प्रश्न:- अग्निशामक दलाचा म्हणजे फायर ब्रिगेडचा रंग लाल का असतो?
उत्तर : अग्निशमन दलाच्या जवानांकडे एक शिडी असते.
शिडीला पायऱ्या असतात.
पायऱ्या पायांनी चढायच्या असतात.
पायांना इंग्रजीत फुट म्हणतात.
फुटांचं मोजमाप करणाऱ्या पट्टीला इंग्रजीत रूलर म्हणतात.
पण, रूलरचा दुसरा अर्थ राज्यकर्ता, म्हणजे राजा किंवा राणी.
इंग्लंडच्या राणीचं नाव एलिझाबेथ आहे.
एलिझाबेथ हे एका जहाजाचं पण नाव आहे.
जहाज पाण्यावर चालतं.
पाण्यात मासे असतात.
माशांना कल्ले असतात.
कल्ल्यांना इंग्रजीत फिन्स म्हणतात.
फिनलंड देशाच्या रहिवाशांनाही फिन्स म्हणतात.
फिनलंडच्या राष्ट्रध्वजाचा रंग लाल आहे...
... म्हणून फायर ब्रिगेडचा रंग लाल असतो!!!
आता अँब्युलन्सचा रंग पांढरा का असतो,
याची माहिती पुन्हा कधी तरी!!!
1 comments:
जबरीच !!
Post a Comment