Monday, June 20, 2011
कोणते अन्न खाऊ नये ?
अ. तामस अन्न : कुजलेले, रसरहित, दुर्गंधीयुक्त, शिळे, उष्टे आणि यज्ञासाठी अयोग्य असे अन्न तामस असते.
आ. मांसाहार : मांसाहारामुळे रज आणि तम गुण यांची वृद्धी होते. मांसाहारामुळे साधकाला हिंसादोष लागतो.
इ. कांदा आणि लसूण
१. हे पदार्थ कामोत्तेजक असून मनुष्याची प्राणशक्ती खाली खेचणारे आहेत.
२. लशुनं गृजनं चैव पलाण्डुं कवकानि च ।
अभक्ष्याणि द्विजातीनाम् अमेध्यप्रभवानि च ।।
- मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक ५
अर्थ : द्विजांनी लसूण, गाजर, कांदा, छत्र्या (मशरूम) आणि अशुद्ध ठिकाणातून उत्पन्न झालेले अन्न खाऊ नये. ‘अमेध्य प्रभव’ म्हणजे अपवित्र पदार्थांपासून अथवा प्रदेशापासून ज्यांची उत्पत्ती आहे, ते पदार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अभक्ष्य म्हणून सांगितले आहेत.
३. ‘कांदा आणि लसूण पुरुषाने खाऊ नयेत; खाल्ले तर बाईला पुरुष नकोसा वाटतो.’
- स्वामी विद्यानंद, मुंबई (वर्ष १९८७)
ई. निषिद्ध आहाराची अन्य उदाहरणे
१. ‘आंबलेले
२. थुंकलेले, थुंकी पडलेले, कृतघ्न व्यक्तीचे
३. कुत्र्याने शिवलेले
४. रजस्वलेचा स्पर्श झालेले
५. मेलेल्यासाठी शिजवलेले
६. सुतक आणि सोयर यांच्या दहा दिवसांतील
७. पत्नीने ज्याला मुठीत ठेवला आहे, त्याचे
८. वेश्येच्या घरचे
९. नपुंसक, व्यभिचारिणी आणि अपराधी यांच्याकडील
१०. ज्याला पत्नीचा व्यभिचार सहन होतो, त्याचे’
११. ‘कावळा किंवा इतर पक्षी यांनी खाल्लेले
१२. कुत्र्याने पाहिलेले किंवा स्पर्श केलेले
१३. चार दिवस मासिक पाळी न पाळणार्या विटाळशी स्त्रीची दृष्टी पडलेले
१४. भ्रूणहत्या करणार्याच्या विषारी दृष्टीस पडलेले किंवा चांडाळाची दृष्टी पडून दूषित झालेले
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment