्मिक संस्कारांचे मूळही सात्त्विक आहारात दडले आहे. आहार सात्त्विक असण्याच्या जोडीलाच
तसे कर्म’, असे म्हटले जाते. कर्म जर उत्तम असेल, तरच जिवाची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते; म्हणून
अन्नसेवनामागील भावही महत्त्वाचा आहे. ‘अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे’, असे मानून ते ‘देवाचा प्रसाद’ म्हणून
प्रार्थना आणि नामजप करत ग्रहण केल्याने ते एक पवित्र यज्ञकर्मच बनते. असे करणे, ही साधनाच आहे.
व्याख्या
ज्या अन्नातून स्थूलदेहाचे पोषण होते, त्याला `भोजन' म्हणतात. ‘अन्न ग्रहण केल्यावर मनाची तृप्ती अगोदर होते. त्यानंतर अन्नकणांचे विघटन होऊन स्थूलदेहाला शक्ती मिळते.’
१. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’, असे म्हटले आहे. अर्थात साधनेसाठी शरिराची आवश्यकता असते. शरिरासाठी अन्नाची आवश्यकता असते. अन्नातून मिळणार्या शक्तीचा उपयोग केवळ आत्मोन्नतीसाठीच नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठीही करता येतो.
२. ‘भोजन’ म्हणजे ‘चैतन्य ग्रहण करण्याची प्रक्रिया’.
जेवणासंबंधीचे काही नियम
१. आंघोळीच्या आधी जेवू नये.
विना स्नानेन न भुजीत ।
अर्थ : स्नान केल्याविना भोजन करू नये.
आंघोळीच्या आधी देहावरील रज-तमात्मक मलीनता तशीच असल्याने या मलीनतेसहित जेवल्याने देहात रज-तमात्मक लहरींचे संक्रमण होणे ‘आंघोळीमुळे देहाला शुचिर्भूतता प्राप्त होते. शुचिर्भूत होणे, म्हणजेच अंतर्बाह्य शुद्ध होणे. नामजपासहित आंघोळ केल्याने अंतर्बाह्य शुद्धी साधते. नामजपाने अंतर्शुद्धी, तर आंघोळीने बाह्यशुद्धी साधली जाते. आंघोळीच्या आधी देहावरील रज-तमात्मक मलीनता तशीच असल्याने या मलीनतेसहित जेवणे, म्हणजेच देहात रज-तमात्मक लहरींच्या संक्रमणाला स्वतः कारणीभूत होणे. या संक्रमणाच्या प्रभावामुळे देह वाईट शक्तींच्या त्रासाने पीडित होऊ शकतो; म्हणून आंघोळीच्या आधी मलीनतेसहित भोजन करू नये, असे म्हटले जाते.’ - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण चतुर्दशी, कलियुग वर्ष ५१०९ (६.३.२००८), सकाळी १०.२७)
२. अन्नपचन झालेले असल्यासच जेवावे.
अ. पूर्वी सेवन केलेले अन्न पचल्यावर म्हणजेच भूक लागल्यावर, शुद्ध ढेकर आल्यावर, शरिराला हलकेपणा जाणवल्यावर जेवावे, जेणेकरून अजीर्णादी रोग होत नाहीत अन् सप्तधातूंची (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र यांची) योग्य वाढ होते.
आ. रात्रीचे जेवण दुपारच्या मानाने हलके असावे. दुपारचे जेवण पचले नसल्यास रात्री थोडा हलका आहार घेण्यास आडकाठी (हरकत) नाही; परंतु रात्रीचे जेवण पचले नसल्यास दुपारचे जेवण घेऊ नये.
३. मल-मूत्राचा आवेग आल्यावर भोजन करू नये; कारण अशा वेळी भोजन करणे आरोग्यशास्त्रदृष्ट्या इष्ट नाही.
४. शौच झाल्यावर लगेच जेवू नये, अर्धा घंटा (तास) थांबावे; कारण असे थांबणे आरोग्यशास्त्रदृष्ट्या इष्ट आहे.
५. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्या काळात भोजन करू नये ?
आरोग्यदृष्ट्या : चंद्र आणि सूर्य या अन्नरसाचे पोषण करणार्या देवता आहेत. ग्रहणकाळात त्यांची शक्ती घटत असल्याने त्या काळात भोजन वर्ज्य सांगितले आहे.
अध्यात्मदृष्ट्या : आधुनिक विज्ञान ग्रहणाचा विचार केवळ स्थूल, म्हणजे भौगोलिक स्तरावर करते. मात्र आपल्या ऋषीमुनींनी ग्रहणाच्या सूक्ष्म, म्हणजे आध्यात्मिक स्तरावर होणार्या दुष्परिणामांचाही विचार केला आहे. ग्रहणकाळात वायूमंडल रज-तमात्मक (त्रासदायक) लहरींनी भारलेले असते. त्या काळात वायूमंडलात रोगजंतू, तसेच वाईट शक्ती यांचा प्रभावही वाढलेला असतो. त्या काळात खाणे, झोपणे यांसारखी कोणतीही रज-तमगुणी कृती केली, तर त्या माध्यमातून वाईट शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो. ‘ग्रहणकाळात जेवल्याने पित्ताचा त्रास होतो’, असे धर्मशास्त्र सांगते. याउलट ग्रहणकाळात नामजप, स्तोत्रपठण यांसारखी कृती, म्हणजे साधना केली, तर आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊन ग्रहणाच्या अमंगल प्रभावापासून आपले रक्षण होते. ‘ग्रहणकाळात जेवल्याने पित्ताचा त्रास होतो’, असे धर्मशास्त्र सांगते.
६. जेवायला बसण्याची दिशा कोणती असावी ?
शक्यतो पूर्व दिशेला अन्यथा पश्चिम दिशेला तोंड करून भोजनास बसावे. उत्तर दिशेला तोंड करून जेवायला बसणे शक्यतो टाळावे. दक्षिणेकडे तोंड करून भोजनास कधीही बसू नये.
७. भोजनास बसण्यापूर्वी तोंड, हात आणि पाय धुवावेत; तीन चुळा भराव्यात अन् ओल्या पायानेच भोजनास बसावे.
८. पाण्याचे तांब्या-भांडे भरून जेवणार्याच्या डाव्या हाताला ठेवावे.
९. जेवायला बसण्यासाठी आसन कसे घ्यावे ?
जेवायला बसण्यासाठी लाकडी पाट वापरावा. प्लास्टिकचे किंवा स्टीलचे पाट वापरू नयेत. पाट उपलब्ध नसल्यास सुती किंवा लोकरीचे आसन वापरावे. तेही उपलब्ध नसल्यास लहान चटई वापरावी.
१०. ताटाभोवती रांगोळी काढावी आणि सात्त्विक उदबत्ती लावावी. धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी, सणावाराच्या दिवशी किंवा वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी तरी ताटाभोवती रांगोळी आवर्जून काढावी. जेवणाच्या ठिकाणी शक्यतो दोन सात्त्विक उदबत्त्या लावाव्यात.
‘स्थूल वैज्ञानिक घडामोडींमागेही सूक्ष्म असे अध्यात्मशास्त्र आहे’, असे सांगणारा एकमेव ‘हिंदु धर्म’ आहे, हे लक्षात घ्या !
दिवसातून शक्यतो दोनच वेळा जेवावे.
जेवणानंतर किती घंट्यांनी (तासांनी) खावे ?
दुपारी जडान्नाचे जेवण झाले असेल, तर त्या रात्री जेवू नये. सर्वसाधारणतःमोठ्या माणसांनी जेवणानंतर तीन घंटे (तास) तरी काही खाऊ नये, तसेच श्रमाचीकामे करणार्यांनी ६ घंट्यांपेक्षा अधिक काळ काही खाल्ल्याविना राहू नये.
जेवणाच्या वेळा
१. जेवणाच्या वेळा ठराविक असाव्यात.
२. सूर्यास्तानंतर ३ घंट्यांच्या आत जेवावे. सूर्योदय आणि सूर्यास्त, तसेच दुपारी बारा वाजता आणि रात्री बारा वाजता जेवू नये.
३. शक्यतो दुपारी १२ वाजेपर्यंत सकाळचे आणि रात्री ९ च्या आत रात्रीचे जेवण घ्यावे : दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कडकडीत ऊन असते. या काळात भोजन केल्यास तेव्हा जठराग्नी खूप प्रदीप्त झाल्याने शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. तसेच रात्री ९ च्या पुढे वातावरणात वाईट शक्तींचा संचार वाढतो. या काळात भोजन केल्यास अन्नावर वाईट शक्तींचे आक्रमण (हल्ला) होण्याची शक्यता वाढते. वाईट शक्तींचे आक्रमण झालेले अन्न ग्रहण केल्यास वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी शक्यतो दुपारी १२ वाजेपर्र्यंत सकाळचे आणि रात्री ९ च्या आत रात्रीचे जेवण घ्यावे.
0 comments:
Post a Comment